AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya : ‘कर नाही तर डर कशाला’? सोमय्या दोन दिवसांपासून कुठे गायब?-काँग्रेसचा सवाल

काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊतांनी सोमय्या यांच्यावर थेट आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यात सोमय्यांवर गुन्हाही दाखल झाला. मात्र पोलिसांनी चौकशीला बोलवल्यावर किरीट सोमय्या गैरहजर राहिले. त्यावरून आता सवाल उपस्थित होत आहेत.

Kirit Somaiya : ‘कर नाही तर डर कशाला’? सोमय्या दोन दिवसांपासून कुठे गायब?-काँग्रेसचा सवाल
किरीट सोमय्या आहेत कुठे?-काँग्रेसचा सवालImage Credit source: TV9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 11, 2022 | 3:39 PM
Share

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) एकमेकांवर तुटून पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊतांनी सोमय्या यांच्यावर थेट आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यात सोमय्यांवर गुन्हाही दाखल झाला. मात्र पोलिसांनी चौकशीला बोलवल्यावर किरीट सोमय्या गैरहजर राहिले. त्यावरून आता सवाल उपस्थित होत आहेत. आयएनएस ‘विक्रांत बचाव’ च्या नावाखाली भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेला निधीसंदर्भात चौकशी सुरु असताना सोमय्या अचानक गायब झाले आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय हेतूने कारवाई होत असताना ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणणारे भाजपा नेते किरिट सोमय्या, प्रविण दरेकर त्यांच्यावरील कारवाईवेळी कशाला घाबरत आहेत? त्यांनीही चौकशीला सामोरे जावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतिल लोंढे यांनी म्हटले आहे.

सोमय्या गेले कुठे?

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या ‘विक्रांत बचाव’ निधी प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे. सोमय्या पिता पुत्र दोघांनाही पोलिसांनी चौकशीला बोलावले असता ते चौकशीला गेले नाहीत. दररोज विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करणारे सोमय्या स्वतःवर कारवाईची वेळ आली की गायब झाले, दोन दिवसांपासून ते ‘नॉट रिचेबल’ आहेत. ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली सोमय्या यांनी देशभावनेशी खेळ केला आहे. निरव मोदी, विजय माल्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच ते पळून गेले तसेच सोमय्याही पळाले आहेत का?, पळून जाण्यापेक्षा त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे.

चोकशीतून पळ का काढता?

भाजपाचे दुसरे नेते, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मुंबई बँकेतील घोटाळ्याप्रकणी रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु आहे. चौकशीवेळी समर्थकांची गर्दी जमवून पोलीस स्टेशनबाहेर ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या गेल्या. ‘वंदे मातरम’ हे पवित्र शब्द आहेत. स्वातंत्र्यचळवळीत अनेक क्रांतीवीर व स्वातंत्र्यसैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले. या पवित्र शब्दांचा वापर भाजपा आरोपींना वाचवण्यासाठी करत आहे हे दुर्दैवी तसेच तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, कायद्याच्या चौकटीत जे होईल त्याला सामोरे जावे, दोषी असतील तर त्यांना शिक्षाही होईल. त्यासाठी दबाव आणणे, चौकशीपासून पळ काढणे हे कशासाठी? असे प्रश्न लोंढे यांनी उपस्थित केले आहेत.

Pravin Darekar : आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे नाही, मात्र चौकशीच्या आड छळवाद सुरू-प्रवीण दरेकर

Sadhvi Saraswati : काश्मीर फाईल थांबण्यासाठी तलवारी बाळगा, साध्वी सरस्वतींचे तरूणाईला आवाहन

Mallikarjuna Kharge: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची ईडीकडून चौकशी सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?

Follow Us
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...