Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News LIVE Update
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 02, 2022 | 7:43 AM

मुंबई : आज दिनांक 1 नोव्हेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे. राज्य सरकार बरखास्त करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घातलं असून मोदींनी या प्रकरणी उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.