Video : कोल्हापुरातील गव्याने घेतला तरुणाचा बळी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप

| Updated on: Dec 12, 2021 | 4:37 PM

शनिवारी रात्री रानगव्याने केलेल्या हल्ल्यात (Cow Attack) सौरभ खोत या तरुणाचा मृत्यू झालाय. सौरभ हा गावात आलेल्या आणि हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गव्याला हुलकावण्यासाठी गेला होता. मात्र, त्यावेळी रानगव्याने केलेल्या हल्ल्यात सौरभचा मृत्यू झाला आहे.

Video : कोल्हापुरातील गव्याने घेतला तरुणाचा बळी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप
कोल्हापूर परिसरात गव्याचा वावर
Follow us on

कोल्हापूर : दोन दिवसांपासून कोल्हापूर शहर (Kolhapur) आणि परिसरात फिरणाऱ्या रानगव्याने अखेर भुयेवाडीतील एका तरुणाचा बळी (Youth Death) घेतला आहे. शनिवारी रात्री रानगव्याने केलेल्या हल्ल्यात (Cow Attack) सौरभ खोत या तरुणाचा मृत्यू झालाय. सौरभ हा गावात आलेल्या आणि हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गव्याला हुलकावण्यासाठी गेला होता. मात्र, त्यावेळी रानगव्याने केलेल्या हल्ल्यात सौरभचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळं भुयेवाडी परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. खोत कुटुंबियांनी आपला कमावता मुलगा गमावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेनंतर आता वन विभागाला जाग आली आहे. त्यांनी या घटनेचा पंचनामा करत वेगवेगळ्या पथकाद्वारे गव्याची शोध मोहीम सुरु केलीय. मागील दोन ते तीन दिवसापासून शहर आणि उपनगर परिसरात असणाऱ्या या गव्याचा वन विभागाने वेळीच बंदोबस्त का केला नाही? असा प्रश्न आता सौरभच्या नातेवाईकांनी उपस्थित केलाय. इतकंच नाही तर इतकी मोठी घटना घडूनही त्याची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी देखील आता होऊ लागली आहे.

सौरभचा मृत्यू, अजून दोन जण जखमी

भुयेवाडी शिवारातील घाण्याजवळ गव्याने सौरभ खोत याच्यावर हल्ला केला. सौरभच्या डाव्या बाजूच्या बरगडीला गव्याचे शिंग लागल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर प्रल्‍हाद पाटील याच्या मांडीला शिंग लागले आणि खांदा फ्रॅक्चर होऊन तो जखमी झाला असल्याची आणि शुभम पाटील हा घाबरून पळत असताना पडल्यानंतर त्याच्या अंगावर गव्याने पाय दिल्यानं तो जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे.

गवा नैसर्गिक अधिवासाकडे जाण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न

कोल्हापूर शहर आणि परिसरात मागील दोन ते तीन दिवसांपासून गव्याचा वावर आहे. गुरुवारी रात्री गवा लक्षतीर्थ वसाहतीत पाहायला मिळाला. तर काल त्याचा वावर हा पंचगंगा नदी परिसरात होता. काल गव्याने दिवसभर जामदार क्लब येथील महादेव मंदिराच्या पिछाडीस गवताच्या रानात ठाण मांडले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास गवा परतला होता. शिवाजी पुलावरून तो वडणगेतील पवार पाणंदकडे गेला होता. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. गवा पुन्हा नैसर्गिक अधिवासात जावा यासाठी वनखात्यासह वनप्रेमी संघटनेचे सदस्य प्रयत्नशील होते.

इतर बातम्या :

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नेहरू सेंटरच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं दाटलेल्या आवाजातल भाषण …

Jaipur Rally: हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून घालवा, हिंदूंची सत्ता आणा; राहुल गांधींची हिंदूंना साद