AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Murder Case: ती अनेकदा लॉजवर… सिया गोयलवर संगीता तिवारींचे खळबळजनक आरोप, काय केला खुलासा

Sangeeta Tiwari on Siya Goyal: केतन अग्रवाल हत्याप्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे संशयित आरोपी आहेत. सियाच्या वर्तनावर आणि वागणुकीवरून सध्या चर्चा होत असतानाच संगीता तिवारी यांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Ketan Murder Case: ती अनेकदा लॉजवर... सिया गोयलवर संगीता तिवारींचे खळबळजनक आरोप, काय केला खुलासा
सिया गोयलवर संगीता तिवारींचे खळबळजनक आरोप
| Updated on: Jul 03, 2026 | 1:23 PM
Share

लक्ष्मण जाधव, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: केतन अग्रवाल याची 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून ढकलून हत्या करण्यात आली. यामध्ये मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांना अटक केली आहे. सियाचे वर्तन पूर्वीपासूनच वादात सापडले आहेत. तिचे जे काही व्हिडिओ आणि पार्टी कल्चर समोर येत आहे. त्यावरून टीकेची झोड उठली आहे. तर काल माध्यमांना बघून तिने मधले बोट वर करत तिचा उर्मटपणा दाखवून दिला. आता पुण्यातील नेत्या संगीता तिवारी यांनी तिच्यावर (Ketan Agarwal Siya Goyal Lohgad Murder Case) गंभीर आरोप केले आहेत.

थंड डोक्याने खून

केतन अग्रवालचा खून हा थंड डोक्याने केलेला पूर्वनियोजित कट असल्याचे पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा तिवारी म्हणाल्या. सिया गोयल हिला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तर त्याचवेळी त्यांनी सियाचे काही कारनामे सुद्धा समोर आणले आहे. जे लग्न होणारच नाही त्यासाठी सियाने मैत्रीणीकडे आधार कार्ड मागवल्याचा आरोप त्यांनी केला. सियाला तिकीट बुक करण्यासाठी मैत्रिणीचे आधारकार्ड लागत असल्याचा दावा त्यांनी केला. 14 मे रोजीचे हे चॅट आहे. सिया गोयलचे मैत्रिणी सोबतचे चॅटच त्यांनी समोर आणले. तर त्याचवेळी जर लग्न होणार नाही असे सियाच सांगत असेल तर हा पूर्वनियोजीत कट असल्याचे म्हणणे तिवारी यांनी मांडले.

सिया अनेकदा लॉजवर

सिया गोयलचे अनेक कारनामे आहेत. तिचे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहेत, असा दावा तिवारी यांनी केला. केतन अग्रवाल यांच्या वडिलांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचवेळी सियावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सिया गोयल ही तिच्या मैत्रिणींच्या बॉयफ्रेंड सोबत अनेकदा लॉजवर गेल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. अशा वृत्तीला कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणातून ही सुटली तर पुढेही असेच मोठे गुन्हे करेल, असा दावा संगीता तिवारी यांनी केला.

सियासह चेतनला न्यायालयात हजर करणार

सिया गोयल आणि चेतन अग्रवाल यांना यापूर्वी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज ही पोलीस कोठडी संपत आहे. या दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गेल्या पाच दिवसांत पोलिसांनी दोघांनाही लोहगडवर जाऊन सीन रिक्रिएशन केला. सियाच्या घरीही पोलिसांनी पंचनामा केला. तर इतर ठिकाणी नेऊन त्यांनी खूनाचा कट कुठं रचला याची माहिती घेतली. आज पोलीस या दोघांविरोधात काय पुरावे सादर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ