शिवसेना आमदार सुहास कांदे यांचा जबाब पोलीस आयुक्तांनी नोंदवला; निकाळजे यांची 4 तारखेला चौकशी

शिवसेना आमदार सुहास कांदे आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा पुतण्यात अक्षय निकाळजे या दोघांचा जबाब आज पोलीस आयुक्त नोंदवणार आहेत.

शिवसेना आमदार सुहास कांदे यांचा जबाब पोलीस आयुक्तांनी नोंदवला; निकाळजे यांची 4 तारखेला चौकशी
सुहास कांदे आणि अक्षय निकाळजे.
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 3:20 PM

नाशिकः शिवसेना आमदार सुहास कांदे यांचा जबाब आज मंगळवारी नोंदवण्यात आला, तर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा पुतण्या अक्षय निकाळजे यांचा जबाब 4 नोव्हेंबर रोजी नोंदवण्यात येणार आहे.

शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचा दावा कांदे यांना केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे आरोप फेटाळून लावले. कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यासाठी मी कांदे यांना फोन केला होता. त्यांना फोनवर मी कुठलिही धमकी दिली नाही. भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही. असा दावा त्यांनी केला. या साऱ्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते.

कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ

पोलिसांच्या चौकदीदरम्यान आमदार कांदे आणि निकाळजे हे कुठलेही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ ठरले. निकाळजे यांनी कांदे यांना फोन केला होता. मात्र, तो कशासाठी, हे त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डिंग नसल्याने ठोस सांगता आले नाही. शिवाय कांदे यांनाही फोन याच कारणासाठी आला होता, हे पटवून देता आले नाही. मात्र, यावेळी कांदे आपल्या दाव्यावर ठाम होते. चौकशीदरम्यान पोलिसांनी शिवसेना आमदार सुहास कांदे आणि अक्षय निकाळजे यांच्यासह पाच जणांचे जबाब नोंदवल्याचे समजते. हा चौकशी अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

 पांडेय यांनी केली चौकशी

हायप्रोफाइल आणि महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या या वादाची आता पोलीस आयुक्त दीपक पांडेय स्वतः चौकशी करत आहेत. आज सकाळी अकरा वाजता त्यांनी शिवसेना आमदार सुहास कांदे यांचा जबाब नोंदवला. आता चार तारखेला ते अक्षय निकाळजे यांचा जबाब नोंदवणार आहेत. यानंतर तरी या धमकीमागे नेमके कोण आहे, धमकी याचिका मागे घेण्यासाठी दिली होती की, अन्य कशासाठी याचा उलगडा होतो का, ते पाहावे लागेल. (Shiv Sena MLA Suhas Kande-Nikalje’s reply will be recorded by Police Commissioner Deepak Pandey today)

इतर बातम्याः

OBC आरक्षणावर घटना दुरुस्ती होईपर्यंत आपण सर्व ओबीसी पर्व; नाशिकमध्ये पंकजांच्या उपस्थितीमध्ये भुजबळांचा नारा!

आवाज कुणाचा…महागाईचा; नाशिकमध्ये फटाक्यांच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या!

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.