AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! खोक्या भाईच्या घराची झाडाझडती, आत जे सापडलं ते पाहून पोलीसही हादरले

मोठी बातमी समोर येत आहे, खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घराची आज पोलीस आणि वनविभागाकडून झाडाझडती घेण्यात आली, त्याच्या घरात काही धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत.

मोठी बातमी! खोक्या भाईच्या घराची झाडाझडती, आत जे सापडलं ते पाहून पोलीसही हादरले
Satish BhosaleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2025 | 3:57 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, खोक्या उर्फ सतीश भोसले याने शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान या घटनेनंतर आता पोलिसांकडून सतीश भोसलेविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. वनविभाग आणि पोलीसांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही धक्कादायक गोष्टी लागल्या आहेत.

खोक्याच्या घरात काय सापडलं?  

पोलीस आणि वनविभागाकडून आज खोक्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली, समोर आलेल्या माहितीनुसार खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळून आलं आहे. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं. दरम्यान शिरुर तालुक्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झाले असून, उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे.

नेमकं काय म्हणाले ग्रामस्थ?

बावी गावचे रहिवासी दिलिप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांच्या रानात सतीश उर्फ खोक्या भोसले याने हरणाची शिकार करण्यासाठी जाळ लावलं होतं. त्यात एक हरण अडकलं. ते हरण सोडवण्यासाठी तिथे ढाकणे कुटुंब पोहोचलं तर त्याने ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केली. मुलाचे दात पाडले, वडिलांच्या फासोळ्या मोडल्या. दिलीप ढाकणे यांच्या मुलाचा पाय मोडून तुकडे -तुकडे केले. आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत, पोलीस आरोपीला अटक करत नाहीत, नेमकी त्यांना काय अडचण आहे? असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, खोक्या आणि खोक्याच्या आकावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. खोक्याचे आका आष्टीत आहेत. हे प्रकरण दाबलं जात आहे. कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यात येत आहे, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.  दरम्यान अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असून, खातरजमा करून कारवाई होईल अशी माहिती या प्रकरणावर बोलताना गणेश नाईक यांनी दिली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?