
“आजचा दिवस एनडीएच्या दृष्टीने महत्वाचा, आनंदाचा दिवस आहे. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा प्रचंड बहुमताने विजय झालाय. दिमाखदार सोहळा पार पडला.शपथविधीला आम्हाला उपस्थित राहता आलं. मी उपराष्ट्रपती सीपी राधकृष्ण यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप शुभेच्छा देतो. एवढ्या मोठ्या पदावरुन जाऊनही साधी राहणी, मनमिळावू स्वभाव, उच्च विचासरणी असं बहुआयामी नेतृत्व म्हणून सीपी राधाकृष्णन विराजमान झाले आहेत. राज्यपाल, संसदीय कार्याच त्यांना अनुभव आहे. खऱ्या अर्थाने या पदाची शान, मान ते वाढवतील याचा अभिमान आहे. देशाच्या विकासात, प्रगतीत त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, म्हणून मनपासून शुभेच्छा देतो” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अजित पवार आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते, त्यावर सुद्धा एकनाथ शिंदे बोलले. “अजितदादांच्यावतीने प्रफुल पटेल उपस्थित होते. ते मला भेटले एनडीएच सगळे लोक होते. त्यांचा रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम होता, म्हणून अजितदादा आले नाहीत” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
‘अशा प्रकराच वक्तव्य दुर्देवी, दुर्भाग्यपूर्ण आहे’
महाराष्ट्रात हिंसाचार होईल, नेपाळ सारखी स्थिती होईल असं संजय राऊत म्हणाले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “खरं म्हणजे अशा प्रकराच वक्तव्य दुर्देवी, दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण शेवटी प्रत्येकाला देशाचा स्वाभिमान, अभिान असला पाहिजे. देशावर प्रेम करणारे लोक अशी वक्तव्य करु शकत नाहीत. काही लोकांच्या मनात आहे की, जशी परिस्थिती नेपाळची झाली, तसं अराजक निर्माण करण्यासाठी डाव, कारस्थान कोणी रचत नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो?” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “आपली लोकशाही प्रगल्भ आहे, मजबूत आहे. आपल्या मनातले भाव बोलून दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.
‘अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील’
कर्नाटकात काँग्रेस सरकारकडे मेट्रो स्टेशनच छत्रपती शिवाजी महाराजांच नाव बदलून सेंट मेरी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “हे दुर्देवी आहे. इंग्रज निघून गेलेत, त्याला 75 वर्ष झाली आहेत. इंग्रजांची आठवण ठेवण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रच नाही, तर सगळ्या देशाचे आराध्य दैवत आहेत. प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे. अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील”