AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : जे हायकोर्टात गेले ते आज..लाडकी बहिण योजनेवरुन आदिती तटकरे यांनी कोणाला सुनावलं ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांच्या टीकेला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत, तटकरे यांनी योजनेविरोधात हायकोर्टात गेलेल्यांना फटकारले. महायुती सरकारची ही योजना महिला सक्षमीकरणासाठी सुरूच राहील आणि कोणतेही हप्ते चुकले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana : जे हायकोर्टात गेले ते आज..लाडकी बहिण योजनेवरुन आदिती तटकरे यांनी कोणाला सुनावलं ?
लाडकी बहीण योजनेवरून अदिती तटकरेंनी सुनावलं
| Updated on: Jul 25, 2026 | 7:28 AM
Share

महायुतीची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना नेहमीच चर्चेत असते. कधी त्यावरून मिळणाऱ्या पैशांच्या मुद्यावरून, तर कधी त्यातीर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे तर कधी ई-केवायसीच्या मुद्यावरून. या योजनेतील फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले, अनेकांनी त्याचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचेही उघड झाल्यानंतर त्याला आळा घालण्यासाठी, ते रोखण्यासाठी पडताळणी करण्यात आली. अनेक लाभार्थ्यांचं नाव त्यातून वगळण्यात आल्यावर कित्येकांना योजनेचा हप्ता, दर महिन्याला मिळणारे पैसे बंद झाले. मात्र त्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली आणि ही योजना बंद होणार, लाडक्या बहिणींची गरज संपली आता ही योजना बंद होऊ शकते असं म्हणण्यास सुरूवात केली. मात्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण देण्यात येत असून लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तरहीदलं आहे. ज्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली त्यांना आज लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही, असं तटकरे यांनी सुनावलं.

काय म्हणाल्या अदिती तटकरे ?

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून जी टीका होते, ती मी गांभीर्याने घेत नाही. ही योजना आणूच नका, शासनाचे नुकसान होईल, या शब्दात विरोधकांनी लाडकी बहीण योजना सुरू करताना विरोध केला होता, काही मंडळी तर उच्च न्यायालयातदेखील गेली होती. त्यामुळे ज्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली, त्यांना आज लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही, असं अदिती तटकरेंनी सुनावलं. जेव्हा चांगलं काम आपण करत असतो, तेव्हा सरकारवर टीका ही होतच राहणार. विरोधक म्हटल्यावर टीका करणारच, असंही त्या म्हणाल्या.

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात, हे एकच महायुतीचे धोरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार या सर्वांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना कायम सुरूच ठेवणार आहोत, असंही अदिती तटकरेंनी स्प्षट केलं.

यंदा अधिवेशनामध्ये आम्ही महिला शेतकऱ्यांसाठी धोरण आणले, आणि ते महिलांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. लखपती दीदी असेल किंवा इतर योजना अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. लाडके बहीण योजनेचा एकही हप्ता चुकलेला नाही जर एखाद्या महिन्याचा चुकलेला असेल तर पुढच्या महिन्यात दोन महिन्याचे पैसे मिळाले आहेत, असंही त्यांनी अदिती तटकरेंनी नमूद केलं.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच