AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊस दरवाढ आंदोलन पेटलं; विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

राज्यात सध्या ऊस दरवाढीचा प्रश्न चांगलाच पेटला आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात ऊस दरासंदर्भातील आंदोलन आता अधिकच चिघळलं आहे.

ऊस दरवाढ आंदोलन पेटलं;  विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Raju ShettyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 3:39 PM
Share

राज्यात सध्या ऊस दरवाढीचा प्रश्न चांगलाच पेटला आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात ऊस दरासंदर्भातील आंदोलन आता अधिकच चिघळलं आहे. 3500 रुपयांची उसाची पहिली उचल जाहीर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. माढाच्या पिंपळनेरमधील माजी आमदार बबनराव शिंदे हे चेअरमन असलेला विठ्ठलराव शिंदे  साखर कारखाना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बंद पाडण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते थेट कारखान्यामध्ये घुसले आहेत.

भाव ठरल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाहीत, असं पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये ठरलं होतं. परंतु तरी देखील साखर कारखाने सुरू झाल्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी कारखाने बंद पाडण्यात आले आहेत. दरम्यान आज माढाच्या पिंपळनेरमधील माजी आमदार बबनराव शिंदे हे चेअरमन असलेला विठ्ठलराव शिंदे  साखर कारखाना देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बंद पाडण्यात आला आहे.  कार्यकर्त्यांनी थेट कारख्यान्याच्या गव्हाणीमध्ये उतरुन गाळप बंद केलं आहे.

जोपर्यत विठ्टलराव शिंदे कारखाना 3 हजार 500 रुपये दर जाहीर करत नाही तोपर्यत कारखान्याच्या गव्हाणी शेजारीच बसूनच ठिय्या आंदोलन सुरु ठेवू, कारखाना सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घेण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे ऊस दरवाढीच्या मुद्द्यावरून अहमदनगरमध्ये देखील वातावरण चांगलंच तापलं आहे. समाधानकारक ऊस दर न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.  ऊस दरासाठी सोमवारी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असून, जास्तीत जास्त संख्येनं शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहान राजू शेट्टी यांनी केलं आहे.  त्यामुळे आता अहमदनगरमध्ये देखील वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा