AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजार समित्या सुरू की बंद; नाशिक जिल्ह्यात प्रशासनाच्या विसंवादामुळे सावळा गोंधळ, कोट्यवधींचे व्यवहार तुंबले

दिवाळीच्या काळामध्ये जिल्ह्यात बाजार समित्या सुरू की बंद, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बाजार समिती आणि प्रशासन यांच्यातील विसंवादामुळे अनेक ठिकाणी कोट्यवधींचे व्यवहार तुंबले आहेत.

बाजार समित्या सुरू की बंद; नाशिक जिल्ह्यात प्रशासनाच्या विसंवादामुळे सावळा गोंधळ, कोट्यवधींचे व्यवहार तुंबले
कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक.
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 11:31 AM
Share

नाशिकः दिवाळीच्या काळामध्ये जिल्ह्यात बाजार समित्या सुरू की बंद, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बाजार समिती आणि प्रशासन यांच्यातील विसंवादामुळे अनेक ठिकाणी कोट्यवधींचे व्यवहार तुंबले आहेत.

जिल्ह्याला यंदा अतिवृष्टीने झोडपले. अनेक ठिकाणी खरिप पिकाचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल आहे. जे थोडेफार पीक पदरात पडले, त्याची रास केली. कोणी उन्हाळी कांदा, तर कोणी आणखी काही जे शक्य असेल ते बाजारात आणत होते. मात्र, दिवाळीमुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या 30 ते 8 नोव्हेंबर म्हणजे 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समित्यांनी घेतला. सणाच्या काळात किमान दहा दिवस तर मजूर मिळणे शक्य नाही. हे पाहता हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या काळात कांद्यासह सर्व लिलावही बंद राहणार होते. या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी करत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पणन संचालक आणि जिल्हा सहकारी संस्थांचे जिल्हा उप निबंधक सतीश खरे यांना साकडे घातले होते. त्यामुळे जिल्हा उप निबंधकांनी समित्या दहा ऐवजी फक्त तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देत पत्र काढले. मात्र, अनेक ठिकाणी बाजार समित्यांचे व्यवहार बंद आहेत. अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे आपल्या जवळची बाजार समिती बंद की सुरू, हेच शेतकऱ्यांना कळत नाहीय. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार तुंबले आहेत.

पिंपळगाव बसवंतमध्ये भाजीपाला लिलाव सुरू

पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये भाजीपाला आणि टोमॅटो लिलाव सुरू आहेत. भुसार मालाचे लिलाव कालपर्यंत सुरू होते. कांदा लिलाव मात्र बंद आहेत. तरीही या प्रकरणी व्यापाऱ्यांशी बोलणे सुरू असल्याचे बाजार समिती प्रशासनातर्फे सांगण्यात आले. चांदवडमध्येे भाजपाला आणि फुलांचे लिलाव सुरू आहेत. लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजारात कांदा आणि भुसार मालाचे लिलाव सुरू आहेत. मात्र, मालेगावमध्ये कांदा लिलाव बंद आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सोमवारी लिलाव सुरू होते.

लासलगाव बाजार समितीतील सोमवारचे बाजारभाव

(किमान-कमाल-सर्वसाधारण) मका – 1311 – 1800 – 1662 सोयाबीन – 3500 – 5661 – 5481 गहू – 1840 – 2101 – 1890 बाजरी – 1500 – 2325 – 1712 हरभरा – 4100 – 6000 – 4800 मुग – 4000 – 6400 – 5500 टोमॅटो बाजारभाव (क्रेटस प्रमाणे) (किमान-कमाल-सर्वसाधारण) टोमॅटो – 0100 – 0650 – 0460

उन्हाळ कांदा – कांदा लिलाव बंद आहे. लाल कांदा – कांदा लिलाव बंद आहे.

(Market committees start or close; In Nashik district, due to the disagreement of the administration, there is confusion, crores of transactions are closed)

इतर बातम्याः

शिवसेना आमदार सुहास कांदे – अक्षय निकाळजे यांचा जबाब आज पोलीस आयुक्त नोंदवणार

OBC आरक्षणावर घटना दुरुस्ती होईपर्यंत आपण सर्व ओबीसी पर्व; नाशिकमध्ये पंकजांच्या उपस्थितीमध्ये भुजबळांचा नारा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.