AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parth Pawar : वाजवा रे वाजवा, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, दादांच्या घरी पुन्हा एकदा शुभमंगल सावधान

Parth Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या घरात पुन्हा सनई चौघडे वाजणार आहेत. त्यांचे ज्येष्ठ सुपूत्र पार्थ पवार यांचं लग्न ठरलं आहे.

Parth Pawar : वाजवा रे वाजवा, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, दादांच्या घरी पुन्हा एकदा शुभमंगल सावधान
Parth Pawar-Kainath dhar
| Updated on: Jul 11, 2026 | 12:36 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या घरात पुन्हा सनई चौघडे वाजणार आहेत. सुनेत्रा पवार यांचे ज्येष्ठ सुपूत्र पार्थ पवार यांचं लग्न ठरलं आहे.  त्याआधी त्यांचा साखरपुडा होणार असल्याची बातमी आहे. कायनात धार यांच्याशी पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे. कायनात धार आणि पार्थ पवार हे दोघेही सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीच्या लग्नात एकत्र दिसले होते. कायनात धार या सध्या दिल्लीमध्ये कार्यरत आहेत.पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा 29 जुलैला पुण्यात होणार असल्याची माहिती आहे. मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीचं लग्न झालं. त्यावेळी पार्थ पवारांसह कायनात धार दिसल्या होत्या. तेव्हापासूनच दोघांच्या नात्याबद्दल आणि कायनात धार कोण अशी चर्चा सुरु झालेली. अखेर आज त्याचं उत्तर मिळालं आहे. कायनात धार या पार्थ पवारांच्या भावी पत्नी आहेत.

कायनात धार फक्त सुखाच्या क्षणातच नाही, तर दु:खद प्रसंगातही पार्थ पवार यांच्यासोबत उभ्या होत्या. अजितदादांच्या निधनानंतर त्यांनी बारामतीत येऊन पवार कुटुंबाच सांत्वन केलं होतं. त्याशिवाय वरळी येथे आयोजित शोकसभेला सुद्धा उपस्थित होत्या. कायनात धार यांचे पवार कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मध्यंतरी कायनात धार आणि पार्थ पवार उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र पूजा करताना दिसले होते.

जय पवार सुद्धा राजकारणात सक्रीय

अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर पार्थ पवार राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. मध्यंतरी पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्यांचे आरोप झाले होते. सध्या दिल्लीत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदारकीची जबाबदारी संभाळत आहेत. अजित पवार यांचं जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला विमान अपघातात निधन झालं. बारामती एअरपोर्टजवळ त्यांचं विमान कोसळलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसची कमान आली. अजित पवार यांना दोन मुलं आहेत. त्यांचा धाकटा सुपूत्र जय पवार याचं अजितदादांच्या हयातीत परदेशात लग्न झालं होतं. जय पवार सुद्धा राजकारणात सक्रीय आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ