AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांकडून सिया गोयल हिची पोलखोल, आई वडिलांनीही थेट दिला झटका, तब्बल 12 तास..

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यामध्येच आता मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे. सिया गोयल हिच्या आई वडिलांची पोलिसांकडून कसून चाैकशी करण्यात आली.

पोलिसांकडून सिया गोयल हिची पोलखोल, आई वडिलांनीही थेट दिला झटका, तब्बल 12 तास..
Ketan Agrawal case
| Updated on: Jun 28, 2026 | 7:54 AM
Share

पुण्यातील केतन अग्रवाल याची 400 फूट खोल दरीत ढकलून हत्या करण्यात आला. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी मिळून ही हत्या केली. यापूर्वीही सियाकडून अनेकदा केतन याला मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रत्येक वेळी हे प्रयत्न फसत होते. अखेर 18 जून रोजी लोहगडावरून 400 फूट खोल दरीत केतनला ढकलून देण्यात सिया आणि तिच्या प्रियकराला यश मिळाले. धक्कादायक म्हणजे त्यांनी अनेकदा लोहगडाची रेकी देखील केली होती. या प्रकरणात सीसीटीव्ही व्हिडीओ देखील पुढे आला. केतन अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. तो विदेशात शिक्षण घेऊन आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यावसायात उतरला होता. केतन अग्रवाल याच्या निधनाने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.

सियावर सर्वात अगोदर संशय केतन अग्रवाल याच्या बहिणीलाच झाला होता. तिने ज्यावेळी फोटो कुठे केतन घेत होता? त्यावेळी तू कुठे होती, असे काही प्रश्न विचारले आणि तिथेच सिया गडबडली. सिया गोयल हिच्या कुटुंबियांनी अगोदरच स्पष्ट केले की, आम्हाला सिया हिच्या प्रेमप्रकरणाची कोणतीही माहिती नव्हती. आम्ही तिला विचारले होते तुला हे लग्न करायचे आहे का? त्यावेळी तिने अनेकदा होकार दिल्यानंतरच आम्ही लग्न जमवले.

केतनला जिथून ढकलून देण्यात आले, तिथूनच आरोपींना ढकलून द्या, असेही मोठे विधान सिया गोयल हिच्या आई वडिलांनी केले. यादरम्यानच पोलिसांकडून आता सियाच्या आई वडिलांची चाैकशी करण्यात आली. केतन अग्रवाल हत्येप्रकरणी सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची तब्बल 12 तास कसून चौकशी करण्यात आली. सोबत साहिल देखील होता.

12 तासांनी गोयल कुटुंब लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. गोयल कुटुंब सकाळी 11 च्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. शुक्रवारी आरोपी सियाचा भाऊ साहिल गोयलची देखील 10 तास चौकशी करण्यात आली होती. त्यामधून अनेक महत्त्वाचे खुलासे झालेले आहेत. प्रवीण गोयल आणि पूजा गोयल यांनी सियावर लग्नासाठी दबाव टाकला होता का?

सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील प्रेम संबंधाबद्दल माहिती नसल्याचा आणि सियावर लग्नासाठी दबाव नसल्याचा जबाब दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यातून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. आजही केतन अग्रवाल प्रकरणात काही जणांची चाैकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू