Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींमागचं शुक्लकाष्ठ थांबेना, नवी अपडेट काय ?

महायुती सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेतील २ कोटींहून अधिक महिला लाभार्थींसाठी महत्त्वाची बातमी ! गैरप्रकार रोखण्यासाठी आता e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. याचसंदर्भात आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींमागचं शुक्लकाष्ठ थांबेना, नवी अपडेट काय ?
लाडकी बहीण योजना
| Updated on: Oct 01, 2025 | 10:26 AM

महायुती सरकाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण ‘ (Ladki ahin Yojana) योजनेचा राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक महिला लाभ घेत आहेत. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांचा खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात. महायुतीची ही योजना सतत चर्चेत असते, विधानसभा निवडणुकीतही त्याचा मोठा फायदा झाला आणि महायुतीला दणदणीत बहुमत मिळालं. मात्र आता या योजनेत नवनवे अपडेट्स समोर येत असून लाभार्थ्यांची पडताळणी देखील करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार, फसवणूक थांबवण्यासाठी सरकारकडून पडताळणी करण्यात येत आहे.

त्यातच आता एक नवी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता e-KYC करावी लागणार आहे. या योजनेत ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य असून पतीचे किंवा पित्याचे आधारकार्ड देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सरकारने यासंदर्भात प्रक्रिया चालू केली असून ही e-KYC ऑनलाईन पद्धतीने करायची आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी ई-केवायसी

लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी असातनाही अनेक पुरुषांनी त्यात हात धुवून घेत पैसे लाटल्याचे, गैरप्रकार समोर आले होते. हीच कीड दूर करण्यासाठी सरकाने पडताळणीचे निकष आता कठोर केले असून त्याचअंतर्गत आता ई-केवायसी सक्तीची करण्यात आली आहे

सरकारने सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली असून त्यासाठी दोन महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. ई-केवायसीची ही प्रक्रिया जर ठरावीक वेळेत पूर्ण झाली नाही, तर दरमहा मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत थांबू शकते.

गेल्या वर्षी, जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. 21 ते 65 वयोगटातील गरजू महिलांना दरमहा 1500 रुपयांची थेट मदत देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या ऑडिटमध्ये धक्कादायक बाब उघड झाली. तब्बल 26.34 लाख अपात्र लाभार्थी, ज्यात अनेक पुरुषांचा समावेश आहे, हे देखील लाडकी बहीण या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले. त्यामुळेच पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्रांना योजनेतून वगळण्यासाठी शासनातर्फे ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्व महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा मिळणारी आर्थिक मदत बंद होण्याची शक्यता आहे. तसेच पतीचे किंवा पित्याच आधारकार्डही बंधनकारक करण्यात आले आहे.

ई-केवायसीसाठी कोणती डॉक्यूमेंट्स आवश्यक ?

आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती, नमूद केलेली इतर कागदपत्रं

अशी करा प्रक्रिया पूर्ण

सरकारचे या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in आहे. यावर अथवा ई महासेवा केंद्रावर महिलांना ईकेवायसी पूर्ण करता येणार

  • साईटवर जा. ई-केवायसीवर क्लिक करा.
  • नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक नोंदवा.
  • मागितलेली कागदपत्रं अपलोड करा. सबमिट करा. त्यानंतर कागदपत्रं जमा झाल्याची खात्री करा