त्यावेळेस फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती, जाधवांच्या सवालावर पुन्हा विधानसभेत गदारोळ

| Updated on: Dec 27, 2021 | 1:28 PM

जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार भांडत होते, तेव्हा तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 19 जणांना निलंबित केलं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मला किती बिस्किटं खायला घातली होती, हे चंद्रकांत दादांनी नितेशला विचारायला हवं होतं, असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला.

त्यावेळेस फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती, जाधवांच्या सवालावर पुन्हा विधानसभेत गदारोळ
भास्कर जाधव, देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबईः भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनंतर (Aditya Thackeray) आमदार भास्कर जाधव (Bhaskar  Jadhav) यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद आज विधानभवनात उमटले. ‘कुणी तरी सांगितलं दोन बिस्किटं देतो. जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव आहे,’ असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. त्यावरून भास्कर जाधव यांनी सभागृहात संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. तसंच याआधीच्या अधिवनेशनाचा किस्सा सांगत त्यांनी फडणवीसांवर ताशेरे ओढले.

त्यावेळी फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली?- भास्कर जाधव

सभागृहात भास्कर जाधव म्हणाले, मला फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि नाना (हरिभाऊ बागडे) यांना प्रश्न विचारायचा आहे. जर मला दोन बिस्किट घालून चावायला सांगितलं आणि मी कुत्रा असेल तर मी असं म्हणणार नाही. त्याचेवळी नितेश राणेंना दादांनी विचारायला पाहिजे होतं की, जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार भांडत होते, तेव्हा तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 19 जणांना निलंबित केलं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मला किती बिस्किटं खायला घातली होती, हे चंद्रकांत दादांनी नितेशला विचारायला हवं होतं, असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला.

भाजपची भूमिका आधीच स्पष्ट- चंद्रकांत पाटील

भास्कर जाधव यांनी सभागृहात हा सवाल केल्यानंतर भवनात एकच गोंधळ उडाला. नितेश राणेंना निलंबित करा, अशी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी उभे राहून हा विषय येथेच संपवण्याची मागणी केली. तसंच नितेश राणेंची जशी तुमच्याकडे क्लिप आहे, तशीच देवेंद्र फडणवीस यांचीही क्लिप आहे. जे घडलं, ते योग्य नाही, असं त्यांनी त्यात स्पष्ट म्हटलं. तरीही हा विषय येथेच संपवून सभागृह संपल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलवून कोणत्या शब्दांवर आक्षेप घेतला पाहिजे, यावर चर्चा करावी, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

इतर बातम्या-

तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, विधानसभेत पुन्हा गदारोळ, जाधवांचे भाजपला खडे सवाल

VIDEO: निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याचा ठराव टिकणार का?; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, तर्कवितर्कांना उधाण