कुर्ल्याच्या गार्डनमध्ये कपलला लाथाबुक्क्याने घातल्या, अल्पवयीन टोळक्याला थेट…न्यायालयाचा मोठा निर्णय आला!

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मारहाण करणाऱ्या संबंधित अल्पवयीन 6 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नियमाप्रमाणे त्यांना बाल न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

कुर्ल्याच्या गार्डनमध्ये कपलला लाथाबुक्क्याने घातल्या, अल्पवयीन टोळक्याला थेट...न्यायालयाचा मोठा निर्णय आला!
court decision in kurla garden case
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 6:59 PM

Kurla Garden Incident : मुंबईतील कुर्ला येथे धक्कादायक घटना घडली. या भागातील फिनिक्स मॉलवजवळ महापालिकेच्या उद्यानात फोटो काढायला आलेल्या तरुण-तरुणीला जबर मारहाण करण्यात आली. अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने या तरुण-तरुणीला घेरून लाथ-बुक्की तसेच लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत मुलगा तसेच मुलगी जखमी झाली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. कायदा आणि सुरक्षेचा विषय गंभीर झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. आता याच अल्पवयीन मुलांबाबत कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे.

कुर्ला येथील उद्यानात काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार तरुण आणि तरुणी असे दोघे कुर्ल्यातील पालिकेच्या उद्यानात फोटो काढायला आले होते. ते फोटो काढत असताना अचानक त्यांना रोखण्यात आले. सोबतच आठ ते दहा अल्पवयीन तरुणांचे टोळके तेथे जमा झाले आणि त्यांच्याशी अभद्र व्यवहार करण्यात आला. मुलाने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु आठ ते दहा जण असल्याने तो तरुण काहीच करू शकला नाही. दुसरीकडे या टोळक्याने तरुण तसेच तरुणीलाही जबर मारहाण केली. लाथ, बुक्की तसेच लाकडाने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर तरुण-तरुणीला उद्यानाच्या बाहेर जावे लागले. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या टोळक्याने आक्रमक होत हल्ला केल्याचेही व्हिडीओत दिसत आहे.

Loading...

न्यायालयाने दिला मोठा निर्णय

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मारहाण करणाऱ्या संबंधित अल्पवयीन 6 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नियमाप्रमाणे त्यांना बाल न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने सहा मुलांना 4 डिसेंबरपर्यंत, म्हणजेच दोन आठवड्यांसाठी बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील सर्व अल्पवयीन 12 ते 15 वर्षे वयोगटातील आहेत.

नागरिकांत संताप, योग्य काळजी घेण्याची मागणी

दरम्यान, तरुण-तरुणीला मारहाण झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी. सोबतच सार्वजनिक उद्यानांत सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली जातेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us