
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली. ही योजना ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आला. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला जवळपास दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. पण नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका, त्यापोठापाठ हापालिका निवडणुका या सगळ्यामुळे लाडकी बहीण योजनेता हाप्ता महिलांना मिळायला विलंब होत आहे. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाल्याने आज महिलांचा संताप उफाळून आला. इ केवायसी होऊन ही त्यांना मागील दोन महिन्यांचा हप्ता मिळत नसल्याबाबत तक्रार मांडण्यासाठी अनेक महिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोहोचल्या होत्या. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. वारंवार विनंती करूनही आत प्रवेश न मिळाल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध व्यक्त केला.
बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 30 हजार लाडक्या बहिणींचा थांबला लाभ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार, या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात धडक दिली आहे. गेल्या दोन महिन्यापासून लाभ कशामुळे बंद झाला, याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात साडेसहा लाखाच्यावर जवळपास महिला योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र ई केवायसी मध्ये त्रुटी आल्याने जवळपास 30 हजार महिलांचा लाभ थांबलेला आहे. ई केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याच्या प्रमुख कारणामुळेच हा लाभ थांबण्याची माहिती आहे. त्यामुळे ई केवायसी मधील ही त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी आता लाभार्थी महिलांकडून केली जात आहे.
यवतमाळमध्येही सारखी परिस्थिती
यवतमाळमध्येही हप्ता न मिळालेल्या महिला, महिला व बालकल्याण विभागात धडक देत आक्रमक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. उपस्थित अधिकार्यांसह कर्मचार्यांवर संताप व्यक्त करत आमच्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करून लाभ मिळवून द्या अन्यथा सर्वांचा लाभ बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाने ई-केवायसीची लिंक पुन्हा सुरू करावी, असे पत्र थेट शासनाकडे पाठविले आहे.