
Maharashtra Elections 2026: महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिकांचे निकाल आता समोर येत आहेत. राज्यात भाजप मोठा पक्ष ठरला आहे. पण सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 2 वर होतं. त्यामागे कारण देखील मोठं आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये मनसे नेता बाळासाहेब सरवदे आणि भाजप उमेदवार शालन शिंदें निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून दोघांमध्ये वाद सुरु झालेले. दुपारी 2 वाजता सुरु झालेला हा वाद सायंकाळी विकोपास पोहोचला आणि यामध्ये मनसे नेता बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली. या हत्येचे आरोप भाजपच्या शालन शिंदे यांच्यावर आहेत. सध्या शिंदे आणि त्यांचं कुंटुब तुरुंगात आहेत. अशात तुरुंगात असताना आणि कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता शालन शिंदे यांचा विजय झाला आहे.
सांगायचं झालं तर, उत्तर सोलापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ किरण देशमुख हे या प्रभागात भाजपचे नेतृत्व करत होते. सध्या तुरुंगात असलेल्या शालन शिंदे यांचा 10 हजार 767 मतांनी विजय झाला आहे. भाजपच्या शालन शिंदें आणि शिवसेना शिंदें पक्षाच्या आफ्रिन पठाण यांच्यात लढत झाली होती. अशात शालन यांचा विजय झाल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहेत. तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे.
Pune Nagarsevak Election Results 2026 : पुण्यात शिंदे गटाला थेट धक्का
Maharashtra Municipal Election Results 2026 : जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता, थेट पंकजा मुंडे यांनी...
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
हा विजय धन शक्तीचा नाहीत जन शक्तीचा आहे, शंकर जगताप यांचा हल्ला
पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?
2017 मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर 2025 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत 2 जानेवारी होती. तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये रेखा सरवदे आणि शालन शिंदें यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. भाजपने शालन शिंदे यांना उमेदवारी जाहिर केली. रेखा सरवदे यांना उमेदवारी माघारी घेण्यावरून मोठा राजकीय दबाव निर्माण करण्यात आला होता. याच कारणामुळे दोघांमध्ये वाद सुरु झाले…
दोघींमध्ये सुरु झालेले वाद मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ‘दोघेही एकाच समाजातील आहेत. भांडण करु नका …’ बाळासाहेब असं सांगत असताना शिंदे यांच्या कुटुंबियांनी बाळासाहेब यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये बाळासाहेब सरवदे यांचा मृत्यू झाला… यामुळे सोलापूर येथील राजकारण तापलं…
शालन शिंदे यांच्यासह एकून 15 जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून भाजप उमेदवार शालन शिंद आणि त्यांचे कुटुंब तुरुंगात आहे. तुरुंगात राहून आणि प्रचार न करता शालन शिंदे यांचा विजय झाला आहे.