
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
चंद्रपूर: गुरे चारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
ब्रम्हपुरी वनविभागातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना
गोविंदपूर(चक) गावालगत जंगलात झाला हल्ला
आज संध्याकाळी झाला हल्ला
काशीनाथ तलांडे -62 असे आहे मयताचे नाव
शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेण्याची कारवाई सुरू
मुंबई : मुंबई अँटी नारकोटिक्स सेल एएनसीने गेल्या 7 महिन्यांत परदेशी ड्रग्ज विक्रेत्यांविरुद्ध केली कारवाई
अँटी नारकोटिक्स सेलने 7 महिन्यांत 2 किलो 989 ग्रॅम (कोकेन आणि एमडी) ड्रग्ज जप्त केला असून जप्त केलेल्या ड्रग्जची एकूण किंमत 6 कोटी 38 लाख रुपये
वांद्रे आणि घाटकोपर युनिट्सने ही कारवाई केली असून अटक केलेल्या ड्रग्स पेड़लर्समध्ये नायजेरिया, टांझानिया आणि आयव्हरी कोस्ट देशातील नागरिक आहेत.
10 नायजेरियन ड्रग्ज विक्रेत्यांविरूद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
नाशिक : महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कंत्राटी कामगाराचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू
येवला तालुक्यातील मुखेड येथील घटना
– संतप्त नातेवाईकांचा नगर-मनमाड राज्य मार्गावर रस्तारोको आंदोलन
– दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी केला होता येवला तालुका पोलीस स्टेशन समोरील नगर-मनमाड राज्यमार्गावर रस्ता रोको
– वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या
– राधू लक्ष्मण शेळके असे मृत कंत्राटी कामगाराचे नाव
पंढरपूर : आषाढी यात्रेवर निर्बंध लादनाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्याच्या दौऱ्यात शेकडो कार्यकर्ते
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीत कोरोना नियमांचे उल्लंघन
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजपासून पंढरपुरात संचारबंदी लागू
राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी थोपवण्यासाठी जयंत पाटलांच्या बैठका सुरू
राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या वसंतबाग निवासस्थानी सुरू आहे बैठक
मुंबई : दहावीच्या निकालात उद्भवलेल्या गोंधळाची चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश
पाच सदस्यीय समिती केली गठीत
संकेतस्थळाची जबाबदारी कोणाची आहे ? हे निश्चित करून कारवाई करण्याचे राज्य सरकारचे आदेश
विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्या आहे हे माहीत असताना तांत्रिक नियोजन केलं होतं का ? राज्य सरकारने बोर्डाला विचारला सवाल
15 दिवसात अहवाल देण्याचे आदेश
निकाल जाहीर झाल्यानंतर काही तास संकेतस्थळ झालं होतं क्रॅश
राज्य सरकारने अहवाल सादर करण्याचे माध्यमिक बोर्डाला दिले आदेश,
गोंधळाची चौकशी होऊन कारवाई कोणावर केली जाणार याकडे सगळ्यांच लक्ष
बीड: तीन तालुक्यात नवीन निर्बंध
आष्टी, पाटोदा, गेवराईत कडक निर्बंध
उद्यापासून सकाळी 7 ते 12.30 पर्यंत सूट
कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय
नियम डावलणाऱ्यावर कडक कारवाई करणार
जिल्हा प्रशासनाने काढले आदेश
नाशिक – नाशिकमध्ये पाणी कपातीचा निर्णय
– दर आठवड्याच्या गुरुवारी शहरात पाणी राहणार बंद
– या गुरुवार पासून निर्णय लागू
– धरणात 50 टक्के पाणीसाठा येईपर्यंत हा निर्णय लागू राहणार
गडचिरोली : जिल्ह्यातील लक्ष्मी मेडीगट्टा धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले
45290 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून सायंकाळी अजून बारा दरवाजे उघडण्यात येणार आहेत
सध्या गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसला तरी तेलंगणातील पावसाचा फटका या धरणाला बसत आहे
सध्या मेडीगट्टा धरणात एक लाख वीस हजार क्युसेक पाण्याचा साठा उर्वरित राहणार
गोदावरी प्राणहिता नदीच्या काठावरील गावांना अलर्ट
नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यलयात कोरोना आढावा बैठकीला सुरुवात
–
सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित
– जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
पुणे-पुणे-नाशिक महामार्गावरील उड्डाणपुलाच्या श्रेयवाडदावरून सुरू शिरूरचे राष्ट्रवादी चे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातला संघर्ष थांबण्याची चिन्ह नाहीत.
-हा वाद एवढा शिगेला पोहचलाय की मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत. कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असं वक्तव्य कोल्हे यांनी केलंय.
-त्यामुळे आता या दोघांमधला वाद सरकारवर परिणाम करतो का याची चर्चा सुरू झालीय.
पिंपरी चिंचवड – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला भेट
-पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासोबत चर्चा सुरू
मुंबई महानगरपालिकेचा अजब गजब कारभार उघड
एकाच नावाचे दोन कर्मचारी मनपा मध्ये कामाला
एक ओरिजिनल आहे , तर दुसरा डुप्लिकेट कर्मचारी
नाव , आडनाव , वाढदिवस दोघांचा आहे सेम टू सेम
सोपान मारुती कांबळे असं दोघे कर्मचाऱ्यांचा आहे नाव
दोघे हि महापालिकेत आहेत चतुर्थ श्रेणीचे कामगार
एक इमारत पर्यवेक्षक विभागात शिपाई तर दुसरा गार्डनर
सदर प्रकरणी बीएमसी तर्फे आजाद मैदान पोलिसात तक्रार
तपासात गार्डनर ( बागायतदार ) कर्मचारी हा बोगस आढळला
सदर कर्मचारी ५-९-२०१७ पासून कामावरून आहे गैरहजर
बोगस कर्मचाऱ्याने मनपाची ४३, ३१, ०१० रुपयांची केली फसवणूक
सदर प्रकरणी आजाद मैदान पोलीस करत आहे अधिक तपास
अहमदनगर
पारनेर तालुक्यातील शिरापूर येथे कोरोना नियमांना हरताळ
बैलगाडा शर्यतींना बंदी असतांनाही दोन हजारांवर जमाव जमवून बैलगाडा शर्यतीचे आयोजन
शर्यतीची माहिती मिळताच तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव
याप्रकरणी सात जणांविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कोरोना प्रादुर्भावामुळे जमावबंदी व शर्यतीवरील बंदीचे नियम धाब्यावर बसवून शिरापूर येथे बैलगाडा शर्यत
दिल्ली –
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट
दोघांमध्ये जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चर्चा
पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींची भेट
भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात, मात्र सहकार आणि बँकिंग यासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता
पुणे –
– चाकणमधील करंजविहिर गावात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर
-ही हत्या प्रेमप्रकरणातून प्रियकर आणि त्याच्या मित्राला लाकडी दांडके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली यातच त्यांचा मृत्यू झाला आहे
-तसेच या मारहाणीत प्रेयसी मुलगी देखील जखमी आहे
-या प्रकरणी मुलीच्या वडीलासह एकूण 6 जणांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
– मयत,बाळू सीताराम गावडे हा वीटभट्टीवर कामाला होता त्याच वीटभट्टी मालकाची मुलगी 14 तारखेला पळवून घेऊन गेला यात, मयत राहूल दत्तात्रय गावडे याने मदत केली.दोन दिवस शोध घेऊन त्यांना काल आरोपींनी पकडले आणि लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली.
सोलापूर –
राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे एकीकडे कोरोनाबाबत गंभीर असताना
दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी
सोशल डिस्टंसिंगचा उडाला फज्जा
सोलापूर –
– जयंत पाटील यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तोबा गर्दी
– सोशल डिस्टनसिंगचा उडवला अक्षरशः फज्जा
सोलापूर –
आषाढी यात्रेच्या महापूजेला विरोध करणाऱ्यावर पोलिसांची नजर
पंढरपुरातील आषाढी यात्रेची तयारी प्रशासनाने केली पूर्ण
जिल्ह्यातील नगर मनाच्या पालखीच्या स्वागतासाठी यंत्रणा सज्ज
महापूजेसाठी इशारा देणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधीचे मन वळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू
त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर
सोलापूर –
मंगळवेढा सोलापूर रस्त्यावर स्विफ्ट कारची नरसिंग मिलच्या भिंतीला जोरात धडक
भिंतीला पडली मोठी भगदाड
कोणतेही जीवित हानी नाही
मध्यरात्रीची घटना
सोलापूर –
शिवसेनेचे महेश कोठे, एमआयएमचे तौफिक शेख यांचा पक्षप्रवेश लांबणीवर
महेश कोठे आणि तोफिक शेख राष्ट्रवादीत प्रवेशाची होती चर्चा
विधान परिषद निवडणुका आणि पक्षांतर बंदी कायदा घेता प्रवेश लांबणीवर
मात्र सांकेतिक स्वरुपात तौफिक शेख यांचा मुलगा अदनाद शेख यांच्यासह एम आय आमच्या नगरसेवकांचे नातेवाईक करणार राष्ट्रवादीत प्रवेश
तौफिक शेख एमआयएमचे नगरसेवक आणि माजी अध्यक्ष
मुस्लिम समाजात तौफिख शेख यांचे प्राबल्य
2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्राणिती शिंदे यांच्या विरोधात एमआयएम कडून लढविली होती निवडणूक
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत दादा पाटील आज नाशिकमध्ये..
दोघेही नेते शासकीय विश्रामगृहावर राहणार..
दोन्ही नेत्यांची भेट होण्याची दाट शक्यता..
मनसे आणि भाजप युतीचे चंद्रकांत दादा पाटील यांचे संकेत..
राज्याच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता ..
पुणे –
– पुण्यामध्ये तब्बल १ हजार ८७८ किलोंचा गांजा लपवून आणण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी हाणून पाडला,
– या कटात सहभागी असलेल्या ६ जणांना अटक,
– या मालाची एकूण किंमत जवळपास ३ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती समोर,
– पुणे-सोलापूर रोडवरून अननस आणि जॅक फ्रूटची वाहतूक करणार्या ट्रकमध्ये फळांच्या खाली गांजा आढळून आला,
– याप्रकरणी अनेक जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पुणे –
– राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार,
– ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून, १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे,
– राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांची माहिती दिली.
– दरवर्षी दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होते.
– राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे.
रत्नागिरी –
रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून सरींवर पाऊस
सकाळी काही भागात पावसाच्या सरी
हवामान खात्यानं जिल्ह्याला तिला ऑरेंज अलर्ट
आज दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ जवळ धुळे सोलापूर हायवे खचला
वेरुळ जवळील पुलावर नव्याने बनवलेला रास्ता खचला
पुलावर दहा फुटांपेक्षाही पडला मोठा खड्डा
भरधाव येणाऱ्या वाहनांना पूल खचल्यामुळे निर्माण झाला धोका
नव्याने सुरू असलेला पुलावरील रास्ता खचल्यामुळे वाहानचालकात भीती
खचलेल्या पुलावरून वाहने गेल्यास पूल कोसळण्याची भीती
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरात साकारणार जगातील पाहिले संतपीठ
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्वीकारले पहिल्या संतपीठाचे पालकत्व..
1 सप्टेंबर पासून संतपीठाच्या कामाला प्रत्यक्षात होतेय सुरुवात..
संतांच्या मराठवाडा भूमीत संतपीठ साकारण्याचे स्वप्न होतेय पूर्ण..
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे संतपीठाच्या कामास गती..
देशातील विद्यापीठापैकी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळाला हा मान
सहा महिन्यांच्या आत संतपीठाला प्रत्यक्ष होणार सुरुवात
औरंगाबाद –
औरंगाबादमधील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अखेर रद्द..
अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यास सहसचिव यांनी दिली मुभा..
शहरातील महाविद्यालयात अकरावीचे प्रवेश ऑफलाइन होण्यास मार्ग मोकळा..
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाच्या प्रक्रियेत औरंगाबादला वगळले..
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना करावा लागत होता अडचणींचा सामना..
ठाणे –
मोटारकारचे सायलेंन्सर चोरुन त्याची पावडर बनवून तिची विक्री करणाऱ्या समशुद्दीन मोहंमद अदिस शहा याच्यासह चार जणांच्या आंतरराज्य टोळीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे
त्यांच्याकडून 6 लाख 50 हजारांचे 25 सायलेंन्सर जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली
मुंबईत आज पहाटे चारच्या सुमारास बल्लार्ड पियर परिसरात असलेला भारतीय सीमा शुल्क विभागाचे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मोठी आग
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचा 6 गाड्या घटनास्थळावर धाव घेऊन तब्बल एका तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहे
सुदैवाने कार्यालय बंद असल्यामुळे या आगीमध्ये कुठलेही दुखापत झालेली नसून मात्र सरकारी कागदपत्र आणि कंप्यूटर जळून खाक झाले आहेत
सध्या घटनास्थळावर मुंबई पोलीस दाखल होऊन आग कशामुळे लागली याचा तपास करत आहेत
मुंबईत पश्चिम दृतगती महामार्ग गोरेगाव हब मॉल जवळ रात्री साडे अकराच्या सुमारास एक टेम्पो डिव्हायडरला धडक देऊन पलटी झाल्यामुळे त्याच्यामागे जात असलेले पाच गाड्या आपसात धडकल्या ज्यात एका कारच्या मोठा नुकसान झाला आहे. या कारचा चालकाला सुद्धा दुखापत झाली आहे, त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेऊन सर्व गाड्यांना बाजूला काढून पुढील तपास वनराई पोलीस करत आहेत