Kurla Crime: तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य

फिनिक्स मॉल जवळील उद्यानात हे तरुण-तरुणी फोटो काढत असतानाच या टोळक्यांनी त्यांना घेरलं अन् मारहाण केली. या तरुणाला बेल्ट, लाकडी दांडक्याने मारलं तसेच मुलीचीही छेड काढण्यात आली. या घटनेनंतर अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kurla Crime: तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य
| Updated on: Nov 21, 2026 | 3:48 PM

Kurla Phoenix Mall Mumbai News: कुर्ल्यामधील फिनिक्स मॉल जवळच्या उद्यानात तरुण- तरुणीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आठ अल्पवयीन मुलांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. फिनिक्स मॉल जवळील उद्यानात हे तरुण-तरुणी फोटो काढत असतानाच या टोळक्यांनी त्यांना घेरलं अन् मारहाण केली. या तरुणाला बेल्ट, लाकडी दांडक्याने मारलं तसेच मुलीचीही छेड काढण्यात आली. या घटनेनंतर अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुण- तरुणीला घेरलं, अल्पवयीन मुलांनी  बेदम मारलं! 

Loading...

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यामध्ये असलेल्या फिनिक्स मॉल मार्केटसिटी मॉसच्या मागे असलेल्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये शुक्रवारी तरुण-तरुणीवर टोळक्याकडून हल्ला करण्यात आला. हे तरुण-तरुणी या गार्डनमध्ये एकत्र बसले होते, फोटो काढत होते. याचवेळी एका अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने त्यांना घेरले अन् अश्लील शेरेबाजी सुरु केली. सोबतच या मुलांनी तरुण- तरुणीला मारहाणही केली. 8-10 जणांच्या या टोळक्याने दोघांनाही घेरुन बेल्ट, काठ्या तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या तरुणाने हल्लेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्नही केला, मात्र टोळक्याने तो एकटा असल्याचा फायदा घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. संतापजनक म्हणजे यावेळी तरुणासोबत असलेल्या तरुणीलाही मारहाण करण्यात आली तसेच अश्लील शेरेबाजी करण्यात आली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुण- तरुणीला घेरून हे अल्पवयीन मुलांचे टोळके मारहाण करताना दिसत आहे, तसेच जोडप्याच्या दिशेने दगड फेकल्याचेही पाहायला मिळत आहे.

आठ अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल! 

दरम्यान, अल्पवयीन मुलांकडून अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या तरुण-तरुणीवर क्रृर हल्ला करण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतन अन् संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलांमध्ये इतकी क्रुरता येते कुठून असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, या आठ अल्पवयीन मुलांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास केला जाईल तसेच सर्व अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर उभे केले जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us