
विधानसभा निवडणुकीपूर्वी काही महिने आधी महायुती सरकारकडून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली, या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फयदा झाल्याचं देखील बोललं जात आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना महायुतीच्या अनेक नेत्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीत वाढ करून 2100 रुपये दिले जातील असं आश्वासान देण्यात आलं होतं. मात्र राज्यात महायुती सरकार सत्तेत येऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे, परंतु अजूनही 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 2100 रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील सर्वा लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या योजनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शिंदे?
लाडकी बहीण योजनेवरून सातत्यानं विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहेत, विरोधकांना उत्तर देताना आता एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ही योजना सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे. कोणीही ही योजना बंद करू शकणार नाही. आणि राहिला प्रश्न तो म्हणजे 2100 रुपयांचा तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. मात्र 2100 रुपयांची प्रतिक्षा अजूनही कायम आहे.
नोव्हेंरबर डिसेंबरचा हाप्ता कधी?
मिळत असलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हाप्ता एकत्रच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होऊ शकतात. या योजनेसाठी सरकारने केवायसी बंधकारक केली आहे, सुरुवातीला केवायसीसाठी 18 नोव्हेंबरची अंतिम मुदत देण्यात आली होती, त्यानंतर ही मुदत वाढून आता 31 डिसेंबर करण्यात आली आहे. जर केवासयी झाली नाही, तर हाफ्ता देखील बंद होण्याची शक्यता आहे.