Maharashtra News Live : परळीत धनंजय मुंडेंचं भाषण, पंकजा मुंडेंवर नाव न घेता निशाणा

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News Live : परळीत धनंजय मुंडेंचं भाषण, पंकजा मुंडेंवर नाव न घेता निशाणा
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 14 Oct 2021 23:39 PM (IST)

  गोव्यातील शाळा-कॉलेज सुरू होणार, नऊवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार

  गोवा :

  गोव्यातील शाळा कॉलेज सुरू होणार

  9 वी ते 12 चे वर्ग सुरू होणार

  येत्या 18 ऑक्टोबर पासून गोव्यातील वर्ग भरणार

  तज्ञ समितीसोबतच्या बैठकीनंतर गोवा राज्य सरकारचा निर्णय

  कोविड बाबतचे नियम अटी पाळून वर्ग सुरू होणार

 • 14 Oct 2021 21:28 PM (IST)

  परळीत धनंजय मुंडेंचं भाषण, पंकजा मुंडेंवर नाव न घेता निशाणा

  धनंजय मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे :

  ज्यावेळेस जगातला कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते, 2012 मध्ये जिथून पराभव झाला त्याच ठिकाणाहून माझ्या विजयाला सुरुवात झाली

  विधानसभेच्या निवडणुकीत आपण मला आशीर्वाद दिला, महाराष्ट्रात कुठे लढाई झाली नाही ती इथे झाली, 33 हजार मतांनी मला विजयी केलं. मी दिलेला शब्द आज पूर्ण करतोय

  कोरोनाचा संसर्ग होता, आपण संकट काळात देखील इथे एमआयडीसी आणली. कोव्हिड आला नसता तर आज इथे मोठ्या उद्योगाचे भूमीपुजन केले असते. आर्थिक संकटामुळे ते जमले नाही.

  ऐतिहासिक कामगिरी पाहण्यास स्वर्गीय पंडित अण्णा नाहीत

  काल परवा दोन दिवस मुंबईत होतो. मराठवाड्यात मोठा पाऊस झाला, अशी अतिवृष्टी मी पाहिली नाही. पिकांचे नुकसान झाले, जमीन खरडून गेली. अनेक शेतकऱ्यांनी खंत बोलून दाखविली. शेतकरी संकटात आला. रब्बीचे काय होईल माहीत नाही. आम्ही मंत्री म्हणून आम्ही फिरलोत

  विरोधकांनी टीका केली, चिखल तुडवून गेलो म्हणून, आपण वर्षातून दोन दा देखील आला नाहीत

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचे मी आभार मानतो, त्यांनी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली. लवकरच मदत येईल

  विमा म्हटल्यावर तुमचे चेहरे कसे खुलले मला पहावयास मिळले, जिथं सरकारने 10 हजार मदत मंजूर केलीय तिथे विमा कसे मागे राहील, सर्वच विमा मिळेल

  संकटाच्या काळात बांधावर जाऊन त्याच्या घरात जाऊन विचारताना आम्हाला कधीच सर्दी खोकला होत नाही, इथे काही जणांना होतो, त्यांचं त्यांना लक लाभो

  काल भाजप मदत द्या म्हणून धरणे दिले, लखीमपूरमध्ये भाजपच्या मंत्र्यांच्या मुलाने गाडी खाली चिरडले, शेतकऱ्यांना जात नसते

  मी आज मंत्री आहे, उद्या राहील की माहीत नाही, मात्र मी जनतेच्या काळजातून मी कधीच जाणार नाही

  तुम्ही दसरा-दिवाळीला या, आम्हाला आनंद होईल, 24 मार्च ला जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला, तेव्हा आपण कुठं होता, सुखाच्या काळात नव्हे संकटाच्या काळात यायला पाहिजे होते

  ज्यावेळेस बीड जिल्हा ऑक्सिजनची वाट पाहत होता, आता प्रेम उतू येणाऱ्यांना का कळवळा आला नाही?

  भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारा कोव्हिडं झाल्यावर रेमडिसिव्हीर कोणी दिले? आणि आता तुम्ही आमच्यावर आरोप करता

  कुठलाही संकट असो, संकट काळी कोणीही राजकारण करू नये

  वैद्यनाथ चालू होणार की नाही हे निदान पत्राकारास सांगावे किंवा ट्विट करावे

  बीड जिल्ह्यात कोणी तरी म्हटलं अराजकता, मला अकल्याणकारी म्हटलं, आमचं जीवन लोकांच्या कल्याणासाठी आहे. मला काहीही फरक पडणार नाही.

 • 14 Oct 2021 21:19 PM (IST)

  पिंपरी चिंचवडच्या माजी महापौरांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

  पुणे :

  पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर राष्ट्रवादीच्या नेत्या मंगला कदम यांच्यासह त्यांचा पती, मुलगा आणि सुने विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

  मंगला कदम यांच्या दुसऱ्या मुलाची पत्नी तन्वी कुशाग्र कदम यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली

  शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगला कदम यांच्यासह पती अशोक कदम, मुलगा कुशाग्र कदम, गौरव कदम, सून स्वाती कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल

  मंगला कदम यांनी त्यांच्या मुलाचा गंभीर आजार लपवून फसवणुकीसह मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तन्वी कदम यांनी दिली तक्रार

 • 14 Oct 2021 20:22 PM (IST)

  जळगावात एकनाथ खडसे यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची घरवापसी

  जळगाव :

  एकनाथ खडसे यांना मोठा धक्का

  त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची घरवापसी

  माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केली घरवापसी

  मुक्ताईनगर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केला प्रवेश

 • 14 Oct 2021 19:52 PM (IST)

  ईडीकडून चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीची चार तास चौकशी

  चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीची चौकशी संपली, अरबाजसह इतरांच्या चॅटमध्ये इम्तियाजचा उल्लेख, एनसीबीकडून जवळपास चार तास इम्तियाज खत्रीची चौकशी

 • 14 Oct 2021 19:50 PM (IST)

  पाहुणे आमच्याकडे नाही तर नातेवाईकांकडे आले होते, आयकरच्या धाडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

  आयकरच्या धाडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, पाहुणे आमच्याकडे नाही तर नातेवाईकांकडे आले होते, प्रत्येक यंत्रनेने आपलं काम करावं, कर नाही त्याला डर कशाला? अजित पवारांची प्रतिक्रिया

 • 14 Oct 2021 19:48 PM (IST)

  जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत, भाजप नेते गिरीश महाजन यांचे सूतोवाच

  जळगाव :

  जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत

  भाजप नेते गिरीश महाजन यांचे सूतोवाच

  सर्वपक्षीय पॅनलबाबत तिढा कायम राहिल्यास भाजपची सर्व जागा लढवण्याची तयारी

  काँग्रेसने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावरही महाजन यांची टीका, म्हणाले काँग्रेसची जिल्ह्यात ताकद आहे कुठे, भाजप जातीयवादी पक्ष आहे, तर मग बँकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या 2 सर्वपक्षीय बैठकांना का हजेरी दिली?

  जळगाव महापालिकेत भाजप बहुमतात, मात्र सत्तांतर बाबत अद्याप भूमिका नाही, दसरा व दिवाळीनंतर त्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही गिरीश महाजन म्हणाले

 • 14 Oct 2021 19:29 PM (IST)

  धुळे शहरात असलेल्या बीएसएनएल ऑफिसला भीषण आग

  धुळे शहरात असलेल्या बीएसएनएल ऑफिसला भीषण आग, अज्ञात इसमाने कचरा पेटवल्याने बीएसएनएल ऑफिस येथील प्लास्टिक जळून खाक, घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल

 • 14 Oct 2021 19:16 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून शिवाजी पार्कवर आकर्षक विद्यूत रोषणाई, स्वत: मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

  शिवाजी पार्कवर विद्यूत रोषणाई, मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून विद्यूत रोषणाई, विद्यूत रोषणाईची स्वत: मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाणपोईचा शुभारंभ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पाणपोईचं उद्घाटन

 • 14 Oct 2021 19:07 PM (IST)

  पुण्यात मेट्रोच्या थांबलेल्या कामाबाबत आठ दिवसांत निर्णय : महापौर मुरलीधर मोहोळ

  पुणे : गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डर उंचीबाबतच्या विषयात येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

  मेट्रोच्या गर्डरमुळे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप गणेश मंडळ प्रतिनिधींनी घेतला होता. यावर महापौर मोहोळ यांनी सदरील काम तातडीने बंद करण्याचे निर्देश देत मेट्रो, गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक घेतली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार महापौर मोहोळ यांच्या पुढाकाराने महापौर निवास येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस गटनेते आबा बागुल, मेट्रोचे अतुल गाडगीळ, गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

  या विषयी माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘मेट्रोच्या कामाबाबत निर्माण झालेल्या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असून गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या सूचना, कल्पना आणि पर्याय याची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. बैठकीस मेट्रोच्या तांत्रिक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याने यावर लवकरच तोडगा काढण्यात यश येणार आहे. त्या भागातील मेट्रो कामाला गती देण्याचा प्रयत्न आहे.’

  ‘पुण्यातील गणेशोत्सव हा समाजभान जपणारा उत्सव म्हणून जगभर ओळखला जातो. या विषयातही समाजभान जपत याबाबत मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला उपस्थित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत विलंब न करता येत्या आठ दिवसातच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे’.

 • 14 Oct 2021 18:52 PM (IST)

  बुलडाणा कारागृहात कैद्याचा मृत्यू, प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

  बुलडाणा :

  बुलडाणा कारागृहात कैद्याचा मृत्यू,

  प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार,

  सामान्य रुग्णालयात पोलीस बंदोबस्त,

  कारागृहात न्यालायलीन कोठडीत असलेल्या राजेंद्र डांगे या 53 वर्षीय कैद्याचा मृत्यू,

  तब्येत खराब झाल्याने सामान्य रुग्णालयात केले होते भर्ती,

  मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले..

  कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.

 • 14 Oct 2021 18:32 PM (IST)

  समीर वानखेडेंना मुंबई पोलीसांचं समन्स, हेरगिरीप्रकरणात चौकशी होणार

  मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांना समन्स बजावलं आहे. समीर वानखेडे यांनी आपल्यामागे पाळत ठेवली जात असल्याची तक्रार पोलिसात केली होती. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 • 14 Oct 2021 18:12 PM (IST)

  ईडीने हिंमत असेल तर माझ्याकडे यावं, खासदार उदयनराजे भोसले यांचं ईडीला आव्हान

  खासदार उदयनराजे भोसले यांचं ईडीला आव्हान, ईडीने हिंमत असेल तर माझ्याकडे यावं, पुराव्यासकट यादी देईन, जसं पेरलं तसं उगवतं, संपूर्ण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं, उदयन राजेंची प्रतिक्रिया

 • 14 Oct 2021 18:04 PM (IST)

  शिवसेनेचा उद्या षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा, 1300 शिवसैनिक सहभागी होतील, अनिल देसाई यांची माहिती

  अनिल देसाई यांची प्रतिक्रिया :

  – शिवतीर्थावरील दसरा मेळावा कोरोनामुळे छोट्या सभागृहात घ्यावा लागतो. षण्मुखानंद सभागृहात 2600 ची क्षमता आहे. त्याच्या 50 टक्के शिवसैनिक उपस्थित राहतील. ठाण्यापर्यंतच्या शिवसेना, लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांना बोलावण्यात आलंय.
  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साडेसात ते आठच्या सुमारास बोलतील
  – येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. तसंच राजकीय घडामोडी होतायत. यावर उद्धव ठाकरे बोलतील. तसंच राज्य सरकारने केलेल्या कामाचा आढावाही ते घेतील
  – महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. येत्या काळात राज्याची रूपरेखा कशी असेल त्यावर ते बोलतील

 • 14 Oct 2021 17:51 PM (IST)

  बिग बॉस फेम अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

  बिग बॉस फेम अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

  अरमानच्या घरावर छापा टाकून ड्रग्ज सापडल्यानंतर एनसीबीतर्फे अटक केली गेली होती

  एनसीबीच्या ऑपरेशन रोलिंग थंडर अंतर्गत अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकून केली गेली होती कार्रवाई

  चौकशी दरम्यान अरमानच्या घरात सापडला होता ‘अमेरिकन कोकेन’

  ‘अमेरिकन कोकेन’ विशेष आणि महागड असतं त्यामुळे हे अरमानकडे आलं कसं? याबद्दल चौकशी शुरू आहे

 • 14 Oct 2021 16:51 PM (IST)

  आर्यन खानचा जेलमधील मुक्काम वाढला, आता 20 ऑक्टोबरला जामिनावर निकाल

  आर्यन खानचा जेलमधील मुक्काम वाढला, कोर्टाने जामिनाचा निर्णय राखून ठेवला, 20 ऑक्टोबरला निकाल दिला जाणार, पुढचे पाच दिवस कोर्टाची सुट्टी, त्यामुळे निकाल राखीव ठेवला गेला, त्यामुळे आर्यनसह इतर आरोपींचा मुक्काम पुढचे पाच दिवस आर्थर रोडमध्येच जाणार

 • 14 Oct 2021 16:48 PM (IST)

  महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जारी करा, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचे गृह विभागाला निर्देश

  महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करा,

  महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जारी करा,

  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचे गृह विभागाला निर्देश

 • 14 Oct 2021 16:25 PM (IST)

  शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, एमआयडीसीमधील रस्त्याच्या कामावरुन वाद

  डोंबिवली :

  शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

  एमआयडीसीमधील रस्त्याच्या कामावरून झाला वाद, वादाचे रूपांतर हाणामारीत

  चार ते पाच कार्यकर्ते जखमी असल्याची प्राथमिक माहिती

  मानपाडा पोलीस ठाणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

 • 14 Oct 2021 16:23 PM (IST)

  BSF ला अधिकार दिल्याने पंजाब काँग्रेसचा विरोध का? माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा सवाल

  नवी दिल्ली :

  BSF ला अधिकार दिल्याने पंजाब काँग्रेसचा विरोध का ?

  माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा सवाल

  या निर्णयामुळे ड्रग्ज, हत्यार, यांची तस्करी थांबणार

  देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर 50 किमी पर्यंत जप्ती, शोध, अटकेबाबत दिलेत BSF ला अधिकार

  केंद्र सरकारच्या या निर्णयाला पंजाब काँग्रेसचा विरोध

 • 14 Oct 2021 16:13 PM (IST)

  जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उसळली तोबा गर्दी

  जळगाव :

  जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उसळली तोबा गर्दी

  जिल्हा बँकेच्या आवारात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन

  अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा,

  नियोजनाचा अभाव असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती

  राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांना हरताळ

 • 14 Oct 2021 15:41 PM (IST)

  राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलची विजयी घोडदौड सुरु, भाजपच्या पॅनलचं अद्याप खातं उघडलं नाही

  पुणे :

  – सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक निकाल,

  – राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलची विजयी घोडदौड सुरू,

  – एकूण २१ पैकी ७ जागा राष्ट्रवादीच्या खात्यात,

  – भाजपच्या सोमेश्वर परिवर्तन पॅनलला अद्याप खातं उघडता आलं नाहीय,

  – अजूनही १४ जागांचे निकाल बाकी आहेत

 • 14 Oct 2021 14:41 PM (IST)

  ऐट राजाची वागणुक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था, सदाभाऊ खोत यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापूर आणि अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे

  मुख्यमंत्री यांनी मी pkg जाहीर करणार नाही अस स्पष्ट केलं होत… पण आत्ता त्यांनीच 10 हजार कोटी रुपयांचे pkg जाहिर केलं आहे..

  मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या GR ची 20 तारखेला होळी करणार

  ऐट राजाची वागणुक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था..

  सरकारने शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे

  सरकार विरोधात किसान परिषद घेणार.

  नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही परिषद घेणार

  आत्तातरी तुम्ही शरद पवार यांच्या माडीवरून खाली उतरणार का-

  सदाभाऊ खोत याची राजू शेट्टी यांच्यावर टीका..

  आमच्या मिशीला खरकट लागलं नाही अस काहीजण बोलत आहेत, पण त्याच्या मिशीला शरद पवार यांचे आमरस लागलं आहे

  सदाभाऊ खोत याची शेट्टी यांच्यावर टीका..

  जलसमाधी नको किमान अंघोळ तरी करा – सरकारच्या मदतीवर सदाभाऊ खोत याची राजू शेट्टी यांच्यावर टीका.

 • 14 Oct 2021 13:47 PM (IST)

  छत्रपतींचा अपमान करणाऱ्या आमदाराचं मुख्यमंत्री काय करणार आहेत? : आशिष शेलार

  छत्रपतींचा अपमान करणाऱ्या आमदाराबद्दल आता मुख्यमंत्री काय करणार आहेत ?
  – छत्रपतींची बदनामी करण्याचं लायसन्स राष्ट्रवादीला मिळालंय का ?
  – राष्ट्रवादीच्या आमदारावर पक्ष काय कारवाई करणार हे सांगा?

  आशिष शेलार यांचा सवाल

 • 14 Oct 2021 13:46 PM (IST)

  बाकीच्या ठिकाणी धाडी पडल्या तर ओके, तुमच्यावर पडली तर सूड बुद्धी, पवारसाहेब असं कसं?- चंद्रकांत पाटील

  बाकीच्यांची ठिकाणी धाडी पडल्या तर चालत आणि तुमच्यावर धाडी पडल्या तर सूड उगवणीने अस नाही होत..

  धाडी ची तयारी दोन दिवसात होत नाही हे इतकी वर्षे राजकारणात असून तुम्हाला माहिती नाही का

  शरद पवार यांच्या टीकेला चंद्रकांत दादांचं उत्तर

 • 14 Oct 2021 12:59 PM (IST)

  राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करण्याचा निर्णय

  राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करण्याचा निर्णय
  – विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांच्या विकास निधीत १ कोटी रुपयांची वाढ
  – सध्या आमदारांचा विकास निधी ३ कोटी आहे, त्यात १ कोटीची वाढ करून तो ४ कोटी करण्यात आला आहे
  – या निधीतून आमदारांना मतदारसंघातील विकास कामे करतात यात
  – शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी यासारखी विकास कामे करता येतात

 • 14 Oct 2021 12:58 PM (IST)

  तळजाई टेकडीवरील पुणे महापालिकेच्या प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध

  तळजाई टेकडीवरील पुणे महापालिकेच्या प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध

  तळजाईवरती कॉक्रीटीकरण नको यासाठी शिवसेनेचं आंदोलन,

  तळजाई देवीची महाआरती करत महापालिकेच्या प्रकल्पाला विरोध केलाय,

  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आम्ही हा विषय देऊ ते यामध्ये न्याय देतील,

  मात्र तळजाईवरती कॉक्रीटीकरण नको शिवसेनेचा विरोध कायम

  24 तारखेला राज ठाकरेही तळजाई प्रकल्पासाठी करणार आंदोलन,

  त्याआधी शिवसेनेनं तळजाई टेकडीवर केलं आंदोलन

 • 14 Oct 2021 12:54 PM (IST)

  मंदाकिनी खडसे यांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

 • 14 Oct 2021 12:49 PM (IST)

  दसरा मेळाव्याला पंकजा काय बोलणार, महाराष्ट्राचं लक्ष

  उद्या होणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट इथे जय्यत तयारी सुरू आहे. कोरोनानंतरच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच हा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याला किती लोक जमतील आणि पंकजा मुंडे काय बोलतील याकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

 • 14 Oct 2021 11:48 AM (IST)

  सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक, राष्ट्रवादीने आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

  बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक

  – राष्ट्रवादीने आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

  – मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

  – फटाक्यांच्या आतिषबाजीसह गुलालाची उधळण

 • 14 Oct 2021 11:47 AM (IST)

  लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची श्रीलंकेच्या पंतप्रधानांशी चर्चा

  भारत श्रीलंका दरम्यान महत्त्वाची चर्चा

  लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची पंतप्रधानांशी चर्चा

  श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासोबत चर्चा

  दोन्ही देशातल्या सैन्यादलाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती

 • 14 Oct 2021 11:25 AM (IST)

  नवाब मलिक यांनी मांडलेले मुद्दे

  NCB लोकांना टार्गेट करुन कारवाई करते; नवाब मलिकांचा आरोप

  NCB समीर खानला खोट्या केसमध्ये अडकवलं

  200 किलो गांजा प्रकरणी समीर खानला 13 जानेवारी रोजी अटक

  साडेआठ महिन्यांनंतर समीर खानला जामीन

  पण 200 किलो गांजा कुठेच मिळाला नाही

 • 14 Oct 2021 11:20 AM (IST)

  माझ्या जावयाकडे कुठलाही गांजा मिळाला नाही : नवाब मलिक

  तंबाखू आणि गांजा यातील फरक एनसीबीला समजला नाही, 9 जानेवारीला एका मुलीकडे गांजा सापडला, माझ्या जावयाकडे कुठलाही गांजा मिळाला नाही : नवाब मलिक

 • 14 Oct 2021 11:19 AM (IST)

  एनसीबीकडून सातत्याने टाळाटाळ : मलिक

  12 जानेवारीला एनसीबीने समन्स दिल्याचं मला समजलं, पुन्हा त्याच नंबरवरुन मीडियाला मेसेज गेले, एनसीबीकडून सातत्याने टाळाटाळ, साडेतीन महिने सुनावणी लांबणीवर, नवाब मलिक यांचा आरोप

 • 14 Oct 2021 11:18 AM (IST)

  मलिक यांनी मांडलेले मुद्दे

  एनसीबीने ड्रग्सचे पार्सल मिळाल्याची माहिती दिलेली

  200 किलो गांजा जप्त केल्याची माहिती

  एका नंबरवरुन एनसीबीने पत्रकारांना माहिती दिली

  मात्र भाजप नेते म्हणू लागले की, मलिकांचा जावई ड्रग्ज डील आहे

  13 जानेवारीला समीर खानला अटक झाली

 • 14 Oct 2021 11:14 AM (IST)

  NCB ने समीर खानला खोट्या केसमध्ये अडकवलं : नवाब मलिक

  NCB ने समीर खानला खोट्या केसमध्ये अडकवलं, असा दावा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

  माझे जावई समीर खान यांना खोट्या आरोपात अडकवलं, नऊ जानेवारीला एका मुलीकडून साडेसात ग्रॅम गांजा जप्त, नवाब मलिकांनी घटनाक्रम सांगितला

 • 14 Oct 2021 11:11 AM (IST)

  नवाब मलिकांच्या सुरक्षेत वाढ

  नवाब मलिकांच्या सुरक्षेत वाढ, मलिकांना आता वाय प्लस सुरक्षा

 • 14 Oct 2021 10:56 AM (IST)

  चित्रा वाघ यांनी जे ट्विट केलंय मला त्यावर काही बोलयचं नाही : चाकणकर

  महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची अजून तरी मला कल्पना नाही

  चित्रा वाघ यांनी जे ट्टीट केलं मला त्यावर काही बोलयचं नाही

  कल्पना नसताना बोलणं चुकीचं आहे

  मला जे पक्षानं दिलंय त्यात मी समाधानी आहे

  माझी इच्छा अशी काही नाही

  चित्रा वाघ यांच्यावर रुपाली चाकणकरांनी बोलणं टाळलं

 • 14 Oct 2021 10:55 AM (IST)

  पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना

  पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंग यांच्यासाठी प्रार्थना

  मनमोहनसिंग लवकरात लवकर बरे व्हावे – पंतप्रधान मोदी

  मनमोहन सिंग यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी मोदींकडून प्रार्थना

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मनमोहन सिंग यांच्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

 • 14 Oct 2021 09:55 AM (IST)

  ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा, दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी येण्यास सुरुवात

  ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आजपासूनंच दीक्षाभुमिवर बौद्ध अनुयायी येण्यास सुरुवात झालीय. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर काटेकोर नियंमांचं पालन करुन धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा होतोय. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात असून, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरंच ॲंटीकेन चाचणी करुन, प्रत्येकाचं तापमान तपासूनच दीक्षाभूमी परिसरात प्रवेश दिला जातोय.

 • 14 Oct 2021 09:45 AM (IST)

  केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय एम्समध्ये पोहोचले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या तब्येतीची विचारपूस करणार

  केंद्रीय आरोग्य मंत्री एम्समध्ये दाखल

  मनसुख मांडवीय एम्स मध्ये दाखल

  डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस

  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कालपासून एम्स रुग्णालयात

  केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सिंग यांच्या उपचार बाबतची घेतली माहिती

 • 14 Oct 2021 09:43 AM (IST)

  खासदार उदयनराजे भोसले प्रतापगडावर दाखल

  खासदार उदयनराजे भोसले प्रतापगडावर दाखल

  भवानी मातेचे पूजन करून उदयनराजे घेणार दर्शन

  उदयनराजे यांचं प्रतापगडावर वाजत-गाजत स्वागत

  खंडे नवमी निमित्त उदयनराजे भोसले प्रतापगडावर

 • 14 Oct 2021 09:43 AM (IST)

  नाशिक – सिन्नर घोटी हायवेवर अपघात

  नाशिक – सिन्नर घोटी हायवेवर अपघात

  पांडुर्ली घाटात कंटेनर झाला पलटी

  अपघातात कंटेनर चालकाचा पाय अडकला

  कंटेनर खाली पाय अडकल्याने कंटेनर चालकाला बाहेर काढणे अवघड

  रात्री पासून कंटेनर चालकाला बाहेर काढण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरू

 • 14 Oct 2021 09:06 AM (IST)

  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर हल्ला

  महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल- चित्रा वाघ

 • 14 Oct 2021 08:28 AM (IST)

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद जम्मू काश्मिर दौऱ्यावर

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद जम्मू दौऱ्यावर

  द्रास सेक्टरमध्ये जवानांसोबत दसरा साजरा करणार

  आज राष्ट्रपती कोविंद उधमपूर ला रवाना होणार

  दसरा साजरा करण्यासाठी राष्ट्रपती जम्मू मध्ये जाणार

 • 14 Oct 2021 08:20 AM (IST)

  मुंबईत पेट्रोलच्या दरात वाढ सुरुच, महागाईने जनता त्रस्त, भाज्यांचे दरही वाढले!

  मुंबईत पेट्रोलच्या दरात वाढ सुरूच…. महागाईने जनता त्रस्त, भाज्यांचे दरही वाढले…
  – मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 110.75 पैसे इतकी आहे.
  – डिझेलचा दर प्रति लिटर 101.40 पैसे आहे, ..
  – पेट्रोल 34 पैशांनी महागलंय…
  – डिजेल 37 पैशांनी महागलंय…
  – पावर पेट्रोल 114.69 पैसे आहे…
  – पेट्रोल हे 120 रुपये प्रती लिटर पर्यंत जाऊ शकतं असं बोललं जातंय….
  – तर सीएनजीचा दरातही वाढ झालीये… 54.57 पैसे प्रती किलो दर झालाय… 2.59 पैसे वाढलेयत…पीएनजीच्या दरातही 2.26 पैसे वाढले…
  – पीएनजी
  – महामारीच्या काळात सतत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडतंय…
  – पेट्रोलचे दर वाढल्याने राज्यात भाजीपाला आणि दूध महाग होणार असल्याचं बोललं जातंय

 • 14 Oct 2021 08:19 AM (IST)

  पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 21 लाखांचा टप्पा पार

  पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 21 लाखांचा टप्पा पार केलाय

  -शहरात आतापर्यंत 21 लाख 17 हजार 147 लोकांचे लसीकरण पार पडलंय

  -दरम्यान शहरात आज 46 ठिकाणी कोव्हीशिल्ड तर 8 ठिकाणी कोवॅक्सिंन लस उपलब्ध असणार आहे

  -शहरात काल दिवसभरात 108 कोरोना रुग्णांची भर पडलीय तर 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय

  -तर शहरात सध्या 854 सक्रिय रुग्ण आहेत

 • 14 Oct 2021 08:18 AM (IST)

  माहूर इथे दत्ताचा अवतार असल्याचे सांगणाऱ्या भोंदूबाबाला अटक

  माहूर इथे दत्ताचा अवतार असल्याचे सांगणाऱ्या भोंदूबाबाला अटक,

  डोंबिवली इथल्या प्रवीण शेरकर यांची केली 24 लाखांची फसवणूक,

  असाध्य आजार बरे करण्याचा दावा करत होता भोंदूबाबा,

  भोंदूबाबाच्या अघोरी पूजेचे व्हीडिओ भक्तांनीच केले पोलिसांच्या हवाली,

  भोंदूबाबाने अनेकांना लाखो रुपयांना फसवल्याची शक्यता

 • 14 Oct 2021 07:53 AM (IST)

  केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आज गोवा दौऱ्यावर, देवेंद्र फडणवीसही सोबतीला असणार

  केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आज गोवा दौऱ्यावर

  गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शहा यांचा महत्त्वपूर्ण दौरा

  फॉरेन्सिक लॅब कॉलेजच्या पायाभरणी समारंभ करत गोव्यातल्या कार्यक्रमाला होणार सुरुवात

  दुपारी चार वाजता भाजपच्या कार्यकर्त्यांची अमित शहा साधणार संवाद

  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अमित शहा यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

  गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस सुद्धा असणार अमित शहा यांच्या सोबत

 • 14 Oct 2021 07:52 AM (IST)

  जिल्हा मध्यवर्ती बँकांची पंचवार्षिक निवडणूक तूर्तास लांबणीवर पडणार

  जिल्हा मध्यवर्ती बँकांची पंचवार्षिक निवडणूक तूर्तास लांबणीवर पडणार

  कोल्हापूर,पुणे,मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या दाखल याचिकेवरील निर्णयापर्यंत निवडणुका घेऊ नका

  मुंबई उच्च न्यायालयाने दिला तोंडी आदेश

  दोन दिवसात अधिकृत लेखी आदेश येण्याची शक्यता

  मतदार यादीतील नावे, चुकीचे ठराव यावरून 40 संस्थांनी दाखल केल्यात याचिका

  उच्च न्यायालयाच्या या आदेशाने निवडणुकीची प्रक्रिया थांबली

 • 14 Oct 2021 07:28 AM (IST)

  सोलापूर- यंदाही विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच रंगत होणार

  सोलापूर– यंदाही विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच रंगत होणार

  मागील निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच झाली होती लढत

  दोन्ही पक्षाचे उमेदवार कोण असतील हे सध्यातरी गुलदस्त्यातच

  मात्र भाजप कडून पुन्हा एकदा आमदार प्रशांत परिचारक रिंगणात उतरण्याची शक्यता

  राष्ट्रवादीकडून शिवसेनेत असलेले माजी आमदार दिलीप माने ,पार्थ पवार यांना संधी देण्याची शक्यता

  निवडणूक जाहीर होण्यास 15 ते 20 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने त्याआधी दोन्ही पक्ष उमेदवार जाहीर करण्याची शक्यता

 • 14 Oct 2021 07:23 AM (IST)

  मागासवर्गीय आयोगाला 435 कोटीचा निधी मिळेना, सरकारविरोधात ओबीसी संघटनांमध्ये नाराजी

  मागासवर्गीय आयोगाला 435 कोटीचा निधी मिळेना ,

  सरकारविरोधात ओबीसी संघटनांमध्ये नाराजी,

  15 तारखेला जेजूरी गडावर ओबीसी संघटनांचा मेळावा,

  मेळाव्यात सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता,

  काल ओबीसी, व्हीजेएनटी संघटनांनी एकत्रित बैठक घेऊन 15 तारखेला मेळावा घेणार असल्याचं केलं स्पष्ट,

  इम्पेरीकल डेटा गोळा करण्यासाठी 435 कोटींचा खर्च येत असल्यानं तो अजून सरकारने दिलेला नाहीये.

 • 14 Oct 2021 07:07 AM (IST)

  विजयादशमीला कोणालाही मिरवणुकीस परवानगी नाही, सोलापूर जिल्हा प्रशासनाचे आदेश

  सोलापूर– विजयादशमीला कोणालाही मिरवणुकीस परवानगी नाही

  प्रतिवर्षी रुपाभवानी मंदिरातून पालखी सोहळा काढण्याची प्रथा

  रुपाभवानी मंदिर येथे शमीवृक्ष या मार्गावर निघत असतो पालखी सोहळा

  मागील वर्षीही देण्यात आली नव्हती म्हणून मिरवणुकीस परवानगी

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस प्रशासनाने मिरवणुकीस परवानगी नाकारली

 • 14 Oct 2021 07:06 AM (IST)

  नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये कोरोना लसीकरण ४० लाखांच्या पार

  नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये कोरोना लसीकरण ४० लाखांच्या पार

  – जिल्हयात २७ लाख ६० हजार नागरीकांनी घेतला लसीचा पहिला डोस

  – जिल्ह्यात १२ लाख ४२ हजार नागरीकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस

  – जिल्हयात ४३० केंद्रांवर सुरु आहे कोवीड लसीकरण

  – लसीकरणाचा ४० लाखांचा टप्पा गाठणारा नागपूर राज्यातील पाचवा जिल्हा

 • 14 Oct 2021 07:05 AM (IST)

  पुण्यात महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची प्राथमिक बैठक

  पुण्यात महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पार पडली प्राथमिक बैठक,

  बैठकीत युती करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती,

  काँग्रेसला सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा नाना पटोलेंनी दिला होता,

  मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेसनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे,

  पुण्यात काँग्रेस ,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायेत,

  जागा वाटपाबाबत अजून चर्चा झालेली नाही पुढील आठवड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे, यामध्ये फॉर्म्युला ठरण्याची शक्यता !

 • 14 Oct 2021 07:04 AM (IST)

  कर्नाटकात जाण्यासाठी प्रवाशांना तूर्तास दिलासा नाहीच

  कर्नाटकात जाण्यासाठी प्रवाशांना तूर्तास दिलासा नाहीच

  राज्यात प्रवेशासाठी आजून ही rt pcr अहवाल सक्तीचा

  Rt pcr सक्तीचे निर्बंध शिथिल केलेले नाहीत

  दसऱ्यानंतर तज्ञ समितीच्या बैठक घेऊन याबाबत निर्णय घेणार

  कर्नाटक चे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच स्पष्टीकरण

  कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात प्रवेशासाठी rt-pcr सक्तीची अट शिथिल करण्यासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी राज्य शासनाकडे पाठवलाय प्रस्ताव

 • 14 Oct 2021 07:04 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामाची होणार चौकशी

  नागपूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामाची होणार चौकशी

  – उमरेड, नरखेड तालुक्यातील कामाची लाचलुचपत विभाग करणार चौकशी

  – चौकशासाठी एसीबी चे नागपूर जिल्हा परिषदेला पत्र

  – कामतांबाबत ‘एसीबी’कडून जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयालाही विचारणा

  – उमरेड आणि नरखेड तालुक्यातील कामाबाबत होत्या तक्रारी

 • 14 Oct 2021 06:58 AM (IST)

  नवाब मलिक यांचा मोठा दावा, जावई समीर शब्बीर खान यांना NCB ने खोट्या केसमध्ये अडकवल्याचा आरोप

  नवाब मलिक यांचा मोठा दावा, जावई समीर शब्बीर खान याला एनसीबीने खोट्या केसमध्ये अडकवल्याचा आरोप…
  – घरातील पंचनाम्यात कोणतंच ड्रग्ज सापडलं नसल्याचं एनसीबीने पंचनाम्यात केलंय नमुद…
  – सेशन कोर्टाने नोंदवलं निरिक्षण… एनसीबीच्या थेयरीवर प्रश्नचिन्ह ऊपस्थित ? नवाब मलिकांचा दावा…
  – ५० हजारांच्या बाॅंडवर समीर खानची जामिनावर झालीये सुटका…
  – सेशन कोर्टाच्या १९ पानी आॅर्डर काॅपीचा आधार घेत नवाब मलिक घेणार हायकोर्टात धाव… प्रकरण स्क्वॅश करण्यासाठी अपील करणार…
  – गुटख्याचा व्यापार करणार्या जावयावर खोटी कलमं लावून गुन्हा दाखल केल्याचा नवाब मलिक यांचा आरोप…
  – नवाब मलिक जावयाविरोधातील एनसीबीच्या कारवाईला वरच्या कोर्टात देणार आव्हान…
  – एनसीबीने खोटा खटला दाखल करून आपल्याला बदनाम करण्याचं कुबांड रचल्याचा नवाब मलिक यांचा दावा…
  – आज ११ वा. एनसीपी कार्यालय मुंबई इथे घेणार प्रेस कांफ्रेंस

 • 14 Oct 2021 06:52 AM (IST)

  नाणेनिधीने तुम्हाला गाजर दाखवलं, आकडेबाजी तुमचा खेळ, पण महागाईची जुमलेबाजी आता तरी करु नका : सामना

  पोटाची खळगी कशी भरायची, आधीच ‘कोरोनाचा मार’ त्यात हा दरवाढीचा भडिमार कसा सहन करायचा या विवंचनेत सामान्य माणूस आहे. सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खात आहे. त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताची अर्थव्यवस्था या वर्षी 9.5 टक्के दराने वाढणार, 2022 मध्ये विकास दरात भारत जगाला मागे टाकणार, असे आणखी एक ‘गाजर’ दाखवले आहे. हीदेखील एक प्रकारची आकडेबाजीच आहे. पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, पण निदान महागाईची जुमलेबाजी तरी करू नका. सरकारी कागदावर महागाईचा दर घटला असेलही, पण वास्तवातील दरवाढीचा आकडा रोज वाढतच चालला आहे त्याचे काय? 2022 मध्ये हिंदुस्थानचा विकास दर जगात सर्वाधिक होणार असेल तर त्याचा आनंद सगळ्यांनाच होईल. पण आता सामान्य माणसाला प्रचंड महागाईचे जे चटके बसत आहेत त्याचे काय?

 • 14 Oct 2021 06:47 AM (IST)

  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर

  डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर

  डॉ. मनमोहन सिंग आज आणि उद्या एम्स रुग्णालयात असणार

  काल संध्याकाळी ताप आल्याने सिंग एम्स रुग्णालयात दाखल

  89 वर्षीय सिंग यांना एप्रिल मध्ये झाली होती कोरोनाची लागण

  प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती

 • 14 Oct 2021 06:40 AM (IST)

  एमआयएमला उदगीरमध्ये खिंडार, लातुर जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  एमआयएमला उदगीरमध्ये खिंडार

  उदगीर नगर पालिकेतील एमआयएमच्या 7 पैकी 5 नगर सेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्धार

  राष्ट्रवादीत प्रवेशासाठी नगरसेवक आणि समर्थक मुंबईकडे रवाना.

  एमआयएम जिल्हाध्यक्ष ताहेर सय्यद यांच्यासह पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत करणार प्रवेश

 • 14 Oct 2021 06:38 AM (IST)

  IAS नयना गुंडे यांच्या स्वीय सहायकाला 10 हजारांची लाच घेताना अटक

  गोंदियाचे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अतिरिक्त कारभार असलेले स्वी साहायक राजेश मेनन याना १० हजाराची लाचा घेताना अटक

  जिल्हाधिकरी कार्यालयात लाच घेण्याची आजपर्यंत ची पहिलीच घटना.

  फटाका व्यावसायकाचे परवाना नुतनीकरणाकरिता मागितली होती लाच.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI