IPL Retention 2027 : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला लखनौने आयपीएल 2027 साठी रिटेन केलं की सोडून दिलं?

Arjun tendulkar retained by lsg : आयपीएल 2027 च्या लिलावापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्जुनला मागच्या हंगामामध्ये केवळ एका सामन्यात संधी मिळाली होती.

IPL Retention 2027 : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला लखनौने आयपीएल 2027 साठी रिटेन केलं की सोडून दिलं?
Arjun tendulkar Ipl 2027
Image Credit source: social media
| Updated on: Nov 18, 2026 | 10:08 PM

17 नोव्हेंबर रोजी आयपरीएलचं रिटेन्शन पार पडलं. त्यानुसार आता 10 संघांनी आपापल्या खेळाडूंबाबत भूमिका जाहीर केल्या. अनेकांना कायम ठेवलं अन् काहींना मुक्त करण्यात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्याबाबतही मोठा निर्णय झालाय. त्याच्यासंबंधी आयपीएल 2027 पूर्वी मोठी अपडेट समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने अर्जुनला आगामी हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा लखनऊच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.

अर्जुनला संघात कायम ठेवल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनच्या फोटोसोबत फ्रँचायझीने ‘मेहनत में कोई कमी नहीं, निशाने में कोई चूक नहीं’ असे लिहिले आहे. या पोस्टमधून संघाने त्याच्यावरील विश्वास व्यक्त केला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान. अर्जुन तेंडुलकर 2021 मध्ये मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला होता. त्यावेळी फ्रँचायझीने त्याला 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र, आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला 2023 पर्यंत प्रतीक्षा करावी लागलेली. 2025 पर्यंत तो मुंबईच्या संघाचा भाग होता.

Loading...

ऑल कॅश ट्रेडमधून लखनौकडे गेलेला अर्जुन

आयपीएल 2026 पूर्वी मुंबई इंडियन्सने अर्जुनला 30 लाख रुपयांच्या ऑल-कॅश ट्रेडद्वारे लखनऊ सुपर जायंट्सकडे पाठवले होते. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 6 सामने खेळले असून, 4 विकेट घेतल्या आहेत आणि 18 धावा केल्या आहेत. 2026 च्या हंगामात लखनऊकडून त्याला केवळ 1 सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने 1 विकेट घेतली आणि 5 धावा केल्या. त्यामुळे अर्जुनच्या कारकीर्दीत आणखी खूप मोठे टप्पे पाहायला मिळू शकतात.

देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

अर्जुनची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही लक्षवेधी आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 24 सामन्यांत 52 विकेट आणि 685 धावा, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 24 सामन्यांत 26 विकेट आणि 160 धावा, तर टी-20 क्रिकेटमध्ये 30 सामन्यांत 36 विकेट आणि 194 धावा अशी त्याची कामगिरी आहे. विशेष म्हणजे आयपीएल 2027 च्या लिलावापूर्वी लखनऊकडे 47.45 कोटी रुपयांची सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. तरीही संघाने अर्जुनला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा अर्जुनला किती सामने खेळायला मिळतात आणि त्यामध्ये त्याची कामगिरी कशी राहते याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचा डोळा असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us