कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात चोरी; 1200 वर्षे जुन्या कारंजाच्या ढाच्यातील दगड नेले काढून

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या बाराशे वर्षांपूर्वीच्या कारंजाच्या ढाच्याला असलेले दगड पहाटेच्या सुमारास काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञातांनी हे दगड काढून नेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात चोरी; 1200 वर्षे जुन्या कारंजाच्या ढाच्यातील दगड नेले काढून
Kolhapur Ambabai Temple
| Updated on: Jul 21, 2026 | 11:58 AM

कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे असंख्य भक्तांचं श्रद्धास्थान आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचं आद्यपीठ अणाऱ्या अंबाबाई मंदिराबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर येत आहे. 1200 वर्षे जुन्या कारंजाच्या ढाच्यातील दगड काढून नेण्यात आलं आहे. परिसरात असलेल्या बाराशे वर्षांपूर्वीच्या कारंजाच्या ढाच्याला असलेले दगड पहाटेच्या सुमारास काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञातांनी हे दगड काढून नेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. याप्रकरणी आता अधिक चौकशी करण्यात येत आहे. सांगायचं झालं, मंदिराचा मूळ ढाचा आणि कारंजे यांसारख्या प्राचीन रचनांवर दख्खनच्या काळ्या बेसाल्ट खडकाचा वापर करण्यात आला आहे. हे दगड अतिशय टणक आणि टिकाऊ आहेत.

दरम्यान, अंबाबाई मंदिराच्या संरक्षणाच्या प्राधान्याबाबत गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेली अंतिम अधिसूचना येत्या 15 दिवसांत काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायमुर्ती वृषाली जोशी आणि न्यामुर्ती संदीप पाटीव यांच्या बेंचसमोर गजाजन विश्वनाथ मुनिश्वर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 20 जुलै रोजी सुनावणी झाली.

अंबाबाई मंदिराच्या संरक्षणाच्या प्राधान्याबाबत निरीक्षण नोंदवताना नमूद केलं की, अंबाबाई मंदिर फक्त धार्मिकस्थळ नाही तर, मंदिराला 1,200 वर्षांचा ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वारसा लाभलेला आहे… अशा स्मारकांना शासनाने प्राधान्य देणं गरजेचं आणि अपेक्षित होतं… या मंदिरासाठई सरकार 1 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे अधिसूचनी आतापर्यंत जारी व्हायला हवी होती, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आता न्यायालयाने सरकारला 15 दिवसांत अधिसूचना काढण्याचे आदेश दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरात काम सुरु आहे. पण जतन आणि संवर्धन कामांची पाहणी करत असताना काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या.. गरुड मंडपातील खांब खराब होत असून, शिलालेखांच्या संरक्षणाची योग्य काळजी घेण्यात आलेली नाही, तर कळसावरून पावसाचं पाणी गळत असल्याचं चित्र देखील समोर आलं आहे.

Follow Us