
गेल्या अनेक दिवसांपासून लपंडाव खेळणाऱ्या पावसाने राज्यासह मुंबईत दमदार आगमन केलं आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांतही पावसाच्या सरी कोसळत असून त्यामुळे गारवा आल्याने मुंबईकर सुखावले आहेत. मात्र याच पावसाचा फटका मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या रेल्वेलाही बसल्याचे चित्र दिसत आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतुकीवर परिणाम झाल्यातचे दिसून आले. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहे. सिग्नल मिळत नसल्याने अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावरील अप व डाऊनची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
तर पालघर भागातही सकाळपासू जोरदार पाऊस झाल्याने त्याचा फटका पश्चिम रेल्वेला बसला. डहाणू विरार लोकल सेवा 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. . ठिकठिकाणी ट्रॅक जवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या या गतीने सुरू आहेत. ठिकठिकाणी ट्रॅकजवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या या गतीने सुरू असून कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असून जोरदार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढचे तीन ते चार तास अत्यंत महत्वाचे आहेत. कारण राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 ते 4 तासात राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात मुंबईच्या हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.