करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर मोठा आरोप, पुन्हा एकदा चर्चेला उधाण, थेट म्हणाल्या…

करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंबाबत मोठा दावा केला आहे, या दाव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर मोठा आरोप, पुन्हा एकदा चर्चेला उधाण, थेट म्हणाल्या...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2025 | 4:52 PM

करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे. धनंजय मुंडे हे चार महिन्यांमध्ये आमदारपद गमावतील असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या मुंबईतील घरावर धनंजय मुंडे यांनी दावा केल्याचा आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा  

धनंजय मुंडे यांनी आपल्या घरावर दावा केल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. तसेच चार महिन्यांमध्ये धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. पंकजा मुंडेंप्रमाणेच धनंजय मुंडेंचं देखील रस्सी जल गयी, लेकीन बल नही गया असं आहे.  धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बीडमध्ये जाती -जातीत तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यावेळी करुणा शर्मा यांनी केला आहे.

धनंजय मुंडे हे आता माझ्या घरावर हक्क सांगत आहेत, धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, ते माझं घर आहे, या घरावर माझा हक्क आहे. पण मी त्यांना आधीच सांगितलेलं आहे, की तुमचा हक्का नाही. धनंजय मुंडे हे खालच्या पातळीवर जाऊन अशी कृत्य करू शकतात. त्यांनी शासकीय बंगला सोडावा आणि घरामध्ये येऊ राहावं, असं देखील करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, दोन दिवस आधीच त्यांनी सांगितलेलं आहे, की माझा या घरावर हक्क आहे. माझ्या घराचा  15 लाख मेंटेनन्स रखडलेला आहे, मला ते घर विकायचं आहे, माझं कर्ज भरायचं आहे. बीडमध्ये आपण बघू शकता, जी आरक्षणाची आग भडकलेली आहे, ती भडकवण्याचं काम या नेते लोकांनी केलं आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे बीड जिल्ह्यामध्ये जाती जातीमध्ये, तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यावेळी करुणा शर्मा यांनी केला आहे.