SSC Result 2025 Maharashtra Board: राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35% टक्के

SSC Result 2025 Maharashtra Board: राज्यात 285 विद्यार्थी 35% टक्कांनी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमामे दाहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. एवढंच नाही तर, दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.

SSC Result 2025 Maharashtra Board: राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35% टक्के
फाईल फोटो
| Updated on: May 13, 2025 | 11:52 AM

SSC Result 2025 Maharashtra Board: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर यंदाच्या वर्षी राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35% टक्के मिळाले आहेत.

राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35% टक्के

राज्यात 35 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर, पुणे – ५९ विद्यार्थी, नागपूर – ६३ विद्यार्थी, छत्रपती संभाजी नगर – २८ विद्यार्थी, मुंबई – ६७ विद्यार्थी, कोल्हापूर – १३ विद्यार्थी, अमरावती – २८ विद्यार्थी, नाशिक – ९ विद्यार्थी, लातूर – १८ विद्यार्थी, कोकण – ० विद्यार्थी, एकूण २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत.

राज्यात 100 टक्के मिळवलेले विद्यार्थी

राज्यात १०० टक्के मिळवलेले विद्यार्थी २११ आहेत. त्यात पुण्यात १३, नागपूरमध्ये ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २, लातूर ११३, कोकण ९ विद्यार्थी 100 टक्क्यांसह उत्तीर्ण झाले आहेत.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळाणार 11 वीत प्रवेश, पण कसं? 

एटीकेटी असल्यामुळे एक किंवा दोन विषयात विद्यार्थी नापास झाला तरी ११ वीत प्रवेश दिला जातो. १२ वी ला जाण्यापूर्वी फेब्रुवारीतील परीक्षा उत्तीर्ण झाला आणि ११ वीची परीक्षा पास झाला तर विद्यार्थी १२ वीसाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरू शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली.

विद्यार्थ्यांच्या गुणाबद्दल काही शंका असेल तर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करण्याची सोय देखील करून दिली आहे. उद्यापासून म्हणजे १४ मे पासून २८ मे पर्यंत गुण पडताळणी करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना  मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना फि भरावी लागणार आहे. गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी ५० रुपये भरावे लागणार असल्याची माहिती देखील अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.