Kirit Somaiya Car attack: किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी सगळ्यात मोठी बातमी! Video मध्ये दिसणारी सोमय्यांची जखम कृत्रिम?

किरीट सोमय्या यांच्या हनुवाटीला झालेली जखमच कृत्रिम (Fake injury) असण्याची शंका आता घेतली जाते आहे.

Kirit Somaiya Car attack: किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी सगळ्यात मोठी बातमी! Video मध्ये दिसणारी सोमय्यांची जखम कृत्रिम?
दगडफेकीत सोमय्या जखमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 10:46 AM

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर (Kirit Somaiya Car Attack) शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर (Khar Police Station) हल्ला झाला होता. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागताना पाहायला मिळतंय. कारण किरीट सोमय्या यांच्या हनुवाटीला झालेली जखमच कृत्रिम (Fake injury) असण्याची शंका आता घेतली जाते आहे. हल्ल्यानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांना हनुवाटीतून रक्त येत असल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, ही जखम बनावट होती कीय काय, अशी शंका पोलिसांकडून उपस्थित करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. गृहखात्याकडून किरीट सोमय्या हल्लाप्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीही तपासले जाणार आहे, असंही सांगितलं जातंय. त्यामुळे या तपासातून आता काय नवीन खुलासा होतो, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

कसा झाला हल्ला?

किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात शनिवारी रात्री गेले होते. तिथे त्यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली होती. ही भेट झाल्यानंतर खार पोलीस स्थानकाबाहेर तुफान राडा झाला.

खार पोलीस स्थानकाबाहेर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यानंतर दगडफेक आणि चप्पल किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या दिशेनं भिरकावण्यात आल्या होत्या. यात किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या काचेला भेदून एक दगड गाडीतून आत घुसला. यात किरीट सोमय्या जखमी झाले होते. त्यांच्या हनुवटीतून रक्त येत असल्याचंही व्हिडीओमध्ये नंतर दिसून आलं होतं.

शिवसेनेचा आरोप

दरम्यान, खार पोलीस स्थानकाबाहेरील शिवसैनिकांनी परस्परविरोधी आरोप किरीट सोमय्यांवर लावला आहे. किरीट सोमय्यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्यामुळी शिवसैनिक आक्रमक झाले, असा आरोप करण्यात आला. दरम्यान, यानंतर किरीट सोमय्या यांच्या चालकाविरोधात तक्रारही देण्यात आली होती.

भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत

खोटी एफआयआर या संपूर्ण प्रकरणी दिल्याचा दावा करत किरीट सोमय्यांनी संजय पांडे यांच्यावही गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ सोमवारी सकाळीच दिल्लीत दाखल झालं. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणी विशेष पथक पाठवून चौकशी करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ : शनिवारी घडलं काय होतं?

संबंधित बातम्या :

रक्तबंबाळ सोमय्या गाडीतच बसून राहिले! बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हते, खारमधील संपूर्ण घटनाक्रम इथे वाचा

Kirit Somaiya : माझ्यावरील हल्ल्याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार; किरीट सोमय्या यांचा थेट आरोप

Video Raosaheb Danve | राणा आणि सोमय्यांवरील हल्ल्याचा राडा! दानवे म्हणतात, कुणाच्याही घरावर जाणं ठीक नाही, पण…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.