कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट, राज्य सरकारचा मोठा निर्णय : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्य सरकारने कोरोना चाचण्यांचे दर कमी केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. प्रयोगशाळेत चाचणी करण्यासाठी 980 रुपये लागतील, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. (Rajesh Tope said Maharashtra govt decided to reduce corona test rates)

कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट, राज्य सरकारचा मोठा निर्णय : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दरांमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आहे.  प्रति तपासणी 200 रुपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरांनुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत. 4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतकेकमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. (Rajesh Tope said Maharashtra govt decided to reduce corona test rates)

कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी 1400 रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट आणत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

संबंधित बातम्या :

Rajesh Tope | आरोग्य सेवकांना सर्वात आधी लस दिली जाणार: राजेश टोपे

Corona Vaccine | कोरोना लस आल्यावर आरोग्य कर्मचार्‍यांना प्राधान्य देणार : राजेश टोपे

(Rajesh Tope said Maharashtra govt decided to reduce corona test rates)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *