Maharashtra News LIVE Update | उल्हासनगरात नगरसेवक मारहाण प्रकरण, शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक

| Updated on: Aug 26, 2021 | 12:04 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | उल्हासनगरात नगरसेवक मारहाण प्रकरण, शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Aug 2021 10:52 PM (IST)

    दोन मुलांचा खून करुन आईचा आत्महत्येचा प्रयत्न

    सातारा / कराड : दोन मुलांचा गळा दाबून खून करुन आईचा आत्महत्येचा प्रयत्न

    पतीच्या अपघाती निधनाने मानसिक दृष्ट्या खचलेल्या महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून केला खून

    कराड शहरातील रुक्मिणी नगरातील घटना

    स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

  • 25 Aug 2021 10:51 PM (IST)

    उल्हासनगरात नगरसेवक मारहाण प्रकरण, शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक

    उल्हासनगर : उल्हासनगरात भाजप नगरसेवकाला काळं फासल्याचं प्रकरण

    शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

    उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी केली चौघांना अटक

    ज्ञानेश्वर मरसाळे, हरीश खेत्रे, महेंद्र पाटील, विनोद साळेकर अशी चौघांची नावं

    शिवसेनेच्या विरोधात पोस्ट करत असल्यानं, बोलत असल्यानं फासलं होतं काळं

    चौघांनाही उद्या न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती

    आणखी 7 ते 8 जण फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथकं रवाना केल्याची माहिती

  • 25 Aug 2021 06:07 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 399 नवे कोरोनाबाधित, 216 रुग्णांना डिस्चार्ज

    पुणे : दिवसभरात ३९९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २१६ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४. - २०८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९४१८५. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०६६. - एकूण मृत्यू -८८९८. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८३२२१. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८९६१.

  • 25 Aug 2021 06:06 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 4 नवे कोरोनाबाधित

    नागपूर :

    नागपुरात आज 4 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद

    1 रुग्णाने केली कोरोनावर मात

    तर शून्य मृत्यू

    तर आज 3 हजार 883 चाचण्या झाल्या

    एकूण रुग्ण संख्या 493000

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 482807

    एकूण मृत्यू संख्या 10118

  • 25 Aug 2021 04:38 PM (IST)

    शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत? नारायण राणे यांचा सवाल

    नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    मी सकाळी पाच वाजता मुंबईत पोहोचलो. आज हायकोर्टात माझ्याविरोधात ज्या केसेस शिवसेनेकडून दाखल करण्यात आल्या आहेत त्याबाबत आज साडेतीन वाजता लागले आहेत. दोन्ही निकाल माझ्याबाजूने लागलेला आहे. याचा अर्थ देश कायद्याने चालतोय हे सिद्ध झालं आहे. 17 सप्टेंबरपर्यंत कोर्टाची केस असल्याने मी काही गोष्टींवर भाष्य करणार नाही. पण एवढा दौरा केल्यानंतर पत्रकारांना न भेटणं योग्य वाटणार नाही. म्हणून पत्रकारांना माहिती द्यावी या भावनेतून ही पत्रकार परिषद घेतली आहे.

    गेले काही दिवस माझा जनआशीर्वाद यात्रा चालू असताना जे काही प्रसारमाध्यमात येत होतं त्याची सगळी माहिती मिळत होती. काहीजण माझ्या चांगूलपणाचा फायदा घेतात हे लक्षात आलं. त्यावर मी आज काही बोलणार नाही. आमची यात्रा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होऊन सात वर्ष झाली. या सातवर्षात त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवलं ते सांगण्यासाठी ही यात्रा होती. दुसरं म्हणजे देशाच्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. राज्यातील आणि देशातील अनेक खासदारांना मंत्री बनवण्यात आलं. त्यांना मोदींनी सर्वांना आपापल्या राज्यात जनतेचं आशीर्वाद मागण्यास सांगितलं. तसंच तुमच्या खात्याला सुरुवात करण्यास सांगितलं. त्यानुसार आम्ही १९ तारखेपासून जनआशीर्वाद सुरु केली. मी कालपर्यंत यात्रेत होतो. दोन दिवस गॅप ठेवलाय. परवापासून यात्रा सुरु होईल.

    या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरु केला. त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे? आम्ही पाहिलीच नाही. आक्षेप नाही. शिवसेनेच्या नेत्याने असे शब्द उच्चारले नाहीत?

    १ ऑगस्टला बीडीडी चाळीचं पूलबांधणीचा कार्यक्रम होता. त्याअगोदर आमचे आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवन बद्दल काहीतरी वक्तव्य केलं होतं. आमच्या महिलांवर हात टाकला तर, असं बोलले होते. मी जे बोललो होतो आपल्या देशाला अभिमान नसेल त्याला राष्ट्रीय सण माहीत नसतात. देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मला सहन झालं नाही. त्यामुळे मी ते बोललो. ते महाशय काय बोलले, म्हणजे मुख्यमंत्री, सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल तर त्याचं थोबडं तोडा, आदेश दिले. हा क्राईम नाही? 120 बी होत नाही? पत्रकारांनी मला शिकवावं. नाहीतर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलो आहे. दुसरं एक वाक्य आहे, योगी साहेबांबद्दल. हा योगी आहे का ढोंगी? चपलाने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारलं पाहिजे. तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल, मी आणि अमित शाह यांनी बसून ज्या काही पुढच्या वाटचालीबद्दल आखणी केली होती आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. हा अनपार्लीमेंट शब्द नाही? आपले आधी तपासले पाहिजे. याच्यात तो गाळलेला शब्द आहे. काय हो माननीय पवार साहेब? काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं ते चुकीचं केलं असं मला वाटत नाही. काय भाषा आहे. आम्ही राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो.

    चिपळूणला झेंडो दाखवले. मी म्हटलं ठीक आहे भगवे झेंडे आहेत. शिवसैनिकांची प्रचंड गर्दी? 17 माणसं होती. मी मुद्दाम मोजली. त्यापुढे आम्ही गेलो. तिथे एका कोपऱ्यामध्ये आवाज बाहेर येत नव्हते तरी काढत होते. 13 माणसं. आमच्या घरावर किती आले ते मी मोजले नाहीत. पण पराक्रमी लोकांचे व्हिडीओ क्लीप मिळतील. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे कारायचं ते केलं. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत? एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही. तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यावेळी आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे होते तेही माहिती नाही. म्हणून त्यांना आंदोलन करायचं ते करु दे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था पाहत राहावं.

  • 25 Aug 2021 04:04 PM (IST)

    नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, नाशिकच्या गुन्ह्या प्रकरणी कारवाई न करण्याचे आदेश

    नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, राणे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने नाशिकच्या गुन्ह्या प्रकरणी कोणतेही कठोर कारवाई करु नये, असा आदेश दिला आहे. पण पुण्याच्या गुन्ह्याबाबत दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला असणार आहे.

  • 25 Aug 2021 03:59 PM (IST)

    मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कुडाळात 23 भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

    सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मनाई आदेश असताना बेकायदा जमाव करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन झाल्यानंतर फटाके वाजवून जल्लोष केल्याप्रकरणी कुडाळ येथील भाजपच्या 23 हून अधिक कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भाजपच्या महिला ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, नगरसेवक राकेश कांदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

  • 25 Aug 2021 03:57 PM (IST)

    भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

    यवतमाळ : अखेर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, भाजप आमदार नामदेव ससाणे, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याचबरोबर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी भाजप पदाधिकारी दाखल

  • 25 Aug 2021 01:57 PM (IST)

    नारायण राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दुपारी 2.30 नंतर सुनावणी होणार

    नारायण राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दुपारी 2.30 नंतर सुनावणी होणार आहे .

    खालील मुद्द्यांवर होणार सुनावणी

    ते निर्दोष असून त्यांना विनाकारण या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे

    ह्या प्रकरणात अधिक तपास करण्याची गरज नाही, तपास पूर्ण झाला आहे

    नारायण राणे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून त्यातील कलमे साधर्म आहे त्यामुळे ह्यातून फक्त विनाकारण त्रास देण्याच्या अनुशनगणे गुन्हे दाखल केले आहेत

    म्हणून नारायण राणें हयांच्या विरोधात राज्यात दाखल गुन्हे रद्द करण्यात यावा असि याचिकेत माँगणी

  • 25 Aug 2021 01:55 PM (IST)

    शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते सोनिया गांधी यांच्यावर बोलले, मग त्यांना अटक होणार का? - खासदार नवनीत राणा

    राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर काल अटकेची कारवाई करण्यात आली. केवळ बोलण्यामुळे जर केंद्रीय मंत्र्यावर अटकेची कारवाई केली जाते तर यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल स्टेजवरून अनेकदा खालच्या स्तरावरून टीका केली. त्या नेत्यांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करणार काय असा सवाल अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच राणे यांची अटक ही केवळ सूडबुद्धीचे राजकारण असल्याची टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

  • 25 Aug 2021 01:53 PM (IST)

    4 सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा

    4 सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा

    आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना हॉलतिकीट उपलब्ध,

    4 सप्टेंबरलाच संयुक्त गट ब ची पुर्वपरीक्षा होणार,वेळापत्रकात बदल होणार नाही

    1 तास आधी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना हजर राहण्याच्या सूचना,

    कोरोना नियमांच पालन करून होणार परीक्षा,

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीपत्रक केलं जारी

  • 25 Aug 2021 11:57 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जामीनानंतर जिल्हाभर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरुच

    सिंधुदुर्ग -

    केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जामीनानंतर जिल्हाभर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरुच

    कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान चरणी आरती करून आनंद साजरा

    काल राणे साहेबांना जामीन मिळावा यासाठी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान चरणी करण्यात आला होता नवस

    राणेंची जामिनावर सुटका झाल्यामुळे आज कार्यकर्त्यांकडून आरती करून फेडण्यात आला नवस

    राजा चरणी घालण्यात आले गाऱ्हाणे

    तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून केला आनंद व्यक्त

    भाजप कार्यालयाबाहेर फटाके फोडून एकच जल्लोष

    'आता कसं वाटतय गारगार वाटतय', 'राणे साहेब अंगार है बाकी सब भंगार है'

    उत्साही कार्यकर्त्याच्या राणेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा

  • 25 Aug 2021 11:32 AM (IST)

    नारायण राणे यांच्या समर्थानात भाजपचे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    उस्मानाबाद -

    नारायण राणे यांच्या समर्थानात भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    अटक केल्याच्या निषेधार्थ ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

    तालिबानी सरकार असा उल्लेख करीत निषेध

  • 25 Aug 2021 11:21 AM (IST)

    उस्मानाबादेतील रिक्षा चालक फरीद शेख मारहाण प्रकरण, तीन पोलिसांवर गुन्हा दाखल

    उस्मानाबाद

    रिक्षा चालक फरीद शेख मारहाण प्रकरण

    पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, पोलीस वाहन चालक पोकॉ मुक्रम पठाण यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दखल

    भादंवि ३४१, ३२४,३२३,५०४,३४ आदी कलम अंतर्गत गुन्हा नोंद

    रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आणून मारहाण व शिवीगाळ केली

    पोलीस निरीक्षक चव्हाण यांची सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली

  • 25 Aug 2021 10:03 AM (IST)

    भाजप नगरसेवकाला शिवसैनिकांनी काळं फासल्याचं प्रकरण, उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    उल्हासनगर :

    भाजप नगरसेवकाला शिवसैनिकांनी काळं फासल्याचं प्रकरण

    उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

    शिवसेनेच्या १० ते १२ कार्यकर्त्यांवर मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल

    अद्याप कुणालाही अटक केलेली नसल्याची पोलिसांची माहिती

  • 25 Aug 2021 10:02 AM (IST)

    औरंगाबाद येथील घाटी रुग्णलायत परिचरिकांचे काम बंद आंदोलन सुरु

    औरंगाबाद -

    औरंगाबाद येथील घाटी रुग्णलायत परिचरिकांचे काम बंद आंदोलन सुरु

    घाटी रुग्णालयातील सर्व परिचारिकांनी पुकारला संप..

    शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय साहित्य,सलाईन, औषधी नसल्याने परिचरिकांनी केले काम बंद..

    कामबंद आंदोलनात 300 परीचारिका सहभागी..

    रुग्णांच्या सेवेत औषधी उपलब्ध नसल्याने,रुग्णांना औषधींचा पुरवठा व्हावा यासाठी काम बंद आंदोलन..

    जोपर्यंत औषधींचा पुरवठा मिळणार नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा परिचरिकांचा निर्णय..

  • 25 Aug 2021 10:02 AM (IST)

    नाशिकच्या शालिमार परिसरात झालेल्या राड्यानंतर 10 शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात

    - नाशिकच्या शालिमार परिसरात झालेल्या राड्यानंतर 10 शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात

    - तर भाजपचे पदाधिकाऱ्यांच्या शोधात पोलीस

    - एकमेकांविरोधात शहरातील पोलिसांत तक्रारी

  • 25 Aug 2021 08:15 AM (IST)

    सराईत गुन्हेगार भाच्याच्या मदतीने मावशीने केला सासूचा खून

    पिंपरी चिंचवड

    -सराईत गुन्हेगार भाच्याच्या मदतीने मावशीने केला सासूचा खून

    -खून केल्यानंतर सासूचा मृतदेह देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेला टाकून दिला होता

    -याप्रकरणाची गुन्हे शाखा युनिट दोनने आणि देहूरोड पोलिंसानी उकल करत सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आलीय

    -याप्रकरणी इम्तियाज ऊर्फ चिंट्या मुस्ताक शेख असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे तर मुन्नी जोगदंड असे आरोपी मावशीचे नाव आहे.

    - दोघांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    -या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमला पोलीस आयुक्त यांनी 40 हजारांचे बक्षीस जाहीर केलं

  • 25 Aug 2021 08:14 AM (IST)

    नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आजही कडक पोलीस बंदोबस्त

    मुंबई

    - नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आजही कडक पोलीस बंदोबस्त… - राणे रात्री पावणे पाचला मुंबईतील निवासस्थान अधीश इथे पोहोचले आहेत… - काल घरासमोर जो राडा झाला त्यानंतर खबरदारीचा ऊपाय म्हणून पोलिसांची तैनाती… - आज राणे कुटूंब स्वता प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देणार असल्याची सुत्रांची माहीती…

  • 25 Aug 2021 08:13 AM (IST)

    ओबीसी निर्धार मेळाव्याला कुरेशी संघटनेचा पाठिंबा

    सोलापुर -

    ओबीसी निर्धार मेळाव्याला कुरेशी संघटनेचा पाठिंबा

    31 ऑगस्टला सोलापुरात होणार आहे ओबीसी संघटनेचा निर्धार मेळावा

    ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात ओबीसी संघटनेचा निर्धार मेळावा

    काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे ओबीसी संघटनेचा निर्धार मेळावा

  • 25 Aug 2021 08:13 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील 29 औषध दुकानांचे परवाने वर्षभरात रद्द, तर 146 दुकानांचा परवाना निलंबनाची कारवाई

    पुणे :

    जिल्ह्यातील 29 औषध दुकानांचे परवाने वर्षभरात रद्द, तर 146 दुकानांचा परवाना निलंबनाची कारवाई

    अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) देण्यात आली माहिती

    औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यातील वेगवेगळ्या नियमांचा भंग केल्याने ही करवाई

    पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील औषध दुकानांविरोधात कारवाई

  • 25 Aug 2021 08:12 AM (IST)

    पुणे महानगर नियोजन समितीच्या ३० सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सप्टेंबरमध्ये जाहीर

    पुणे :

    पुणे महानगर नियोजन समितीच्या ३० सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सप्टेंबरमध्ये जाहीर

    प्रत्यक्ष मतदान नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता

  • 25 Aug 2021 08:12 AM (IST)

    नागपुरात पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

    नागपूर

    - पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

    - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाला आव्हान

    - पीओपी मूर्तिकार संघाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली याचिका

    - याचिकेवर लवकरच सुनावणी होणार

    - विदर्भातील जवळपास १० हजार मूर्तिकार पीओपी मूर्तींचा व्यवसाय करतात

    - पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी घातल्याने आर्थिक संकट वाढलं

  • 25 Aug 2021 08:11 AM (IST)

    खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी

    पुणे

    खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी

    गतवर्षी २४ ऑगस्ट रोजी प्रकल्पात होता २८.४८ टीएमसी पाणीसाठा

  • 25 Aug 2021 08:11 AM (IST)

    नारायन राणेंच्या अडचणीत वाढ, नाशिक पोलिसांनी बजावली राणेंना नोटीस

    नाशिक -

    नारायन राणेंच्या अडचणीत वाढ..

    नाशिक पोलिसांनी बजावली राणेंना नोटीस..

    2 तारखे पर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश..

    नाशिकमध्ये दाखल झाला राणें विरोधातला पहिला गुन्हा..

  • 25 Aug 2021 08:10 AM (IST)

    सेना भाजप राडा प्रकरण, नाशकात 100 हुन अधिक जणांवर गुन्हा दाखल

    नाशिक - सेना भाजप राडा प्रकरण..

    100 हुन अधिक जणांवर गुन्हा दाखल..

    भद्रकाली पोलोस ठाण्यात केले गुन्हे दाखल..

    सेना भाजप अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल..

    काल समोरा समोर झाला होता कार्यकेत्यांमध्ये राडा

  • 25 Aug 2021 08:09 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एक हजार पुस्तके दिली चिपळूणच्या वाचनालयास भेट

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एक हजार पुस्तके दिली चिपळूणच्या वाचनालयास भेट

    -चिपळूण शहरात आलेल्या महापुरात लोकमान्य टिळक वाचन मंदिर आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय दोन दिवस पुराच्या पाण्याखाली होते त्यामुळे पुस्तकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते

    -पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते एक हजार पुस्तके प्रदान केली.वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्याकडे ही पुस्तके सुपूर्द करण्यात आली

    -पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा इतर भेटवस्तू ऐवजी पुस्तके द्यावीत,असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी एक हजार पुस्तके भेट दिली होती

  • 25 Aug 2021 08:09 AM (IST)

    नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा, त्यांचं वागणं एखाद्या छपरी गँगस्टरसारखं; सामनातून नको नको त्या 5 उपमा देत 'प्रहार'!

  • 25 Aug 2021 08:08 AM (IST)

    राणेंना जामीन मिळाल्यानंतर मध्यरात्री नितेश राणेंचे सूचक ट्वीट

  • 25 Aug 2021 08:08 AM (IST)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची परीक्षा आणि इतर शुल्क माफ

    औरंगाबाद -

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला महत्वाचा निर्णय

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची परीक्षा आणि इतर शुल्क माफ

    कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांचे विद्यापीठ स्वीकारणार पालकत्व..

    प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाच्या फी मध्ये 50 टक्के फी माफी..

    न झालेल्या महोत्सवाची आणि कार्यक्रमाची पूर्णपणे फी माफी..

    फी माफी मुळे सात करोड पेक्षा जास्त रुपयांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठास नुकसान..

  • 25 Aug 2021 08:07 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सर्व केंद्रे बुधवारी बंद

    पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सर्व केंद्रे बुधवारी बंद

    -लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे आज बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे

  • 25 Aug 2021 08:07 AM (IST)

    महामेट्रोने नागपुरातील पाण्याची मुख्य पाईपलाईन फोडली, शहरातील काही भागात आज पाणीपुरवठा बंद

    - महामेट्रोने नागपुरातील पाण्याची मुख्य पाईपलाईन फोडली

    - फुटाळा पपिसरात ५०० मी. मी. व्यासाची मुख्य पाईपलाईन फुटली

    - पाईपलाईन फुटल्याने शहरातील काही भागात आज पाणीपुरवठा बंद

    - मेट्रोच्या कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने फुटली पाईपलाईन

    - फुटाळा, संजय नगर, हिंदूस्थान कॅालनी, पंकज नगर परिसरात आज पाणीपुरवठा बंद

  • 25 Aug 2021 08:02 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 90,738 नागरिकांकडून तब्बल 4 कोटी 58 लाखांचा दंड वसूल

    पिंपरी-चिंचवड

    - कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 90,738 नागरिकांकडून तब्बल 4 कोटी 58 लाखांचा दंड वसूल

    -पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून महापालिका प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे

    -सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्कविना फिरणे, सुरक्षित अंतर न पाळणे, विनाकारण बाहेर फिरणा-या तब्बल 90 हजार 738 नागरिकांवर आजपर्यंत कारवाई केली

    -त्यांच्याकडून तब्बल 4 कोटी 58 लाख 43 हजार 416 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे

  • 25 Aug 2021 08:01 AM (IST)

    नागपूर शहरात 9 हजार 800 पेक्षा जास्त घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

    - नागपूर शहरात 9 हजार 800 पेक्षा जास्त घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

    - महानगरपालिकेच्या सर्वेक्षणातून शहरात डेंग्यूची भयावह स्थिती उघड

    - डेंग्यूच्या अळ्या आढळलेल्या घरांवर कारवाई होणार का?

    - नागपूर महानगरपालिकेने केलं 1 लाख 85 हजार घरांचं सर्वेक्षण

    - नागपूर शहरात जानेवारी ते आतापर्यंत 442 डेंग्यू रुग्णांची नोंद

  • 25 Aug 2021 08:00 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपालिकांच्या कामकाजावर राज्याचे प्रधान सचिव नाराज

    सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपालिकांच्या कामकाजावर राज्याचे प्रधान सचिव नाराज

    संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी सांगितलेली माहिती स्वतः घेऊन हजर राहण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आली सूचना

    जिल्ह्यातील अक्कलकोट ,करमाळा, माळशिरस, सांगोला आणि मंगळवेढा या नगरपरिषदांच्या कामकाजावर प्रधान सचिवानी केली नाराजगी व्यक्त

    येणाऱ्या आढावा बैठकीत स्वतः मुख्याधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचा आदेश

    जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा आला चव्हाट्यावर

  • 25 Aug 2021 08:00 AM (IST)

    मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणीसाठी शरद पवार 2 सप्टेंबरला सोलापुरात

    सोलापूर -

    मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणीसाठी शरद पवार 2 सप्टेंबरला सोलापुरात

    2 सप्टेंबर रोजी रेल्वेने सकाळी सोलापुरात येथील व दुपारी बारामतीकडे मोटारीने रवाना होतील

    शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

    राष्ट्रवादीच्या बांधण्याबाबत पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेणार

    आगामी निवडणुकीत महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी मोर्चे बांधणी  करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली सुरू

    सोलापूर महानगर पालिकेत राष्ट्रवादीचे केवळ 4 नगरसेवक

  • 25 Aug 2021 07:11 AM (IST)

    नागपूर शहरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसचा शिरकाव

    - नागपूर शहरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसचा शिरकाव

    - शहरात पहिल्यांदाच डेल्टा प्लसच्या पाच रुग्णांची नोंद

    - धंतोली, हनुमान नगर आणि मंगळवारी परिसरात डेल्टा प्लसचे रुग्ण

    - आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना

    - डेल्टा प्लसचे रुग्ण बरे झाल्याची मनपाच्या आरोग्य विभागाची माहिती

    - या सर्वांचे नमुने जुलै महिन्यात पाठवले होते

  • 25 Aug 2021 06:38 AM (IST)

    सोलापूर ग्रामीणमध्ये पुन्हा कोरोनाबळी वाढले, 24 तासांत 11 जणांचा मृत्यू

    सोलापूर ग्रामीणमध्ये पुन्हा वाढले कोरोनाचे बळी

    24 तासात जिल्ह्यात 11  जणांचा कोरोनाने मृत्यू

    यातील 10 जण ग्रामीण भागातील तर 1 जण शहरातील

    ग्रामीण भागात 15 हजार 446 चाचण्यांमधून 462 जणांचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह

    तर शहरात 978 चांगल्या मधून 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

  • 25 Aug 2021 06:36 AM (IST)

    कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

    नालासोपारा -

    कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

    नारायण राणे यांना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी सत्तेचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकला असल्याचा व्हिडीओ दाखवत नालासोपाऱ्याच्या तुलिंज पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी

    भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वास सावंत यांनी आपल्या शिष्टमंडळासह रात्री उशिरा तुलिंज पोलीस ठाण्यात दिले निवेदन

    जर गुन्हा दाखल नाही झाला तर न्यायालयात दाद मागणार असल्याचेही सांगितले

  • 25 Aug 2021 06:35 AM (IST)

    मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसईच्या हद्दीत लागलेले नारायण राणे यांचे बॅनर शिवसैनिकांनी फाडून टाकले आहेत

    वसई :

    मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसईच्या हद्दीत लागलेले नारायण राणे यांचे बॅनर शिवसैनिकांनी फाडून टाकले आहेत

    शिवसेनेच्या बॅनर वर राणे यांच्या जनसंवाद यात्रेचे लावलेले बॅनर फाडून टाकण्यात आले आहेत.

    मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास नायगाव च्या शिवसैनिकांनी हे बॅनर फाडत नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा बाजीही केली आहे.

    यानंतर कोणतेही राणे यांचे बॅनर वसई ग्रामीण मध्ये लावू देणार नाहीत असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.

  • 25 Aug 2021 06:34 AM (IST)

    युवा सेनेचे शिलेदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीला

    युवा सेनेचे शिलेदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीला.

    काल(मंगळवार)रात्री युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची 'वर्षा' येथे भेट घेतली.

Published On - Aug 25,2021 6:30 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.