AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वकील जेसीबीने तर न्यायाधीश ट्रॅक्टरवरुन पोहोचले न्यायालयात, नांदेडमधील Video व्हायरल

अर्धापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर डी सुरेकर या चक्क ट्रॅक्टरवर बसून न्यायालयात आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोहोचल्या. तसेच एक वकील जेसीबीमध्ये बसून न्यायालयात पोहोचले.

वकील जेसीबीने तर न्यायाधीश ट्रॅक्टरवरुन पोहोचले न्यायालयात, नांदेडमधील Video व्हायरल
Nanded Judge
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 30, 2025 | 10:04 PM
Share

संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आज अतिवृष्टी झाली. अनेक शासकीय आणि खाजगी इमारतींना पाण्याने वेढा घातला होता. यामुळे अनेकाना कार्यालयात पोहोचता आले नाही. पण अर्धापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर डी सुरेकर या चक्क ट्रॅक्टरवर बसून न्यायालयात आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोहोचल्या. तसेच एक वकील जेसीबीमध्ये बसून न्यायालयात पोहोचले. या दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अर्धापूर परिसरात मुसळधार पाऊस पडला. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. शेतांनाही तळ्याचे स्वरूप आले आहे. मुसळधाप पावसामुळे अर्धापूर न्यायालयाला आज पाण्याने वेढा घातलेला होता, त्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी पोहोचणे अशक्य होते. त्यामुळे न्याय दंडाधिकारी ट्रॅक्टरवर बसून न्यायदानासाठी पोहोचल्या. तसेच एक वकील जेसीबीमध्ये बसून नायालयात पोहोचला.

मुसळधार पावसामुळे न्यायालयात पोहोचणे अवघड झाले होते. त्यामुळे अर्धापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर डी सुरेकर यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने न्यायालयात पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ट्रॅक्टरवरील प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले आहे. तसेच जेसीबीच्या मदतीने न्यायालयात पोहोचणाऱ्या वकिलाचेही नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

आर डी सुरेकर यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले की, ‘नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोणतीही अडचण असो, जबाबदारी पार पाडण्याची वृत्ती सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे.’ तर दुसऱ्या एकाने कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही असं म्हटलं आहे. आणखी एकाने ‘आर डी सुरेकर यांचे समर्पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे’ असं विधान केलं आहे.

अनेकांना प्रेरणा मिळाली

मुसळधार पावसामुळे अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये पोहोचत नाहीत. मात्र आर डी सुरेकर यांचे हे धाडसी पाऊल नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनले आहे. अनेकांनी यातून प्रेरणा घेतली आहे. काहींनी प्रत्येक कर्मचाऱ्याने आर डी सुरेकर यांचा आदर्श घ्यावा असं म्हटलं आहे. कारण आर डी सुरेकर यांनी कठीण परिस्थितीत प्रवास करत न्यायदानाचे काम केले, ही खरोखरच कौतूकास्पद बाब आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा