शिंदेंचा नेता ओमराजेंच्या घरी पोहचला अन् तिथेच मोठा गेम झाला, आता ओमराजे कोणासोबत? सर्वात मोठी बातमी समोर

ओमराजे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. मी अजून पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला नसल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं, परंतु आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

शिंदेंचा नेता ओमराजेंच्या घरी पोहचला अन् तिथेच मोठा गेम झाला, आता ओमराजे कोणासोबत? सर्वात मोठी बातमी समोर
ओमराजे निंबाळकर कोणासोबत?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 20, 2026 | 6:01 PM

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी तब्बल 6 खासदार फुटले आहेत. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. परंतु शनिवारी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला, या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. हा ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे. मी अजून पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला नाही, मतदारसंघात जाऊन आधी कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि नंतर भूमिका घेईल असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. तसेच निकालाचा आणि पक्षप्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचं देखील ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र ओमराजे निंबाळकर यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढल्याचं दिसून येत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर अध्यक्ष  नाना भानगिरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीनंतर बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज लागला,  त्यामुळे आम्ही त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं आहे. ओमराजे मतदार संघात जातील आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, असं भानगिरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भानगिरे यांच्या या विधानामुळे आता संभ्रम आणखी वाढला आहे, ओमराजे निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटातच प्रवेश करतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र अजूनही त्यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाहीये. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार की? उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान दुसरीकडे या सर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे, जिथे-जिथे बंडखोरी झाली, त्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे हे भेट देणार आहेत.

Follow Us