Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : नाराज छगन भुजबळ घेणार कार्यकर्त्यांचा मेळावा

Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE Updates : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडेल.

Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : नाराज छगन भुजबळ घेणार कार्यकर्त्यांचा मेळावा
महत्वाची बातमी
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 31, 2025 | 6:13 PM

Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडेल. आज सभागृहात २० विधेयक मांडण्यात येणार आहेत. कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन गाजणार आहे. तसेच विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यासोबतच आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Dec 2024 05:00 PM (IST)

    नाराज छगन भुजबळ घेणार कार्यकर्त्यांचा मेळावा

    नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाराज छगन भुजबळ कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. भुजबळांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बुधवारी सकाळी 11 वाजता मेळावा होणार आहे. राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मेळाव्याा उपस्थित राहणार आहेत. नाराज छगन भुजबळ मेळाव्यात काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

  • 16 Dec 2024 04:49 PM (IST)

    वाढवण बंदराच्या भूसंपादनाला स्थानिकांकडून विरोध

    मोठी बातमी समोर आली आहे. वाढवण बंदराच्यासाठी बावडा येथे सुरू असलेल्या भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.स्थानिकांकडून विरोध करण्यात आला आहे. या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांसह संघटना आक्रमक झाल्या आहेत.

     

     

  • 16 Dec 2024 04:37 PM (IST)

    सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर वैकुंठ धाम स्मशानभूमीत होणार अंत्यविधी

    परभणीतून मोठी अपडेट समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचं पार्थिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे आणण्यात आलं आहे. अंतिम यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या रथामध्ये मृतदेह ठेवण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर स्वतः थांबले आहेत. वैकुंठ धाम समशानभूमीत अंत्यविधी होणार आहेत.

  • 16 Dec 2024 04:21 PM (IST)

    कुर्ला बेस्ट अपघात, मृतांचा आकडा 8 वर

    कुर्ला बेस्ट अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांचा आकडा 8 वर पोहचला आहे. फजलू शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

  • 16 Dec 2024 04:04 PM (IST)

    परभणीतील घटनेचे विरारमध्ये पडसाद, आंबेडकरवादी संघटनांकडून आंदोलन, प्रशासनाचा निषेध

    परभणीतील घटनेचे विरारमध्ये पडसाद पाहायला मिळाले आहेत. आंबेडकरवादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळेस या संघटनांकडून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर विरार पोलीस ठाण्यासमोर सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत तीव्र आंदोलन केले आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय आंबेडकर वादी संघटना एकत्र आल्या होत्या.

  • 16 Dec 2024 03:59 PM (IST)

    मी नाराज असण्याचं कारण नाही- सुधीर मुनगंटीवार

    मी नाराज असण्याचं कारण नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मंत्रि‍पदासाठी नाव असल्याचं सांगण्यात आलं होतं, याबाबतचा खुलासाही मुनगंटीवार यांनी केलं आहे. पक्षाने दिलेल्या पदासाठी मी काम करतो, असंही त्यांनी पुढे सांगितलं. आता विधानसभेत जनसामन्यांचे प्रश्न मांडणार आहे.

  • 16 Dec 2024 03:52 PM (IST)

    भाजपचे नाराज नेते सुधीर मुनगंटीवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला

    भाजपचे नाराज नेते सुधीर मुनगंटीवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. गेल्या एक तासापासून मुनगंटीवार नितीन गडकरी यांच्या घरी असून दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

  • 16 Dec 2024 03:49 PM (IST)

    नोएडामध्ये गांजा आणि चरस पुरवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

    नोएडामध्ये ऑनलाइन गांजा आणि चरस पुरवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या लोकांवर नोएडा-एनसीआरमधील नामांकित विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरवठा केल्याचा आरोप आहे.

  • 16 Dec 2024 03:23 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील शिवार रस्त्यांसाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

    पेरू वाटप करत शेतकऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत जाण्यासाठी शिवार रस्ते प्रश्न मार्गी लावण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली.

  • 16 Dec 2024 03:10 PM (IST)

    गृहमंत्रालयाचा काही उपयोग नाही; अखिलेश यादव यांचा केंद्रावर हल्लाबोल

    समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मणिपूरचा उल्लेख करताना गृहमंत्रालयावर हल्लाबोल केला आहे. गृह मंत्रालय हे आता उपयुक्त मंत्रालय राहिलेले नाही. त्यामुळे दिल्ली किंवा मणिपूर दोन्हीही सुरक्षित नाहीत.

  • 16 Dec 2024 01:55 PM (IST)

    बुलढाण्यात भुजबळ समर्थकांचे आंदोलन

    ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भुजबळ समर्थकांनी निषेध केला. तसेच सिंदखेडराजा येथे मोर्चा काढून नागपूर ते पुणे हा महामार्गवर रास्ता रोको करण्यात आले.

  • 16 Dec 2024 01:42 PM (IST)

    भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने नाराजी

    मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान न दिल्याने ओबीसी समाज नाराज झाला आहे. अहिल्यानगरच्या माळीवाडा येथे महायुतीचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. भुजबळ यांचा वापर केला असल्याची प्रतिक्रिया ओबीसी समाजाने दिली.

  • 16 Dec 2024 01:27 PM (IST)

    भाजप नेते सुधीर मनगंटीवार नाराज

    देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप नेते सुधीर मनगंटीवार नाराज झाले असल्याची चर्चा आहे. नागपुरात असूनही ते विधिमंडळ अधिवेशनात आले नाही.

  • 16 Dec 2024 01:18 PM (IST)

    राज्यसभेवर जाणार नाही- भुजबळ

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यास नकार दिला. आता राज्यसभेवर जाणे म्हणजे मतदारांच्या विश्वासाला तडा देणे होय, असे ते म्हणाले.

  • 16 Dec 2024 01:05 PM (IST)

    माजलगाव, वडवणी, बीड बंद

    परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा कारागहातच मृत्यू या घटनेने परभणीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय. याच अनुषंगाने आज माजलगाव, वडवणी आणि बीड बंदची हाक आंबेडकरी जनतेच्या वतीने देण्यात आलेली आहे.

  • 16 Dec 2024 12:56 PM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकरांच्या नावाचीही चर्चा- सूत्र

    भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकरांच्या नावाचीही चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे. रवींद्र चव्हाणांसह प्रवीण दरेकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी शर्यत वाढली असून कुणाच्या गळ्यात माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 16 Dec 2024 12:51 PM (IST)

    सोमनाथ सूर्यवंशीला अमानुष मारहाण झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप

    सोमनाथ सूर्यवंशीला अमानुष मारहाण झाल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशींना अटक झाली होती.

  • 16 Dec 2024 12:46 PM (IST)

    नाराज छगन भुजबळ थोड्याच वेळात नाशिकला रवाना होणार

    नाराज छगन भुजबळ थोड्याच वेळात नाशिकला रवाना होणार आहेत. नागपूर अधिवेशनातून भुजबळ नाशिकला रवाना होणार आहेत. भुजबळांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती आहे.

  • 16 Dec 2024 12:34 PM (IST)

    गुन्हेगार कोणीही असो आम्ही सोडणार नाही- फडणवीस

    “कुठल्याही आरोपीला वाचवा असा सरकार पक्षाकडून दबाव नाही. गुन्हेगार कोणीही असो आम्ही सोडणार नाही. या प्रकरणात पोलीस जर सहभागी असेल तर त्यांच्यावरही कारवाई करू,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

  • 16 Dec 2024 12:25 PM (IST)

    बीडमधील सरपंचाच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर- फडणवीस

    “बीड हत्या प्रकरणात फरार आरोपींचा शोध घेणार. बीडमधील सरपंचाच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर आहे. पीआयला सक्तीच्या रजेवर पाठवलंय आणि याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी कुठल्या पक्षाचा, जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलंय.

  • 16 Dec 2024 12:21 PM (IST)

    बीड सरपंच हत्येच्या गुन्ह्यात अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाचाही सहभाग- अंबादास दानवे

    “पोलिसांनी आरोपीला सहकार्य केलं. गुन्ह्यात अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाचाही सहभाग आहे. वाल्मिक कराड यांनी आरोपींना फोन केल्याची माहिती आहे. तीन आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. आरोपींचे राजकीय धागेदोरे तपासा,” अशी मागणी अंबादास दानवेंनी केली.

  • 16 Dec 2024 12:17 PM (IST)

    बीडमध्ये पोलिसांनी आरोपींसोबत पार्टी केली, चहापान केला- अंबादास दानवे

    “बीड सरपंच हत्येप्रकरणी लगेच जामिनही मिळाला. बीडमध्ये पोलिसांनी आरोपींसोबत पार्टी केली, चहापान केला. पोलिसांनी वॉचमनची तक्रारही दाखल करून घेतली नाही. सरपंचाची हत्या झाल्यानंतर पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यात आली,” असं अंबादास दानवे विधान परिषदेत म्हणाले.

  • 16 Dec 2024 12:10 PM (IST)

    मी एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय.. – छगन भुजबळ

    “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय.. मला काही फरक पडत नाही. मंत्रिपद किती वेळा आलं आणि गेलं. पण भुजबळ काही संपला नाही. माझे फोटो पोस्टरवर नाहीत, ही चांगलीच गोष्ट आहे. बॅनर्सवर कधीकधी जागा नसते”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

     

  • 16 Dec 2024 11:55 AM (IST)

    परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांकडून खबरदारी

    परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांकडून खबरदारी.  कोल्हापुरातील चौका चौकात पोलीस बंदोबस्त वाढवला.

    कोल्हापूरच्या बिंदू चौकात पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात.

    परभणीतील घटना आणि आज महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी लावला बंदोबस्त

  • 16 Dec 2024 11:45 AM (IST)

    महायुतीमधील काही मंत्र्यांवर अजूनही ईडीच्या केसेस प्रलंबित

    महायुतीमधील काही मंत्र्यांवर अजूनही ईडीच्या केसेस प्रलंबित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा त्यात समावेश आहे. त्यांच्यापैकी कोणावरही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. क्लोजर रिपोर्टही अजून दाखल करण्यात आलेला नाही.

    या सर्वच मंत्र्यांनी मंत्रीमंडळ विस्तारादरम्यान शपथ घेतली आहे.

  • 16 Dec 2024 11:20 AM (IST)

    छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने समर्थकांचे छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन…

    माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

    छगन भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जात असून अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली, वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या.  भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • 16 Dec 2024 11:12 AM (IST)

    राज्यात गंभीर घटना घडत आहेत, सरकारनं उत्तर द्यायची तयारी दाखवावी – नाना पटोले

    परभणी, बीडमधील घटना सरकार आल्यानंतर घडल्या आहेत, गंभीर घटना घडत आहेत, सरकारनं उत्तर द्यायची तयारी दाखवावी – नाना पटोले यांची मागणी

  • 16 Dec 2024 10:54 AM (IST)

    Maharashtra News: परभणीतील आंदोलन दरम्यान अटकेत असलेला आरोपीचे मृत्यू प्रकरणाचे सोलापुरात पडसाद

    परभणीतील आंदोलन दरम्यान अटकेत असलेला आरोपीचे मृत्यू प्रकरणाचे सोलापुरात पडसाद… कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन… न्यायालयीन कोठडीत मृत झालेल्या सूर्यवंशीला न्याय द्या… या मागणीसाठी आंदोलन

  • 16 Dec 2024 10:40 AM (IST)

    Maharashtra News: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेवर लक्ष केंद्रीत

    आज अधिवेशनाचा पहिला दिवस.. पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले… विधान परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही रांगोळी काढण्यात आली आहे… सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चार बाय सहा अशी रांगोळी साकारण्यात आली… माहिती सरकार मधली ही महत्वकांक्षी योजना आहे..

  • 16 Dec 2024 10:24 AM (IST)

    Maharashtra News: बीड आणि परभणीत काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी… सुप्रिया सुळे

    बीड आणि परभणीत काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी… कोठडीतील सोमनाथच्या मृत्यूप्रकरणी चौकशी व्हायला हवी… असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे…

     

  • 16 Dec 2024 10:12 AM (IST)

    Maharashtra News: परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण

    सोमनाथ सूर्यवंशी यांचे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन सुरू… परभणीत आज दुपारी होणार अंत्यसंस्कार… बाळासाहेब आंबेडकर अंत्यविधीसाठी राहणार उपस्थित… घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू… घाटी रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त…

  • 16 Dec 2024 09:52 AM (IST)

    संजय कुटेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक

    बुलढाणा : भाजपा नेते संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी कूच करणार आहेत. आमदार संजय कुटे पाच वेळा निवडून आले तरी मंत्रिपद न मिळाल्याने जळगांव जामोद मतदार संघातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

  • 16 Dec 2024 09:50 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल २९ वर्षांनी दोन मंत्रिपदे

    रत्नागिरी- जिल्ह्यात तब्बल २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रीपदे मिळाली आहे. १९९५ साली रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन मंत्री पदे मिळाली होती. मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळामध्ये रविंद्र माने आणि रामदास कदम या दोन मंत्र्यांचा समावेश होता. त्यानंतर आता तब्बल २९ वर्षांनी उदय सामंत आणि योगेश कदम यांच्या रुपाने दोन मंत्रीपद मिळाली आहेत.

    उदय सामंत यांनी चौथ्य़ांदा घेतली मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आता पालकमंत्री कोण याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. खासदार भाजपचा असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजप स्वतःकडे ठेवणार की शिवसेनेला देणार यासाठी चढाओढ लागली आहे.

  • 16 Dec 2024 09:36 AM (IST)

    राज्यात बिनखात्याचे सरकार, संजय राऊतांचा घणाघात

    राज्यात बिनखात्याचे सरकार आहे. मंत्रिपदाचा फॉर्म्युला ६-६ महिन्यांचा करायला हवा. ज्याला त्याला कर्माची फळं नक्की मिळतात. छगन भुजबळांना वगळणयामागे जातीचं राजकारण आहे, असे संजय राऊत म्हणाले.

  • 16 Dec 2024 09:00 AM (IST)

    आज हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडली जाणार

    Maharashtra Assembly Winter Session Live : आज होणाऱ्या अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार आहेत. कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन गाजणार आहे. आजपासून सुरु होणारे हिवाळी अधिवेशन महायुती सरकारचे पहिले अधिवेशन असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

  • 16 Dec 2024 08:56 AM (IST)

    लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीवर चर्चा होणार

    Maharashtra Assembly Winter Session Live : महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15 व्या विधानसभेचे नियमित होणारे हे पहिलेच अधिवेशन असेल. या अधिवेशनात लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार आणि इतर अनेक बाबींबर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. तसेच सरकारकडून यावर काहीतरी ठोस निर्णय घेतले जावे, अशीही अपेक्षा केली जात आहे.

  • 16 Dec 2024 08:51 AM (IST)

    फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन गाजणार

    Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार आहेत.