Kolhapur : कोल्हापूर-मिरज या मार्गावरील विद्युतीकरणाचं काम पुर्ण, कोयना महाराष्ट्र एक्सप्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार

| Updated on: Apr 25, 2022 | 11:19 AM

कोल्हापूरातून सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेस आणि कोयना एक्सप्रेस इलेक्ट्रीक इंजिनसह ट्रायल बेसवर चालवल्या जाणार आहेत. कोणत्याही अडथळ्याशिवाय या एक्सप्रेस धावू लागल्यानंतर पुढील काही महिन्यात इंजिन उपलब्ध , तशा गाड्या इलेक्ट्रीक इंजिनवरती चालवण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर चालणाऱ्या सगळ्या गाड्यांना सध्या डिझेल वापरले जाते.

Kolhapur : कोल्हापूर-मिरज या मार्गावरील विद्युतीकरणाचं काम पुर्ण, कोयना महाराष्ट्र एक्सप्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार
कोल्हापूर-मिरज या मार्गावरील विद्युतीकरणाचं काम पुर्ण
Image Credit source: twitter
Follow us on

कोल्हापूर – प्रदुषण कमी करण्यासाठी कोल्हापूर-मिरज (Kolhapur-Miraj) रेल्वेमार्गावर डिझेल (Diesel) इंजिनऐवजी आता इलेक्ट्रिक इंजिन (Electric engine) वापरले जाणार आहे. तीन जूनपासून इलेक्ट्रीक इंजिन वापरले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात फक्त दोन मेल गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार आहे. कोल्हापूर-मुंबई, कोयना एक्सप्रेस या गाड्या धावणार असल्याचं सांगितलं आहे. एका वर्षानंतर सगळ्या गाड्या इलेक्ट्रीक इंजिनवरती धावतील असा अंदाज रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेमार्गावरीत प्रदुषण कमी व्हायला मदत होईल. तसेच वर्षभरात प्रदुषण पुर्णपणे बंद होईल.

कोल्हापूर मिरज या मार्गावरील विद्युतीकरणाचं काम पुर्ण

कोल्हापूर मिरज या मार्गावरील विद्युतीकरणाचं काम पुर्ण झाले आहे. तसेच मिरज ते पुणे या मार्गाचे दुहेरीकरण सुरू आहे. विशेष म्हणजे त्यापैकी एका मार्गाचे पुर्ण विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर पुणे हा विद्युकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावर आत्ता टप्प्याने इंजिन वापरण्याचा निर्णय मध्यरेल्वेने घेतला आहे. त्याची तयारी रविवारपासून करण्यात येणार आहे.

दोन्ही एक्सप्रेस प्रायोगिक तत्त्वावर

कोल्हापूरातून सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेस आणि कोयना एक्सप्रेस इलेक्ट्रीक इंजिनसह ट्रायल बेसवर चालवल्या जाणार आहेत. कोणत्याही अडथळ्याशिवाय या एक्सप्रेस धावू लागल्यानंतर पुढील काही महिन्यात इंजिन उपलब्ध , तशा गाड्या इलेक्ट्रीक इंजिनवरती चालवण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर चालणाऱ्या सगळ्या गाड्यांना सध्या डिझेल वापरले जाते. गाड्या ज्यावेळी वेग धारण करतात त्यावेळी अधिक धूर बाहेर पडत असतो. त्यामुळे हवेत अधिक प्रदुषण होतं. अनेकवेळा रेल्वेचं मार्ग सुध्दा बदलला जातो. पहिल्या टप्प्यात का होईना पण प्रदुषण कमी करायला आता मदत होईल. वर्षभरात मार्गावरीत प्रदुषण पुर्णपणे बंद होईल. विशेष म्हणजे प्रवाशांचा प्रवास देखील अधिक सुलभ होणार आहे.

Kirit Somaiya Car attack: किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी सगळ्यात मोठी बातमी! Video मध्ये दिसणारी सोमय्यांची जखम कृत्रिम?

4 वर्षांचा चिमुरडा स्विमिंग पूलमध्ये बुडाला! दिंडोशीमधील घटना, आई ट्रेनरशी बोलत राहिली आणि…

कुसुमच्या ‘त्या’ नोटेवरच्या पत्राला विशालचं उत्तर, म्हणाला, “मै डोली लेके आऊंगा!”