केतन अग्रवाल हत्याकांडाचं बीड कनेक्शन उघड; चेतन-सियाने सर्वातआधी हत्येचा प्लान कोणाला सांगितला? महत्त्वाची माहिती समोर

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री झाली आहे. देशभर गाजत असलेल्या हत्याकांड प्रकरणात चेतन चौधरीच्या वर्गमित्राचंही नाव समोर आलं आहे. चेतन आणि सिया गोयलने सर्वातआधी केतनच्या हत्येचा प्लान त्यालाच सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याला 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरही सोबत येण्यासाठी विचारलं होतं. परंतु त्याने नकार दिला. पुणे पोलीस आता चेतन चौधरीच्या […]

केतन अग्रवाल हत्याकांडाचं बीड कनेक्शन उघड; चेतन-सियाने सर्वातआधी हत्येचा प्लान कोणाला सांगितला? महत्त्वाची माहिती समोर
| Updated on: Jul 03, 2026 | 1:18 PM

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री झाली आहे. देशभर गाजत असलेल्या हत्याकांड प्रकरणात चेतन चौधरीच्या वर्गमित्राचंही नाव समोर आलं आहे. चेतन आणि सिया गोयलने सर्वातआधी केतनच्या हत्येचा प्लान त्यालाच सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याला 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरही सोबत येण्यासाठी विचारलं होतं. परंतु त्याने नकार दिला.

पुणे पोलीस आता चेतन चौधरीच्या वर्गमित्राची चौकशी करत आहे. चेतनच्या वर्गमित्राला केतनच्या हत्येचा माहीत होता, तर त्याने पोलिसांना का कळवलं नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येचा प्लान त्यालाच आधी सांगितला होता. त्याला कसं संपवायचं, याविषयी त्याच्याशी चर्चा झाली होती. त्याला दोघांनी 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला बोलावलं होतं. परंतु तो त्यांचासोबत गेला नाही.

पोलीस तपासात अनेक धक्कादायक माहिती देखील हाती लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केतनची हत्या केल्यानंतर चेतन चौधरीने वर्गमित्राची भेट देखील घेतली होती. त्याने सिया गोयलसोबतही बोलणं केलं होतं. वर्गमित्र आणि सियासोबत नेमकं काय बोलणं झालं, याचा तपास पोलीस करत आहे.

तपासात माहिती समोर आली आहे की, हा तरुण महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील आहे. तो पुण्यातील बालेवाडीमधील एका खासगी कंपनीत काम करत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याचं चेतन चौधरीशी बोलणं झालं. आता पोलीस कॉल डिटेल, चॅट, लोकेशन हिस्ट्री, डिजिटल रेकॉर्ड तपासत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चेतन आणि सियाने मिळून केतनला संपवण्याचा प्लान रचला होता. परंतु त्याची हत्या करू नका, असा सल्ला दिला होता. बीडच्या तरुणाची हत्याकांड प्रकरणात भूमिका काय होती, याचा पोलीस करत आहे.

पुणे ग्रामीण पोलीस या तरुणाची चौकशी करत आहे. दोघांनी त्याला काय सांगितलं, त्याने कोणाला याविषयी सांगितलं का, आरोपींनी बीडच्या तरुणाला माहिती का दिली, याची माहिती पोलीस गोळा करत आहे. पोलिसांनी अद्याप तरुणाची आरोपी म्हणून गणना केलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us