Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, योजनेबाबत मोठी बातमी, लाभार्थी महिलांचं सर्वात मोठं टेन्शन मिटणार

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता या योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, योजनेबाबत मोठी बातमी, लाभार्थी महिलांचं सर्वात मोठं टेन्शन मिटणार
लाडकी बहीण योजना
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 17, 2025 | 6:44 PM

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, त्या कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण नावाची योजना सुरू केली आहे, ही योजना विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सुरू करण्यात आली होती.  राज्य सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ करून, 2100 रुपये देऊ अशी देखील घोषणा करण्यात आली होती, मात्र त्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही.  परंतु दुसरीकडे या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडला आहे.

दरम्यान या योजनेसाठी पात्र नसताना देखील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलं आहे, त्यामुळे अशा महिलांची नाव आता या योजनेतून वगळली जात आहेत, त्यासाठी सरकारने आता या योजनेसाठी केवायसी बंधनकारक केली आहे. या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांनी जर केवायसी केली नाही, तर त्यांचं नाव या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. केवायसीसाठी 18 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. याचाच अर्थ आता केवायसी करण्यासाठी फक्त एक दिवश शिल्लक राहिला आहे.

मात्र नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अजूनही एक कोटी दहा लाख महिलांची केवायसी बाकी आहे. केवायसी जर वेळेत झाली नाही तर आपल्याला पैसे भेटणार नाही याचं टेन्शन या लाडक्या बहिणींना आहे, मात्र त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे सरकार पुन्हा एकदा केवायसीसाठी देण्यात आलेली मुदत आणखी काही दिवस वाढवण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत मोठी घोषणा होऊ शकते. त्यामुळे सरकारने जर केवायसीची मुदत वाढवली तर   लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन दूर होण्याची शक्यात आहे. दरम्यान सरकारने यापूर्वी दिलेल्या योजनेच्या अपडेटनुसार आता केवायसी करण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक राहिला आहे, मंगळवारी केवायसीची मुदत संपणार आहे, त्यामुळे सरकार पुन्हा एकदा ही मुदत वाढवणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.