AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्र एपिस्टिन फाईलल्स’ प्रकरण तापलं, आम्हाला हसू येतंय…, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांबद्दल नेमकं काय म्हणाल्या?

अशोक खरात याच्यावर आधारीत महाराष्ट्र एपिस्टिन फाईल्स नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मात्र या चित्रपटाला रुपाली चाकणकर यांनी विरोध केला आहे, त्यांनी या प्रकरणात चित्रपटाचे दिगदर्शक, अभिनेत्री दीपाली सय्यद आणि निर्माता यांना 25 कोटीची नोटीस पाठवली आहे.

'महाराष्ट्र एपिस्टिन फाईलल्स' प्रकरण तापलं, आम्हाला हसू येतंय..., दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांबद्दल नेमकं काय म्हणाल्या?
दीपाली सय्यद यांची नोटीसवर प्रतिक्रिया Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 07, 2026 | 6:01 PM
Share

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याचे एक एक काळे कारनामे समोर आले. दरम्यान आता अशोक खरात याच्यावर आधारीत महाराष्ट्र एपिस्टिन फाईल्स नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित पात्र साकारणार आहेत. मात्र या चित्रपटाला रुपाली चाकणकर यांनी विरोध केला आहे. ही केस कोर्टात चालू असताना अशा प्रकारे चित्रपट काढणे योग्य नसल्याचं चाकणकर यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्याकडून  या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना २५ कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीची नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.

दरम्यान या नोटीसीनंतर आता अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर आपली भूमिका मांडली आहे. आमच्यावर 25 कोटीचा दावा टाकण्यात आला आहे. ज्यांनी हा दावा केला, त्यांच्यावर आम्हाला हसू येत आहे.  कारण हा चित्रपट आत्मचरित्र नाहीये, या चित्रपटामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या नावाचा वापर केला गेलेला नाहीये, चित्रपट करत असताना आमच्यावर कोणत्याही प्रकारची रोकठोक होत असेल तर ते चुकीचं आहे, असं यावेळी दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. दरम्यान हा चित्रपट न बनवू देण्यामागे तुम्ही जे केलं ते खरं आहे का? असा सवालही यावेळी दीपाली सय्यद यांनी केला आहे. जे काही असेल त्याला आम्ही कोर्टात उत्तर देऊ, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं.

रुपाली चाकणकर यांची 25 कोटीची नोटीस आली आहे,  आम्ही कुणाची अब्रु घालवण्यासाठी नाही तर, महिला अत्याचार आणि भोंदूगिरी या विरोधात आमचा हा चित्रपट आहे. 2 ऑक्टोबरला महाराष्ट्र्र एप्सटिन फाईल्स चित्रपट येणारच आहे, अशी प्रतिक्रिया यावर चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी दिली आहे, दरम्यान यावर आता रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ