सोमय्यांना आधी कळतं अन् नंतर कारवाई होते, देशमुख अटकेवर भुजबळांची प्रतिक्रिया; देशभर असे प्रकार सुरू असल्याचा दावा

| Updated on: Nov 02, 2021 | 11:57 AM

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना झालेली अटक दुर्दैवी आहे. खरं तर किरीट सोमय्यांना आधी कळतं आणि नंतर कारवाई होते, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी व्यक्त केली.

सोमय्यांना आधी कळतं अन् नंतर कारवाई होते, देशमुख अटकेवर भुजबळांची प्रतिक्रिया; देशभर असे प्रकार सुरू असल्याचा दावा
छगन भुजबळ, किरीट सोमय्या
Follow us on

नाशिकः माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना झालेली अटक दुर्दैवी आहे. खरं तर किरीट सोमय्यांना आधी कळतं आणि नंतर कारवाई होते, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी व्यक्त केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर 100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात अटक झालीय. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर 01 नोव्हेंबरला ईडीसमोर हजर राहिले होते. त्यानंतर जी त्यांची चौकशी सुरू झाली, ती तेरा तास सुरू होती. त्यांना वेगवेगळ्या कलमांनुसार अटक करण्यात आलीय. मनी लाँड्रिंगच्या अनुषंगानं ही सर्व कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आज त्यांना ईडीच्या कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यांची सकाळी मेडिकल होणार असून, त्यानंतर ईडीच्या स्पेशल कोर्टात त्यांना नेण्यात येणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वीही अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या साऱ्या कारवाईवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना झालेली अटक दुर्दैवी आहे. खरं तर किरीट सोमय्यांना आधी कळतं आणि नंतर कारवाई होते. संपूर्ण देशातच हे सुरू आहे. ज्या-ज्या ठिकाणी भाजप व्यतिरिक्त दुसरे सरकार आहेत, तिथे असे प्रकार सुरू आहेत. मात्र, देशमुख यांना लवकरच जामीन मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अटकेची कारवाई अयोग्य

अनिल देशमुख चौकशीत सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं दुर्दैवी आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. गेल्या अनेक काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी होतोय. हे आपण पाहिलं आहे. एखादा व्यक्ती चौकशी यंत्रणांना सहकार्य करत करताना देखील अटकेची कारवाई करणं, हे योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.

मलिकांनी बोलती बंद केली

राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु असून त्या निमित्ताने राजकीय धुरळाही उडाला आहे. याच राजकीय धुराळ्यावर रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, “फडणवीस-मलिक वादाबद्दल माहिती नाही पण ते पुराव्यानिशी बोलून विरोधकांची बोलती बंद करतात. ते पुरावे असल्याशिवाय कोणतीही गोष्ट बोलत नाहीत.” (Kirit Somaiya knows first and then action is taken, Chhagan Bhujbal’s reaction to Anil Deshmukh’s arrest)

इतर बातम्याः

बाजार समित्या सुरू की बंद; नाशिक जिल्ह्यात प्रशासनाच्या विसंवादामुळे सावळा गोंधळ, कोट्यवधींचे व्यवहार तुंबले

शिवसेना आमदार सुहास कांदे – अक्षय निकाळजे यांचा जबाब आज पोलीस आयुक्त नोंदवणार