Kirit Somaiya : राजभवनाचे बँकेत खाते नव्हते म्हणून पक्षाला ‘सेव्ह विक्रांत’चा निधी दिला; वकिलाची कोर्टात धक्कादायक माहिती

| Updated on: Apr 11, 2022 | 3:52 PM

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमय्यांचे वकील आणि सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेलं पैसे जमा करायला राजभवनात कुठलेही खाते नव्हते.

Kirit Somaiya : राजभवनाचे बँकेत खाते नव्हते म्हणून पक्षाला सेव्ह विक्रांतचा निधी दिला; वकिलाची कोर्टात धक्कादायक माहिती
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमय्यांचे वकील आणि सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेलं पैसे जमा करायला राजभवनात कुठलेही खाते नव्हते. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतचा (ins vikrant) निधी पक्षाला दिला, अशी धक्कादायक माहिती सोमय्या यांच्या वकिलाने कोर्टाला दिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याचा अर्थ विक्रांत वाचवायला दिलेले पैसे भाजप (bjp) पक्षाला देण्यात आले का? असा सवाल केला जात आहे. सोमय्यांच्या वकिलाने दिलेल्या या उत्तरामुळे भाजपची अडचण वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केला होता. सेव्ह विक्रांत मोहीम राबवून सोमय्या यांनी 58 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सोमय्या यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

किरीट सोमय्या यांच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद करताना सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतचा पैसा पक्षाला दिल्याचं म्हटलं आहे. तर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सोमय्यांच्या जामिनाला विरोध केला आहे. सोमय्यांकडून राज भवनाला कोणताही निधी मिळाला नाही. त्यामुळे हा पैसा गेला कुठे हा मोठा प्रश्न आहे. ज्या दोघांनी पैसा गोळा केला, तो पैसा कुठे गेला? त्याचे स्पष्ट उत्तर त्यांना देता आला नाही, असं सरकारी प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.

तर पक्ष नेत्यांवर कारवाई करण्यात येईल

ही रक्कम कुठे गेली याचा पोलिसांना तपास करायचा आहे आणि या चौकशासाठी आरोपीची कोठडी हवी आहे. आरोपी म्हणतायत आम्ही हे पैसा आमच्या पक्षाकडे दिले. या सगळ्या प्रकारात पक्ष जर आरोपी आढळला तर पक्षाच्या नेत्यावर पण कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रदीप घरत यांनी मीडियाशी बोलताना दिली.

सोमय्यांचं राज्यपालांना पत्रं

दरम्यान, 2013मध्ये किरीट सोमय्या यांनी तत्कालीन राज्यपाल शंकर नारायण यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात 11 हजार 224 रुपयांचा निधी चर्चगेट रेल्वे स्थानकावर जमा केल्याचं म्हटलं आहे. हा निधी आपणाकडे सुपूर्द करू इच्छितो. महाराष्ट्राची जनता निधी कमी पडू देणार नाही. विक्रांत वाचवण्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारला आग्रह करावा, अशी आग्रही मागणीही सोमय्या यांनी राज्यपालांना केली होती. त्यामुळे सोमय्या यांनी नेमका किती निधी जमा केला होता? असा सवाल केला जात आहे.

संबंधित बातम्या:

Kirit Somaiya : ‘कर नाही तर डर कशाला’? सोमय्या दोन दिवसांपासून कुठे गायब?-काँग्रेसचा सवाल

Pravin Darekar : आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे नाही, मात्र चौकशीच्या आड छळवाद सुरू-प्रवीण दरेकर

राजभवनाला कोणताही निधी मिळाला नाही, सोमय्यांच्या जामिनाला विरोध; सरकारी वकील घरत यांची माहिती