
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सगळीकडेच वातावरण राजकीय झाल्याचं पाहायला मिळतंय. नेत्यांचे मोठे मोठे होर्डिंग्ज लागले आहेत. अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला असून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन ही करण्यात आलं आहे. राज्यात महाविकासआघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणुकीत त्यामुळे सगळ्याच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकासआघाडी आणि महायुती दोघांनीही आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत ही महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये कुतुहल आहेच. असं असताना जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचे असेल तर त्या पक्षाला विदर्भात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. विदर्भातील मतदार ज्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देता तो पक्ष विजयी होतो असं राजकीय गणित सांगतं. लोकसभेच्या 10 आणि विधानसभेच्या 62 जागांच्या या प्रदेशात काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये मुख्य लढत आहे....