Latur DCC: धीरज देशमुख यांच्या विरुद्ध थेट RBI कडे तक्रार, लातूर जिल्हा बँकेत वादाचा नवा अध्याय, संभाजी पाटील निलंगेकरांचा आक्षेप काय?

Sambahji Patil Nilangekar on Dheeraj Deshmukh: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. धीरज देशमुख यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर निवड झाली. त्यानंतर आता निलंगेकर विरुद्ध देशमुख अशा नवीन वादाच्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.

Latur DCC: धीरज देशमुख यांच्या विरुद्ध थेट RBI कडे तक्रार, लातूर जिल्हा बँकेत वादाचा नवा अध्याय, संभाजी पाटील निलंगेकरांचा आक्षेप काय?
धीरज देशमुख यांच्या विरुद्ध थेट RBI कडे तक्रार, निलंगेकरांचा आक्षेप काय?
| Updated on: Nov 26, 2026 | 9:31 AM

Sambahji Patil Nilangekar on Dheeraj Deshmukh: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेची सूत्रं पुन्हा एकदा काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्याकडे आली आहेत. त्यांची सलग दुसर्‍यांदा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी अविनाश जाधव हे आले आहेत. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेसमधील वाद उफाळून आला आहे. या निवडीनंतर लागलीच भाजपने धीरज देशमुख यांची थेट केंद्रीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) तक्रार केली. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधील वादाचा नवीन अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे.

संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध देशमुख वादाचा नवा अंक

Loading...

लातूर जिल्हा बँकेतील भाजप – काँग्रेसमधील वाद कायम आहे. संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध देशमुख वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. जिल्हा बँक अध्यक्ष पदावरील धीरज देशमुख यांच्या निवडीवर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. या निवडणुकीतही हा वाद दिसून आला होता. दोन्ही गटाने एकमेकांना चांगली टशन दिली होती. काँग्रेसने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता वाद उफाळला आहे.

धीरज देशमुख यांच्यावर आरोप काय?

काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. नियमबाह्य पद्धतीने काम केल्याचा ठपका ठेवत आरबीआयने जिल्हा बँकेकडून ८ लाखांचा दंड वसूल केल्याचा नोटिशीत उल्लेख करण्यात आला आहे. कर्ज दिलेल्या कंपन्यांमध्ये धीरज देशमुख आणि त्यांचे कुटुंबिय संचालक असल्याचाही निलंगेकर यांनी दावा केला आहे. धीरज देशमुख यांना अपात्र करण्यासाठी निलंगेकर समर्थकांकडून आरबीआयकडे तक्रार करण्यात आली आहे.

सहकार पॅनलला मोठे यश

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकारी पॅनलने मोठे यश मिळवले. संचालक मंडळाच्या एकूण 19 जागांपैकी 14 जागांवर सहकार पॅनेलने विजय मिळवला. तर दुसरीकडे महायुतीच्या परिवर्तन पॅनलला या निवडणुकीत मोठा पल्ला गाठता आला नाही. त्यांना अवघ्या 5 जागांवर समाधान मानवे लागले. या निकालामुळे बँकेच्या संचालक मंडळात सहकार पॅनलच्या माध्यमातून देशमुख कुटुंबियांचा वरचष्मा दिसून आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us