आनंदाची बातमी: राज्यातील कोरोना प्रादुर्भावात लक्षणीय घट; तीन महिन्यांतील निच्चांकी रुग्णसंख्या

राज्यात आज (26 ऑक्टोबर) दिवसभरात 3 हजार 645 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Cases).

आनंदाची बातमी: राज्यातील कोरोना प्रादुर्भावात लक्षणीय घट; तीन महिन्यांतील निच्चांकी रुग्णसंख्या

मुंबई : राज्यात गेल्या सात ते आठ महिन्यांपासून प्रशासन आणि सरकार कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळताना दिसत आहे. राज्यात आज (26 ऑक्टोबर) दिवसभरात 3 हजार 645 नवे रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यातील ही सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची संख्या आहे (Maharashtra Corona Cases).

9 हजार 905 रुग्णांनी कोरोनावर मात

राज्यात आज 9 हजार 905 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 16 लाख 48 हजार 664 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 14 लाख 70 हजार 660 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 89.2 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

दिवसभरात 84 तर आतापर्यंत 43 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 84 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर, कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 43 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.63 टक्के एवढा आहे (Maharashtra Corona Cases).

25 लाख 30 हजार 900 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये

राज्यात सध्या 25 लाख 30 हजार 900 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 13 हजार 690 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1 लाख 34 हजार 137 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट, राज्य सरकारचा मोठा निर्णय : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Rajesh Tope | आरोग्य सेवकांना सर्वात आधी लस दिली जाणार: राजेश टोपे

Corona Vaccine | कोरोना लस आल्यावर आरोग्य कर्मचार्‍यांना प्राधान्य देणार : राजेश टोपे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *