सर्वात मोठी बातमी, हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाची बैठक, दोन मोठे निर्णय

विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

सर्वात मोठी बातमी, हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाची बैठक, दोन मोठे निर्णय
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 7:34 PM

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. राज्य मंत्रिमंडळाने आगामी हिवाळी अधिवेशनात लोकायुक्तीचा कायदा लागू करण्यासाठी पुढचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. लोकायुक्तीच्या कायद्याचं विधेयक विधी मंडळात मांडलं जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरही निशाणा साधला.

“आताच मंत्रिमंडळाची बैठक आम्ही घेतली. दोन महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलीय. त्याबद्दल ते सविस्तर सांगतीलच. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सातत्याने मागणी करत होते की, ज्याप्रकारे केंद्रात लोकपालाचं विधेयक झालं तसं महाराष्ट्रात लोकपाल आणि लोकायुक्ताचा कायदा झाला पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“या संदर्भात मागच्या काळात भाजप-सेना युतीचं सरकार होतं त्यावेळी एक समिती आपण स्थापन केली होती. ती समिती माहिती देणार होती. मधल्या काळात त्यावर फार काही गंभीर काम झालेलं दिसत नाही. पण आता नवीन सरकार आल्यापासून आम्ही त्या समितीला चालना दिली”, असा दावा फडणवीसांनी केला.

हे सुद्धा वाचा

“अण्णा हजारे यांच्या समितीने दिलेला रिपोर्ट पूर्णपणे शासनाने स्वीकारलाय.त्यानुसार लोकायुक्त कायदा तयार करण्याच्या विधेयकाला आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

“आता याच अधिवेशनात नवीन लोकायुक्ताचं विधेयक मांडणार आहोत. पहिल्यांदाच महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनासुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचं काम होणार आहे. या कायद्यात भ्रष्टाचार विरोधी कायदा समाविष्ट करण्यात येईल. लोकायुक्त हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश या दर्जाचे असतील”, अशी देखील माहिती त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांचा हिवाळी अधिवेशनावरुन विरोधकांवर निशाणा

“मी सर्वांचे स्वागत करतो. तीन वर्षांनी त्यांना नागपुरात येण्याची संधी मिळाली. आमचं सरकार आलं नसतं तर कदाचित याही वर्षी नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने कोरोना आला असता. आणि हे अधिवेशन झालं नसतं”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

“मला आज अतिशय आनंद वाटला की, अजित दादांना विदर्भाची आठवण आली. मुंबईत कोरोना नव्हता त्यामुळे अधिवेशन व्हायचं आणि नागपुरात कोरोना होता म्हणून अधिवेशन होत नव्हतं, अशी विडंबना आपण मागच्या काळात बघितलीय”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विरोधकांच्या महापुरुषांच्या अपमानाबद्दलच्या आरोपांवरील टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

“अन्यायाची मालिका ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुरु झाली”, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली.

“महापुरुषांच्या अपमानाबद्दल त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. मला आश्चर्य वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावा मागणारे हे मांडीला मांडी लावून बसतात आणि महापुरुषाच्या अपमानाबद्दल बोलतात. वारकरी संतांबद्दल अतिशय हीन दर्जाने बोललं जातं. त्यांना मंचावर घेऊन हे महापुरुषांच्या अपमानाबद्दल बोलतात”, असा टोला त्यांनी लगावली.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे देखील मान्य नाही. या संदर्भात बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाहीय. महापुरुषांचा अपमान कुणीही करु नये. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. पण त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर द्यायला तयार आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सीमावादावरुन विरोधकांवर निशाणा

“हे सरकार आल्यानंतरच जणू काही सीमावाद सुरु झाला, अशाप्रकारे बोललं जातंय. खरंतर जतच्या गावांनी आम्हाला कर्नाटक जायचंय असा ठराव 2013 साली केला, जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा केलं होतं. त्यानंतर 2016 साली 77 गावांना आपण पाहोचवलं. आणि उर्वरित गावांना पाणी पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“गावांना इतर राज्यात जाण्याचे सूर कोणी उमटवले याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्याबाबत आम्ही योग्य वेळी माहिती देऊ. काही पक्षाचे नेते बैठका घेऊन आपण दुसऱ्या राज्यात जाऊ, असा ठराव करु, असं म्हटले”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.