Latur Mahapalika Election Result: लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची मुसंडी, भाजपला प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य भोवलं

Latur Mahapalika Election Result: मराठवाड्यातील तीन महानगरपालिकेत भाजपच्या विजयाचे वारू उधळले आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. अनेक उमेदवार निवडून आले आहे. पण लातूरमध्ये काँग्रेसचा सफाया करण्याचे भाजपचे स्वप्न धुळीस मिळाले.

Latur Mahapalika Election Result: लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची मुसंडी, भाजपला प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य भोवलं
लातूर महानगरपालिकेत काँग्रेस वंचितची मुसंडी
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 2:03 PM

Congress-Vanchit Vs BJP: मराठवाड्यातील पाच महानगरपालिका निवडणुकीपैकी परभणी आणि लातूरमध्ये भाजपसाठी अजून साजेसे चित्र दिसत नाही. छत्रपती संभाजीनगरनंतर नवनिर्मित जालना महानगरपालिकेत भाजपच्या विजयाचे वारू उधळले गेले आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. लातूरमध्ये मोठा करिष्मा करण्याची आणि काँग्रेसचा सफाया करण्याच्या वल्गणा भाजपने केल्या होत्या. तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस औषधालाही नसेल आशा आशयाचे वक्तव्य केले होते. पण माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयीचे ते वक्तव्यच इथं भाजपला भोवल्याचे दिसून येते.

लातूरमध्ये काँग्रेस-वंचितकडे एकहाती सत्ता

Live

Municipal Election 2026

04:27 PM

Pune Nagarsevak Election Results 2026 : पुण्यात शिंदे गटाला थेट धक्का

04:11 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता, थेट पंकजा मुंडे यांनी...

04:01 PM

Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका

03:17 PM

Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी

04:27 PM

हा विजय धन शक्तीचा नाहीत जन शक्तीचा आहे, शंकर जगताप यांचा हल्ला

03:57 PM

पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?

लातूरमधून मोठी अपडेट समोर येत आहे. काँग्रेस पक्षाची 37 तर वंचित आघाडी सर्वच पाच जागांवर आघाडीवर असल्याचे समजते. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा काँग्रेस मोठ्या ताकदीने पुढे येत असल्याचे चित्र आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लातूरमध्ये काँग्रेस-वंचितकडे एकहाती सत्ता जाण्याची स्थिती आहे. तर भाजप 25 जागांच्या जवळपास आघाडीवर असल्याची तुर्तास माहिती मिळत आहे. गेल्यावेळी या महापालिकेत भाजपने मोठा करिष्मा दाखवला होता. भाजपने 37 जागांवर विजय मिळवला होता. पण यंदा हा आकडा गाठताना भाजपची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

काँग्रेसचे चार विजयी उमेदवार

लातूर महापालिकेतील काही निकाल समोर आले आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये वंचितचे अमोल लांडगे, काँग्रेसचे पप्पू देशमुख, कमल सोमवंशी आणि साहीन मणियार या विजयी झाल्या आहेत. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, प्रभाग क्रं. 4, प्रभाग क्रमांकमध्ये 7 आणि 13 मध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तर काही ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. यामुळे निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. पण सध्याच्या आकडेवारीनुसार लातूरमध्ये काँग्रेस-वंचित आघाडीने मोठी मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांचं ते वक्तव्य भोवलं

लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही.” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 5 जानेवारी रोजी केले होते. त्यावरून एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समोर येऊन प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्या जाऊ नये, विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही असे सांगावे लागले होते. पण तरीही निकालात त्याचे पडसाद उमटल्याचे म्हटले जात आहे.