खवड्या डोंगरावर कुणाल या गोष्टीसाठी पोहोचला, पण आईला झाला उशीर, अन्… मावशीचा खुलासा

कुणाल चांदगुडे प्रकरणानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अख्ख्ये कुटुंब संपले. त्यामध्येच आता कुणालच्या मावशीने अत्यंत मोठा खुलासा केला. नक्की काय घडले हे कुणालच्या मावशीने स्पष्ट केले.

खवड्या डोंगरावर कुणाल या गोष्टीसाठी पोहोचला, पण आईला झाला उशीर,  अन्... मावशीचा खुलासा
Kunal Chandgude
| Updated on: Aug 26, 2026 | 3:34 PM

छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या खवड्या डोंगराहून पडून एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्देवी मृत्यू  झाला. 21 ऑगस्ट 2026 रोजी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली. देशभरात याची चर्चा झाली. कुणाल चांदगुडे 19 वर्षीय याने आयफोनच्या हट्टासाठी हे केल्याचे सांगितले गेले. कुणाल याला वाचवण्यात त्याचे वडीलही त्याच्यासोबत पडले. हे पाहून मागे आईनेही उडू घेतली. पूर्ण कुटुंब क्षणात संपले. वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 आणि संगीता चांदगुडे अशी त्यांची नावे आहेत. काैटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले. यादरम्यान गंभीर आरोप केली जात आहेत. कुणालच्या आई वडिलांनी 20 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केले. मात्र, मुरलीधर यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते. दोन्ही बाजूंनी आरोप केले जात आहेत. कुणालचे वडील काही दिवसांपासून त्यांच्यासोबत राहत नसल्याने कुणाल याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.

यादरम्यानच आता कुणालच्या मावशीने मोठा खुलासा केला. नक्की काय घडले आणि कुणाल खवड्या डोंगरावर कशाला गेला होता, हे त्यांनी सांगितले. दाजीमध्ये कुणालचा खूप जास्त जीव होता. ते सोडून गेल्याने तो तणावात होता. 2025 मध्येही खवड्या डोंगरावर कुणाल जीवन संपवण्यासाठी गेल्याचे सांगितले जातंय. पण तसे नव्हते. त्यावेळी कुणाल हा खवड्या डोंगरावर फिरण्यासाठी गेला होता. त्याने त्यावेळी त्याच्या आईला मेसेज केले.

Loading...

मी फिरायला जात आहे, संध्याकाळपर्यंत परत येईल. पण माझ्या बहिणीने ते मेसेज बघितले नाही. ती सरळ पोलिस ठाण्यात पोहोचली. रात्री 11 वाजता पोलिसांनी ते मेसेज बघितले. त्यावेळी तो खवड्या डोंगरावर आयुष्य संपवण्यासाठी नाही तर नाराज असल्याने फिरण्यासाठी गेला होता. मला वाटते की, यावेळीही त्याला तसे काही करायचे नव्हते, कदाचित तो यावेळीही फिरायला गेला असावा.

चांदगुडे कुटुंबात वाद होते, हे स्पष्ट झाले. कुणालचे वडील मागील काही दिवसांपासून त्यांच्यापासून दूर राहत होते. कुणालची आई ही ननंदेंवर आरोप करत होती. मात्र, ननंदेने सांगितले की, तो आमच्याकडे राहत नव्हता. त्याला घरातून बाहेर काढण्यात आल्यानंतर तो गाडीमध्येच राहत आणि झोपत होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us