AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता फक्त 48 तासांमध्ये मराठी शिकता येणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्री सरनाईक यांनी काय म्हटलं?

Marathi Mandatory : महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

आता फक्त 48 तासांमध्ये मराठी शिकता येणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्री सरनाईक यांनी काय म्हटलं?
Pratap SarnaikImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 29, 2026 | 2:44 PM
Share

राज्य सरकारने हिंदी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याला काही संघटनांनी विरोध केला होता, अनेक संघटनांनी मराठी शिकण्यासाठी वेळ मागितला होता. आज याबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली. यानंतर बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंत चाकलांना मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देण्यात आल्याची माहिती दिली आहे. यासाठी एक पुस्तिकाही जारी करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मराठी शिकण्यासाठी पुस्तिका

कॅबिनेट बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, ‘ही पुस्तिका आज आम्ही प्रकाशित केली आहे. 1 मेपासून राज्यातील सर्व आरटीओंना ती देण्यात येईल. ज्या संघटना आमच्याकडे आल्या होत्या, ज्यांनी आमच्याकडे वेळ मागितली ती वेळ आता आम्ही दिलेली आहे. परंतू आता त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. तुम्ही जर आमच्याकडे वेळ मागत आहात, तु्म्ही हिंदी भाषिकांना मराठी शिकण्यासाठी अवधी द्या अस म्हणत आहात, तर आता तुमची जबाबदारी वाढली आहे, ही पुस्तिका आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही मला सांगितलं होतं की आम्ही आमच्या कार्यालयामध्ये मराठी शिकवू, शाखांमध्ये मराठी शिकवू, हॉल भाड्याने घेऊ आणि मराठी शिकवू अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तुम्ही सुद्धा मराठी भाषेच महत्व समजून घ्या, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सहकार्य करत असाल तर आता ही जबाबदारी तुमची आहे.

15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकावी

पुढे बोलताना सरनाईक यांनी म्हटले की, ‘1 मे पासून 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम आम्ही राबवणार आहोत, प्रत्येक आरटीओ विभाग आपापल्या भागात जाऊन चालकाला मराठी भाषेच ज्ञान आहे की नाही ते तपासणार आहेत. तसेच तो कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी चालवतो का ते पाहिले जाणार आहे. जे यात दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र मराठी भाषेबाबत 15 ऑगस्टपर्यंत आकारणार नाही. आता ही आरटीओ अधिकाऱ्यांसह चालक संघटनांची जबाबदारी वाढली आहे. आता प्रवाशांचीही जबाबदारी आहे की रिक्षामध्ये बसल्यानंतर मराठीत बोलून भाषा शिकण्यासाठी मदत करावी.

महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठी यायलाच हवी…

मंत्री सरनाईक यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘या पुस्तिकेद्वारे आम्ही जुजबी ज्ञान देत आहोत. जर कुणी मनापासून शिकण्याचा प्रयत्न केला तर हिंदी भाषिक लोक मराठी शिकू शकतो. यात 15-16 वाक्ये आहेत ती चालकाला माहिती असावेत. मराठी भाषा प्रेमळ आहे 48 तासांमध्ये तुम्ही भाषा शिकू शकता. ही पुस्तिका मोबाईलवरही उपलब्ध करून देण्यात येईल. यात बारकोड देखील असेल, तो स्कॅन केल्यास ऑडिओ रुपातही माहिती मिळेल. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल महाराष्ट्रात रहायच असेल मराठी भाषा येणं अनिवार्य आहे.’

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा