Hyderabad Gazetteer: कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय करावे लागणार? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

Hyderabad Gazetteer: हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यासोबतच नेमकं काय काय करावं लागणार चला जाणून घेऊया...

Hyderabad Gazetteer: कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय करावे लागणार? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
Hyderabad Gazetteer
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 11, 2025 | 2:04 PM

मराठा समाजाला आरक्ष मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण केले. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजर झाले होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्याची मागणी सरकारने केली. या आमरण उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सरकारने हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता दिली. त्यामुळे आता हैदराबाद गॅझेटची कार्यपद्धती कशी असणार? कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय करावं लागणार? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.

हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी पत्र प्रमाणपत्र देण्यासाठी सरकराने गाव पातळीवर समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये समिती सदस्य म्हणून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.

वाचा: हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय? सरकार आणि जरांगेंमध्ये त्यावरुन झालेला वाद काय?

प्रकिया नेमकी कशी असेल?

-हैदराबाद गॅझेटमधील नोंदी शोधण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत करण्यात

-या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी असणार

-कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागणार

-हा अर्ज करण्यासाठी अर्जदार मराठा समाजातील भुधारक, भूमीहिन, शेतमजुर किंवा बटईने शेती करत असलेल्या जमीनीचा मालक असल्याचा पुरावा सादर करणे

-ज्या अर्ज दारांकडे पुरावा नाही त्यांना 13 ऑक्टोबर, 1967 पूर्वीचे त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावा लागेल

-अर्जदाराने त्यांच्या कुळातील व्यक्तींना कोणते प्रमाणपत्र मिळाले व त्यांच्या नातेवाईकांचे कुणबी असल्याचे संबधीत प्रतिज्ञापत्र सादर करावे

-अर्जदार अर्जाच्या पृष्ठत असणारे इतर पुरावे सादर करु शकतील

-तालुकास्तरीय समितीकडे हा अर्ज गेल्यानंतर ही समिती त्याची तपासणी करेल आणि गाव पातळीवर गठीत समितीकडे चौकशीसाठी पाठवेल

-गाव पातळीवर गठीत समिती अर्जदाराची पोलिस पाटील, गावातील ज्येष्ठ नागरीकासमक्ष चौकशी करुन अहवाल तालुकास्तरीय समितीकडे पाठवेल

-तालुकास्तरीय समिती गाव पातळीवर गठीत समितीने पाठवलेला अहवालाचे अवलोकन करेल

-त्यानंतर तालुका समिती अर्जावर शिफारस करेल व त्यानुसार अर्जावर विहित कार्यपद्धतीने सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात यईल