AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..ते त्याचा एन्काऊंटर करायला सांगू शकतात, करुणा शर्मा यांचा रणजीत कासलेला पाठींबा

बीडमध्ये जे लोक पुढे येतात त्यांची हत्या होते. मला ही दोन वेळा मारण्याचा प्रयत्न झालाय. काका गरजे ,भगीरथ असे अनेक लोकांची प्रकरण सगळ्या लोकांच्या समोर येणे बाकी आहे. प्रत्येक गोष्टीचा अंत असतो, तशी देवाच्या कृपेने या गोष्टीचा अंत झालाय असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

..ते त्याचा एन्काऊंटर करायला सांगू शकतात, करुणा शर्मा यांचा रणजीत कासलेला पाठींबा
Karuna Sharma's allegations against Dhananjay Munde in Karad case
| Updated on: Apr 15, 2025 | 4:30 PM
Share

बीड जिल्हा गेल्या डिसेंबरपासून राज्यात चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृन पद्धतीने हत्या झाल्यानंतर या जिल्ह्याची देशात चर्चा सुरु आहे. या जिल्ह्यातील गुन्हेगारी बिहार आणि युपीला लाजविणारी असल्याचे वारंवार समोर येत आहे. देशमुख हत्ये प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटर करण्याची ऑफर मला होती असा दावा निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले याने केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यातच आता करुणा शर्मा यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.

बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले याने व्हिडीओद्वारे वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती असा दावा करुन खळबळ उडविली आहे. त्यावर आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोटगीसाठी याचिका दाखल करणाऱ्या करुणा शर्मा यांनी या प्रकरणात मीडियाशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की वाल्मीक कराड हा काही साधारण व्यक्ती नाही. गेली चाळीस वर्षे मुंडे फॅमिली बरोबर तो असून त्याची एक हाती गुंडागर्दी होती. धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या जोरावरती गुन्हेगारी करत होता असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

मुंडे एन्काऊंटर करायला सांगू शकतात

पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी काल त्यांना वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटीची ऑफर होती असे जे सांगितले आहे त्यावर कराडला संपवायला ते पाच कोटीच नाही तर शंभर कोटीची ऑफर देखील देऊ शकतात असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांची पूर्ण कुंडली कराडकडे आहे. त्यांची कुंडली उघडपणे लोकांसमोर येऊ नये यासाठी बहुतेक धनंजय मुंडे एन्काऊंटर करायला सांगू शकतात असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. पीएसआय कासले याच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तो कोणत्या व्यक्तीच्या दबावाखाली झाला याची चौकशी व्हायला हवी कारण या पाठी फक्त धनंजय मुंडे यांचाच फायदा आहे असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जणांची कुंडली आहे आणि ती वाल्मीक कराडकडे मुंडे यांनी ठेवलेली आहे.त्यामुळे यावर मोठे सत्ताधारी राजकारणी मंत्र्यांची मंत्रीपदे जाऊ शकतात. वाल्मीक कराड यांच्या जीवाला देखील धोका आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट केलं पाहिजे ही माझी मागणी असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

माझी हात जोडून विनंती

कासले जे म्हणत आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्याची चौकशी करावी असेही मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे. कधीतरी असे ऑफिसर समोर येतात नाहीतर काहीजण आत्महत्या देखील करतात. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते ज्या लोकांची राजकारणी लोकांनी अन्याय करून नोकरी घेतली. त्यांनी कासले यांनी जो प्रयत्न केलाय त्यांना साथ द्यावी त्यांच्यासोबत राहावे असे करुणा यांनी म्हटले आहे.

 ..ते सकाळी सहा वाजता पिऊन व्हिडिओ करतील का

कासले याचाही बळी गेला म्हणून त्यांचं डोकं गरम झालं आहे, त्यामुळे ते सगळ्यांची गोष्टी उघड करत आहेत. तो एक पोलीस अधिकारी आहे, त्यामुळे त्यांच्यागोष्टी वर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. सकाळी.. सकाळी ते  सकाळी सहा वाजता पिऊन व्हिडिओ करतील का ? महाराष्ट्रात सगळं काही घाणेरडे राजकारण सुरू आहे. माझ्यावर दोन वेळा ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झालेला आहे. कासले वरती ही कोणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. कोणत्या नेत्याच्या दबावा खाली केला त्याची चौकशी व्हावी असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

केंद्राची एसआयटी टीम लावावी

गृहमंत्री खरे आहेत. त्यांचा धनंजय मुंडे यांना सपोर्ट नाही, त्यांनी खरी चौकशी करावी आणि पीएसआय कासले यांना प्रोटेक्शन देऊन. त्यांच्याकडून सगळ्या लोकांची कुंडली बाहेर काढावी अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. केंद्राची एसआयटी टीम लावणं यात कुठलेही नुकसान नाही.आधी या प्रकरणी जो पोलिस अधिकारी तपास करत होता तो त्याच्याबरोबर जेवत असण्याचा स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे केंद्राची एसआयटी टीम नेमावी ही गरजेची आहे असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा