Latur DCC Bank: लातूर जिल्हा बँक कुणाच्या ताब्यात? निलंगेकर विरुद्ध देशमुख सामना, धीरज देशमुख यांचा तो मोठा दावा
Latur DCC Bank Dhiraj Deshmukh: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदानला सुरूवात झाली आहे. या निवडणूकीत देशमुख विरुद्ध निलंगेकर असा सामना पाहायला मिळत आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी मोठा दावा केला आहे.

Latur DCC Bank Dhiraj Deshmukh: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. 15 जागांसाठी 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तर चार उमेदवार या अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची झाली आहे. काँग्रेसचे धीरज देशमुख हे सहकार प्राण्यांचा नेतृत्व करीत आहेत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील देखील धीरज देशमुख यांच्या सहकार पॅनलला मदत करीत आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या चारही आमदारांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी ताकद लावली आहे. भाजपा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार संजय बनसोडे आणि आमदार अभिमन्यू पवार हे महायुती म्हणून परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवीत आहेत.
40 वर्षांपासून देशमुख कुटुंबियांची सत्ता
आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे निलंगा तालुका सोसायटी गटातून उमेदवार आहेत. इथे त्यांची लढत त्यांच्या काकू संगीता पाटील यांच्याशी आहे. तर आमदार रमेश कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड हे देखील या निवडणूक रिंगणात आहेत. लातूर जिल्ह्याच्या सहकारी आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जिल्हा बँकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्हा बँकेवर आतापर्यंत गेल्या 40 वर्षात धीरज देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांचे वर्चस्व राहिलेलं आहे.
काय म्हणाले धीरज देशमुख?
बाबासाहेब पाटील, दिलीप देशमुख जिल्हाभरातील आमचं केडर कामाला लागलंय. महायुतीच्या माध्यमातून काही नेत्यांच्या माध्यमातून संभ्रम पसरवला जात आहे. बाबासाहेब पाटील आधीपासूनच आमच्या सोबत आहेत. सहकारात पक्ष असं काही नाहीये, चिन्ह आहेत. अभिमन्यू पवार सोबत आहेत का, या प्रश्नावर बोलताना लातूरच्या सहकार क्षेत्राला मदत करणारे आम्ही सगळे एकत्र आलो. सर्वशक्ती सहकारासाठी आमच्या सोबत आहे. राजकीय संस्कृती पुढे नेण्यासाठी आम्ही काम करतोय, असे धीरज देशमुख म्हणाले.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन काम करतायत. काही गोष्टी घडल्यात त्याचा तपास पोलीस करत आहे. पोलीस अतिशय दक्षतेने काम करत आहे. यादीत जितके मतदार त्यांच्यावर कोणतीही दडपशाही होणार नाही. कोणत्याही निवडणुकीत मतदाराला मतदानाचा अधिकार मिळावा. सकारात्मक राजकारण लातूरकरांनी पाहिलं आहे. आज आपण करत असलेलं मतदान भविष्यासाठी आहे. लातूर पॅटर्न चुकीच्या पद्धतीने प्रजोक्ट होऊ नये. लातूरची जनता सूज्ञ, विरोधकांचा खरा चेहरा समोर येईल आमचं पॅनल बहुमतानी जिंकून येईल अशी अपेक्षा आहे, असे धीरज देशमुख म्हणाले.