चंद्रकांतदादा, पालकमंत्री असताना तुम्ही कोल्हापुरसाठी काय केले? सतेज पाटील यांचा सवाल;भाजपचं फक्त टीका करायचं काम

| Updated on: Mar 25, 2022 | 11:55 PM

कोल्हापूरः भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल सतेज पाटील यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी बिंदू चौकात सतेज उर्फ बंटी पाटील यांनी जाहीररित्या सांगावे की, कित्येक वर्षं सत्ता मिळूनही काँग्रेसनं (Congress) काय केले असे जाहीर आव्हान मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना देण्यात आले होते. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुकीचा प्रचार […]

चंद्रकांतदादा, पालकमंत्री असताना तुम्ही कोल्हापुरसाठी काय केले? सतेज पाटील यांचा सवाल;भाजपचं फक्त टीका करायचं काम
सतेज पाटील
Follow us on
कोल्हापूरः भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल सतेज पाटील यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी बिंदू चौकात सतेज उर्फ बंटी पाटील यांनी जाहीररित्या सांगावे की, कित्येक वर्षं सत्ता मिळूनही काँग्रेसनं (Congress) काय केले असे जाहीर आव्हान मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना देण्यात आले होते. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असल्याने एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत. आताही चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील एका मंत्र्यांनी घरफाळा थकवाला असल्याचा आरोप केला त्यावर बंटी यांनी त्यांचा खरपूस समाचार घेत थकबाकी असती तर विधान परिषद निवडणूक अर्ज वैध ठरला नसता असे सांगत त्यांनी चंद्रकांत पाटील हे एवढे अपरिपक्व असतील असे वाटले नव्हते असा टोलाही त्यांनी लगावला.
घरफाळ्याबाबत सतेज पाटील यांच्यावर टीका करण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, साडे अकरा कोटींचा घरफाळा भरलेला आहे. आणि हा घरफाळा भरल्याचे महानगरपालिकेचे लेखीपत्र असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी घरफाळ्याबाबत माहिती देत चंद्रकांत पाटील यांना सांगितले की, आणची कोणतीही थकबाकी नाही, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी चिंता करु नये असे म्हणत त्यांनी चंद्रकांतदादांकडून ही अपेक्षा नव्हती अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

भाजपची नीती खोट बोलण्याची

यावेळी सतेज पाटील यांनी निवडणूक आणि भाजपच्या नीतीची माहिती सांगितली. आता या निवडणुकीत निवडणूक बाजूला राहिली आहे, मात्र भाजपचे नेते निवडणूक बाजूला ठेऊन ते माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. त्यामुळे ही भाजपची नीतिच असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे नेहमीप्रमाणे याही निवडणुकी भाजपकडून फक्त खोटं बोललं जात आहे, मात्र त्यांचे हे खोटं जास्त दिवस लपून राहत नाही ते कधी ना कधी बाहेर येतच असे सांगितले.

भाजपकडून खोटा प्रचार

भाजपकडून वारंवार खोट्या गोष्टींचा प्रचार केला जातोप पण निवडणुका झाल्या की, त्यातील सगळ्या गोष्टींचे खरेपण पुराव्यासह बाहेर येते असेही त्यांनी सांगितले, त्याबरोबरच या पोटनिवडणुकीत कोल्हापुरची जनता अशा खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही असा टोलाही चंद्रकांतदादांना लगावला.

तुम्ही काय केले?

चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर आणि सतेज पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. सत्ता असताना तुम्ही काय केले असा सवाल चंद्रकांतदादांनी उपस्थित केला होता. त्या टीकेला उत्तर देताना सतेज पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे. सतेज पाटील म्हणाले की, पाच वर्षे तुमची सत्ता होती त्या काळात कोल्हापुरसाठी तुम्ही काय केले सांगा असा प्रश्न विचारत म्हणाले की, चंद्रकांतदादा पालकमंत्री असताना यांनी काय केले तेही सांगा फक्त टीका करण्याचं काम केलं जात असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

अंबरनाथच्या वालधुनी नदीत रासायनिक सांडपाणी प्रकरणी 9 कंपन्यांना एमपीसीबीने बजावली नोटीस

Wardha Crime : पैशासाठी महिलेची हत्या करणाऱ्या बापलेकास सश्रम कारावासाची शिक्षा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खाली जे सरकार आहे ते मनमोकळेपणाने काम करते; अजितदादांचे मत; अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता