VIDEO | ऐन सामन्यात प्रेक्षक गॅलरी कोसळली, चंद्रपुरात आमदार चषक कबड्डी स्पर्धेवेळी दुर्घटना

लाकडी प्रेक्षक गॅलरीचे वजन जास्त झाल्यामुळे ती पत्त्यांसारखी कोसळली. यामध्ये 20 प्रेक्षक जखमी असून त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

VIDEO | ऐन सामन्यात प्रेक्षक गॅलरी कोसळली, चंद्रपुरात आमदार चषक कबड्डी स्पर्धेवेळी दुर्घटना
चंद्रपुरात प्रेक्षक गॅलरी कोसळली
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 7:54 AM

चंद्रपूर : क्रीडा स्पर्धा सुरु असताना अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात ही घटना घडली. आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान हा प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

तुडुंब भरलेल्या लाकडी प्रेक्षक गॅलरीला भार असह्य झाला. त्यामुळे गॅलरी अक्षरशः पत्त्यांसारखी कोसळली. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या अपघातात सुमारे 20 प्रेक्षक जखमी झाल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान हा प्रकार घडला. काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

20 प्रेक्षक जखमी, रुग्णालयात दाखल

लाकडी प्रेक्षक गॅलरीचे वजन जास्त झाल्यामुळे ती पत्त्यांसारखी कोसळली. यामध्ये 20 प्रेक्षक जखमी असून त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

वकिलीचा अभ्यास, मानसशास्त्रात पारंगत, सोशल मीडियावर महिलांना फसवायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाची हत्या, 12 तासांत आरोपींना बेड्या; वाहनांना लुटणारी टोळीही गजाआड

गावठी कट्टा आणायला लावला, नंतर गोळ्या झाडल्या, अनैतिक संबंध उघड झाल्याने केली पतीची हत्या